व्यापार्‍याचे 10 वीच्या मुलाशी अश्लिल चाळे.! समलैंगिक भावना जेलमध्ये घेऊन गेली, तीन वर्षे कारावास, 10 हजार दंड.!

    


सार्वभौम (संगमनेर) :-

        संगमनेर शहरातील एका हायस्कुलच्यासमोर असणार्‍या स्टेशनरी दुकानात इयत्ता 10 वीचा विद्यार्थी पुस्तक घेण्यासाठी गेला होता. मात्र, दुकानात कोणी नसल्याचा फायदा घेऊन दुकानदाराने विद्यार्थ्याशी अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. तर, त्याच्याशी पुढे काही वाईट कृत्य करण्याच्या आधिच मुलगा सावध झाला आणि त्याने तेथून पळ काढला. ही घटना दि. 24 जून 2018 साली घडली होती. यात पीडित मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार व्यापारी राजेश दिगंबर पाठक (रा.अकोले नाका परिसर, संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.सी. राजपूत यांनी केला होता.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कसारावाडी परिसरात राहणारा एक विद्यार्थी इयत्ता 10 वीचे पुस्तक आणण्यासाठी अकोले नाका येथील एका स्टेशनरी दुकानात गेला होता. सायंकाळी 6:30 वाजल्यामुळे दुकानात फारशी गर्दी नव्हती. मात्र, संगमनेर सुरक्षित आहे असे समजून तो पुस्तकाच्या दुकानात शिरला. दुकानदार राजेश पाठक याला त्याने विचारले.की, इयत्ता 10 वीचे नवनित आहे का? तेव्हा दुकानदार म्हणाला की, तुला पुस्तक पाहिजे असेल तर जरा आतल्या बाजुने ये. तेव्हा, निर्मळ भावनेने मुलगा आतून गेला. तेव्हा, दुकानात कोणी नसल्यामुळे, राजेश याने मुलास आपले नाव गाव विचारले. तुला भविष्यात काय व्हायचे आहे? तुचे पुढील स्वप्न काय आहे? अशा पद्धतीचे प्रश्न राजेश पाठक याने विद्यार्थ्यास विचारले.

दरम्यान, मुलगा प्रमाणिकपणे त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत होता. तेव्हा व्यापारी पाठक याच्या भावना जागृत झाल्या आणि त्याने मुलाकडे वाईट नजरेने पहायला सुरूवात केली. मात्र, तो देखील एक मनुष्य असल्यामुळे, त्याच्या मनात काय फालतू भावाना आहेत हे मुलाच्या लक्षात आल्या नाही. तेव्हा पाठक याने मुलाच्या शरिरावर लज्जा उत्पन्न होईल असे हात फिरविण्यास सुरूवात केली. तर, नको-नको त्या भागास हात लावून वाईट कृत्य करु लागला. तर पाठक त्यास म्हणला. की, जरावेळ आत येतो का? त्यामुळे मुलगा धाबरुन गेला आणि हा वेगळाच प्रकार असल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा त्याने पाठकला विरोध केला आणि तत्काळ त्याच्या तावडीतून सुटून बाहेर पळ काढला.


मुलाने त्याच्या घराचा मोबाईल आणलेला होता. त्यामुळे, त्याने त्याच्या मित्रास फोन केला. तेव्हा मित्र घटनास्थळी आला. असे करता-करता दोन तीन मुले तेथे आले आणि त्यांनी घडला प्रकार हा आपल्या पाल्यांना सांगण्याचे ठरविले. तेव्हा पीडित विद्यार्थ्याने आपल्या आई वडिलांना फोन केला आणि घटनास्थळी बोलावून घेतले. तेव्हा पालकांनी कोणताही विचार न करता या व्यापार्‍याची खोड मोडण्याचा निर्णय ठाम केला आणि थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठून आरोपी राजेश पाठक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राजपूत यांनी या घटनेचा चांगला तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून राजेश पाठक यास तीन वर्षे कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 

मुलाचे कौतूक करावे ते कमीच.!

घटना घडल्यानंतर मुलगा त्यावर झाकण घालु शकला असता. कारण, 10 वीत असताना काय कळते? भितीपोटी गप्प बसणे मुले पसंत करतात. मात्र, या आरोपीचे दुकान हे एका हायस्कुल समोर होते. त्याच्या दुकानात अन्य मुली-मुले देखील येतात. आज याची इच्छा मुलावर व्यक्त झाली. उद्या आपल्या बहिनीप्रमाणे असणार्‍या मुलींवर देखील ही वेळ येऊ शकते. त्यामुळे, या घटनेवर पांघरुन न घालता मुलाने पुढे येणे पसंत केले. तर, पालकांचे देखील कौतुक केले पाहिजे. कारण, जर, या व्यक्तीचे कृत्य समोर आले नाही तर पुढे आणखी शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पालकांनी गुन्हा दाखल करण्यास पुढाकार घेतला. आज त्यांच्या निर्णयला न्यायालयात न्याय मिळाला आहे. तर, पाठकची आता खोड मोडली आहे. त्यामुळे, या गुन्ह्यात पोलिस, विद्यार्थी आणि पालक यांचे सामाजिक संघटनांनी कौतूक केले आहे.

 1098 संपर्क साधा..!!

जर, बालकांकडे कोणी अश्लिल भावनेने पहात असेल, त्यांचा लौंगिक वा अन्य कोणताही छळ करीत असेल. बळजबरी  कोणतीही गोष्ट करायला सांगत असेल. किंवा कोणत्याही प्रकारचा छळ केला असेल. तथा बाल विवाह करीत असेल, प्रवृत्त करीत असेल तर 1098 या क्रमांकावर संपर्क करावा. त्यासाठी कोणताही चार्ज लागत नाही. चाईल्ड लाईनची एक टिम तत्काळ आपल्या मदतीला येईल. तर पालकांनी त्यांचे नंबर तथा पोलीस ठाण्याचे नंबर मुलांच्या वहीवर लिहून द्यावेत किंवा पाठ करण्यास सांगावे. म्हणजे, वेळ पडल्यास त्याला आपल्याशी संपर्क साधता येईल. एकीकडे महिला सुरक्षित नाही असे आपण म्हणतो. परंतु, येथे बालक सुरक्षित नाही हे प्रखर सत्य समोर येत आहे.

- महेश सुर्यवंशी (चाईल्ड लाईन)