छी.! पिंपळगावात मतीमंद मुलीवर बलात्कार, कॉलर पकडून चोपला, घरातून ओडून हजर केला, आरोपी अटक .!
सार्वभौम (गणोरे) :-
आई वडील घरी नसल्याचा डाव साधून एका ओळखीच्या तरुणाने मतीमंद मुलीवर अत्याचार केला. तिला बोलता येत नाही आणि फारसे व्यक्तही होता येत नाही. त्यामुळे, असहाय्य वेदना होत असताना तिच्या तडफडण्याचा आवाज एका महिलेला आला आणि घडला प्रकार समोर आला. जेव्हा आरोपीस असले कुकर्म कारताना पाहिले असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जमलेला गावकरी व नातेवाईकांनी त्याचा खरपूस समाचार घेतला. ही घटना अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यात पप्पू उर्फ दिलीप विठ्ठल पवार (वय 32, रा. पिंपळगाव निपाणी, ता. अकोले) यास आरोपी करण्यात आले असून पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव निपाणी परिसरात एक गरीब जोडपे आहे. दोन वेळच्या अन्नासाठी ते दुसर्याच्या बांधावर मोलमजुरी करतात. दुर्दैवाने घरात एक मतीमंद मुलगी असली तरी त्यांनी तिचा सांभाळ मोठ्या उदार अंत:करणाने ते करतात. मात्र, त्या मुलीच्या आयुष्यात अधुपण आणि त्यात पुन्हा असला अतिप्रसंग. त्यामुळे, हे कुटूंब पुरते खचून गेले आहे. त्याचे झाले असे की, दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी पीडित मुलीचे आई वडीले मजुरीसाठी गेले होते. त्याच दिवशी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या नात्यातली एक महिला त्यांच्या घराजवळुन चालली होती. मात्र, घर बंद असून देखील घरातून विचित्र असा आवाज येत होता. म्हणून या महिलेस शंका आली. कारण, काही वेळापुर्वी आरोपी पप्पू पवार हा पीडितेच्या घराजवळ शंकास्पद फिरत होता. त्यामुळे, या महिलेने मुद्दाम चौकशी करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पीडित तरुणीच्या घराला दोन दरवाजे होते. त्यातील मागिल दरवाजा बंद होता तर पुढचा दरवाजा लोटलेला असल्याचे लक्षात आले. त्यामुळे, संबंधित महिलेने घरात कानोसा घेतला असता घरातून चित्र-विचित्र आवाज येत होता. त्यामुळे, त्यांनी एका मुलास मागिल दरवाजाकडे पाठविले आणि त्यांनी पुढच्या दरवाजा जोराने लोटला. तेव्हा, पीडित मतीमंद मुलगी मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करीत होती. संबंधित महिलेला पाहून दिलीप पवार याने कसेबसे कपडे घातले आणि पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने त्याची गचांडी पकडून त्याच्या चारदोन कानफाडीत मारल्या. पीडित मुलीच्या अंगावर कपडे टाकून महिलेने तिला धिर दिला. त्यावेळी दिलीप म्हणाला की, माझे चुकले मला माफ करा. माझ्याकडून असे परत होणार नाही, मला जाऊद्या. तेव्हा त्याचा समाचार घेत असताना त्याने संबंधित महिलेस ढकलुन दिले आणि तो तेथून पळून गेला.
दरम्यान, त्याच्या मागे पळण्यापेक्षा पीडित मुलगी प्रचंड घाबरलेली होती. त्यामुळे, महिलेने तिला जवळ घेतले. तिला धिर देऊन समजूत काढली. तिला शांत करुन तिच्या आई वडिलांना फोन करुन बोलावून घेतले. ते दहा ते पंधरा मिनिटांनी आले असता गावातील काही प्रतिष्ठीत लोक देखील तोवर जाम झाले होते. त्यावेळी, एका व्यक्तीने पप्पू उर्फ दिलीप पवार यास फोन करून घटनास्थळी बोलविले. मात्र, तो आला नाही. त्यामुळे, चार-दोन व्यक्तींनी थेट पप्पुचे घर गाठले आणि त्याला घरातून ओढून पीडित मुलीच्या समोर नेले. तेव्हा त्याच्याकडे पाहून पीडित तरुणी ही घाबरुन गेली आणि रडायला लागली. तर, पवार यानेच माझ्यावर अत्याचार केला असे तिने बोटाने खुनवले. त्यामुळे, उपस्थित व्यक्तींनी सदर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे ठरविले. आज दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारी दिलीप विठ्ठल पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यास पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भुषण हांडोरे करीत आहेत.