गुड न्युज.! दोनशे कोटींच्या ठेवी पुर्ण, आमची पतसंस्था म्हणजे विश्वासाचं खणखणीत नाणं- मधुभाऊ नवले.

  
-Sagar Shinde
सार्वभौम (अकोले) :-
         दि. 9 ऑगस्ट 1991 साली अकोले ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बुवासाहेब नवले पतसंस्थेचा जन्म झाला होता. त्यास हजारो ठेविदारांनी या छोट्याशा रोपट्याला खतपाणी घातले आणि बघता-बघता पतसंस्थेचे रुपांतर पेमगिरीच्या वटवृक्षासम भव्यदिव्य झाले आहे. या संस्थेची पाळंमुळं अगदी नगर जिल्ह्यात आणि विशेषत: दुर्गम भागापर्यंत जाऊन विश्वासानं खोलवर रुजली आहेत. म्हणून तर कष्टाने पै-पै जमा करणारा शेतकरी, लोकांच्या बांधावर घाम गाळुन आयुष्यासाठी पुंजी जमा करणारा मजूर आणि सामान्य व्यापारी यांच्या विश्वासानं पतसंस्थेचा पाया भरला आहे. म्हणून तर दोनशे कोटींच्या ठेवींचा कळस अभिमानाने भरभरुन दिसतो आहे. येणार्‍या काळात देखील व्यवस्थापन, सभासद, ठेवीदार आणि पारदर्शी कारभार यात एकवाक्यता असावी, विश्वास वृद्धींगत व्हावा म्हणून उद्या दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी आशिर्वाद मंगलकार्यालय येथे दुपारी 1 वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मधुभाऊ नवले यांनी दिली आहे.
खणखणीत नाणं विश्वासाच हे घोषवाक्य घेऊन गाव पातळीची पतसंस्था आज जिल्हापतळीवर जाऊन पोहचली आहे. 1991 ते 2022 या 32 वर्षाच्या प्रदिर्घ कार्यकाळात अनेक संघर्षाचे चड-उतार पार करुन पतसंस्थेने दोनशे कोटींचे शिखर पादाक्रांत केले आहे. खरंतर आर्थिक उलढाल म्हटली. की, पहिला प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे विश्वास.! जेथे विश्वास आहे तेथे माणूस स्वत:ला देखील गहाण ठेऊ शकतो, इतके सामर्थ्य या शब्दात आहे. ते शब्द जिंकण्याचे काम बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेने केले आहे. काही झालं तर सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि व्यावस्थापन यांच्यात दुवा साधून जेथे प्रश्न तेथे योग्य उत्तर शोधण्याचे काम चेअरमन यांना करावे लागते. त्याचे साधर्म्य बुवासाहेब नवले पतसंस्थेत आपल्याला पहायला मिळते. म्हणून तर दोनशे कोटींचा पल्ला ही संस्था गाठू शकली आहे.
विशेष बाब म्हणजे..!!
खरंतर लोक दहा रुपये कोणाकडे ठेवताना हजार वेळा विचार करतात. बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यावहाराचे स्वरुप पाहिल्यास लक्षात येते की, ठेविदार हे कर्ज कमी घेतात. मात्र, आपल्या आयुष्याची जी काही कमाई आहे. ती सेफ राहिली पाहिजे, आपल्याला पुन्हा मिळण्याची शंभर टक्के खात्री वाटली पाहिजे आणि पैसे ठेवण्यास विश्वास वाटला पाहिजे. इतका पारदर्शी कारभार या पतसंस्थेने केला असून निर्मळ आरश्यासारखा विश्वास ठेवीदारांना दिला आहे. एकवेळी पतसंस्थेला नफा कमी झाला तरी बेहत्तर, कर्जवाटप कमी झाले तरी हरकत नाही. परंतु, नफ्यासाठी किंवा स्वार्थापोटी चुकीची कामे करणे आणि संस्थेच्या व्यावहारीक चारित्र्याला गालबोट लावणे असे एकाही काम बुवासाहेब नवले पतसंस्थेने केलेले नाही. म्हणूनतर दोनशे कोटींच्या ठेवीदारांचा विश्वास जिंकता आला आहे. तर, ठेवींचा ओघ वाढणे म्हणजे खर्‍या अर्थाने विश्वास जिंकणे आहे. तर, त्यावर ठरलेले व्याज अदा करुन विश्वासाचे प्रमाण आजवर दिले आहे. येणार्‍या काळात देखील असाच विश्वास जनता ठेवेल असा विश्वास नवले यांनी व्यक्त केला आहे. 
आर्थिक व्यावहाराचे स्वरुप
दि. 31 मार्च 2022 रोजी  बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.  या पतसंस्थेत 10 हजार 556 सभादस असून भागभांडवलासह एकूण निधी 9 कोटी 17 लाख 12 हजार 827 आहे. तर, ठेवी ह्या 200 कोटी 20 लाख 30 हजार 106 रुपये आहेत. तर, कर्ज 116 कोटी 3 लाख 17 हजार 493 असून कज; वसुली शेकडा प्रमाण 92.70 टक्के आहे. यात वार्षीक उलाढाल ही 800 कोटी 38 लाख 23 हजार 346 इतके की आहे. तर खेळते भांडवल 229 कोटी 34 लाख 605 रूपये आहेत. तरलता निधी हा 99 कोटी 30 लाख 71 हजार 173 असून नफा हा 52 लाख 5 हजार 840 इतका आहे. अशा प्रकारे  बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यावहाराचे स्वरुप आहे.