महिला कपडे बदलताना हॉस्पिटलमध्ये मॅनेजरने अश्लिल फोटो काढले, माझ्यासोबत चल नाहीतर व्हायरल करेल.! बळजबरीचे चुंबन, गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरातील एका नामांकीत हॉस्पिटलमध्ये तेथील कर्मचाऱ्याने ड्रेसिंग रूममध्ये कपडे बदलत असताना महिला कर्मचाऱ्याचे फोटो काढले व फोटो काढुन पिडीत महिलेला दाखवुन कामानिमित्त ऑफिसमध्ये बोलावून गालावर हात फिरवुन लज्जाउत्पन्न होईल असे कृत्य करून तु कुठेतरी बाहेर चल, तु नाही आली तर तुझे फोटो व्हायरल करील असे धमकी देत विनयभंग केल्याची घृणास्पद घटना दि.2 सप्टेंबर 2021 ते 18 जुलै 2022 पर्यंत वेळोवेळी एका नामांकीत हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून हॉस्पिटलचा मॅनेजमेंट सांभाळणारा निजाम चाँदभाई शेख (रा. रेहमतनगर, ता. संगमनेर) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी निजाम शेख यास अटक करण्यात आली. आज न्यायालयापुढे हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.याचा पुढील तपास पोलीस अधिकारी पवार करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिला ह्या नवीन नगररोड परिसरातील एका नामांकीत हॉस्पिटलमध्ये कामाला येत असतात. तेथेच आरोपी निजाम शेख हा देखील कामाला होता. हॉस्पिटलमध्ये काम करत असताना आरोपी निजाम शेख हा पिडीत महिलेशी जवळीक करून तु मला आवडते असे पिडीत महिलेला नेहमी म्हणत. परंतु पिडीत महिला आरोपी निजाम शेख याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत. पण, आरोपी निजाम शेख हा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सांगत की, पिडीत महिला हे माझं फुलपाखरू आहे. ही गोष्ट पिडीत महिलेच्या कानावर आल्यानंतर आरोपी निजाम शेख यास तु व्यवस्थित रहा फालतु बोलत जाऊ नकोस नाहीतर मी डॉक्टरांना सांगेल अशी कान उघडणी केली. पण, तरी देखील आरोपी निजाम शेख हा त्रास देत असल्याने पिडीत महिला एक महिन्यासाठी हॉस्पिटलमधुन रजेवर निघुन गेली. पुन्हा कामावर हजर झाल्यानंतर पिडीत महिलेला हॉस्पिटलमध्ये सोडवण्यासाठी पिडीत महिलेचा पती येत असे. ते गेल्यानंतर आरोपी निजाम शेख हा पिडीत महिलेला बोलत असे की, तु तुझ्या नवऱ्यासोबत गाडीवर येऊ नको. मी तुला घ्यायला येत जाईल असे आरोपी निजाम शेख हा दररोज पिडीत महिलेला बोलत असे. पिडीत महिला हॉस्पिटलमध्ये इतर लोकांशी बोली तर तु कोणाशी बोलायचे नाही माझे तुझ्यावर प्रेम आहे असे आरोपी निजाम शेख म्हणत.
दरम्यान, पिडीत महिला हॉस्पिटलमधील ड्रेसिंगरूममध्ये कपडे बदलत असताना आरोपी निजाम शेख याने फोटो काढुन घेतले व पिडीत महिलेला दाखविले त्यानंतर, आरोपी निजाम शेख हा पिडीत महिलेवर नेहमी करडी नजर ठेऊन हॉस्पिटलच्या कामानिमित्ताने बोलावुन गालावरून हात फिरवुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तु बाहेर कुठे तरी चल, तु नाही आली तर तुझे फोटो व्हायरल करीन व तुझ्या नवऱ्याला फोटो सेंड करीन अशी धमकी देऊन आरोपी निजाम शेख याने पिडीत महिलेला एका लॉजवरती बोलवले व हॉस्पिटल मधील कपडे काढत असतानाचे फोटो दाखवले.आरोपी निजाम शेख हा पिडीत महिलेला म्हणाला की, तु माझ्यासोबत लॉजिंगमध्ये चल नाही आली तर तुझे फोटो व्हायरल करीन. असे म्हणताच पिडीत महिला तेथुन उठुन निघुन गेली. मात्र,आरोपी निजाम शेख याच्या त्रासाला कंटाळुन पिडीत महिलेने हॉस्पिटलची नोकरी सोडुन दिली. त्यानंतर, पुन्हा चार ते पाच महिन्यानंतर आरोपी निजाम शेख याने पिडीत महिलेच्या पतीच्या मोबाईलवर रेकॉर्डिंग पाठवल्यानंतर पिडीत महिलेचे आई-वडील व पती यांनी आरोपी निजाम शेख यास समजावुन सांगितले. तरी देखील पुन्हा आरोपी निजाम शेख याने 15 दिवसांपूर्वी पिडीत महिलेच्या नणंदच्या मोबाईलवर हॉस्पिटल मधील कपडे चेंज करीत असतानाचे फोटो व चॅटिंग सेंड केले. ते नणंदने पिडीत महिलेच्या पतीला दाखवले यावरून पिडीत महिलेचे व पतीचे भांडण झाले.
दरम्यान, आरोपी निजाम शेख याच्या अश्लीलपणाला, घृणास्पद कृत्याला, नीचपणाला, त्रासाला कंटाळुन पिडीत महिलेने थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर, पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहे. दरम्यान, धनदांगड्या व्यक्तींकडुन सामान्य, गोरगरीब व्यक्तींना नेहमीच टारगेट केल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. कोठे हॉस्पिटलमध्ये महिलेचे सोशन होते तर कोठे उद्योगधंद्याच्या ठिकाणी. मात्र, त्यावर आवाज उठवता येत नाही. त्यामुळे, होणारा अन्याय निमूटपणे सहन करावा लागतो. यातून अनेकांचे शोषन होते. मात्र, पैसा फेकुन त्यावर पडदा टाकण्याचे काम केले जाते. त्यामुळे, जर अशा प्रकारे काही महिला निर्भीडपणे पुढे आल्या तर त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फुटून त्यांना न्याय मिळण्यास मदत होईल व अशा प्रकारे गुन्हे वारंवार होणार नाहीत.