अवघ्या 13 वर्षाची शालेय मुलगी गरोदर.! जवळच्याने माती खाल्ली.! संगमनेरात गुन्हा दाखल, आरोपी अटक.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                  संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग परिसरात नात्याला काळीमा फासणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. चक्क 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने वेळोवेळी संभोग केला. त्यातुन अल्पवयीन मुलगी अडीच महिन्यांची गरोदर असल्याचे समजले तेव्हा हे सर्व बिंग फुटले त्यानंतर, घडलेला प्रकार समोर आला. ही घटना जवलेकडलग परिसरातील आरोपीच्या घरात 10 सप्टेंबर 2021 ते  24 जुन 2022 पर्यंत वेळोवेळी घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खंडीझोड करत आहे. खरंतर, संगमनेर शहरासह तालुक्यात महिला अत्याचारासह शाळेतील अल्पवयीन मुलींवर देखील अत्याचार वाढत आहे. यामध्ये पोक्सो सारखे गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. त्यामुळे, इथे शाळा, कॉलेज, वाडी-वस्तीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधीनी, महिला आयोगाने जन जागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे, संगमनेर तालुका जितका विकसित होत चालेला आहे. तितके येथे अल्पवयीन मुली-महिला यांची असुरक्षितता वाढत आहे का? असा प्रश्न संगमनेरातील सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.

                याबाबत सविस्तर माहिती अशी की, जवळेकडलग परिसरात एक कुटुंब आहे. त्यांना दोन मुली व एक मुलगा असे छोटे कुटुंब आहे. त्यांचा शेतमजुरीवर उदरनिर्वाह चालतो. पिडीत अल्पवयीन मुलगी 13 वर्षांची असल्याने ती एका शाळेत इयत्ता 8 वी कक्षेमध्ये शिकत आहे. मोठ्या मुलीचे लग्न असल्याने पिडीत अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांपासुन शाळेत न जाता घरीच होती. मात्र, दि.  6 ऑगस्ट 2022 रोजी पिडीत मुलीचे वडील सकाळी 8:30 वाजता शेताला कोंबडखत घेण्यासाठी निमगावजाळी येथे गेले होते. ते घराच्या बाहेर पडताच पिडीत अल्पवयीन मुलीला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चक्कर आली. त्यामुळे पिडीत मुलीच्या आईने तिला रुग्णालयात नेले. पिडीत अल्पवयीन मुलीला डॉक्टरांनी तपासले असता त्यांनी रुग्णवाहिकेद्वारे पुढील तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पिडीत अल्पवयीन मुलीला तपासले असता ती गरोदर असल्याचे सांगितले.

            दरम्यान, पिडीत मुलीच्या आई ने आपल्या पतीला फोन करून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे बोलावून घेतले. पिडीत मुलीच्या वडीलांनी मुलीला विचारले असता तिने सांगितले की, जवळेकडलग परिसरातीलच आपल्या नातेवाईकातील मुलगा याने स्वतःच्या घरात दि.10 सप्टेंबर 2021 ते 24 जुन 2022 या कालावधीमध्ये वेळोवेळी जबरी संभोग केला. त्यामुळे, पिडीत 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही अडीच महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस झाले. ही कैफियत ऐकताच पिडीत मुलीच्या वडीलांचा पारा सरकारला. त्यांना राग अनावर झाला. तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. त्यांनी नातेवाईकातील आरोपीला पाठीशी न घालता थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली. तालुका पोलिसांनी तात्काळ या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खंडीझोड करत आहेत.