बायकोच्या वंगाळ वागण्याहून नवऱ्याने घेतली फाशी.! खरं सांगत होता म्हणून सासू, सासरे मारत होते.! रेकॉर्डींग सापडले, अन तिला राईट हॅण्ड पकडले.! भाऊ मी जातोय, हे जगणे नकोच मला..!!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरालगत असलेल्या ढोलेवाडी येथे एका 42 वर्षीय डायव्हरच्या पत्नीचे मैत्री संबंध असल्याचे डायव्हरला समजल्याने त्याने पत्नीला विचारणा केली व सासऱ्याला देखील सांगितले. पण, डायव्हरला सासरा, सासु, मेव्हणा यांनी तु आमच्या मुलीवर विनाकारण संशय घेतो. यावरून एकदा दोनदा नव्हे वारंवार मारहाण केली. तर अपमानास्पद वागणुक दिली. त्यामुळे, डायव्हरने राहत्या घरी ढोलेवाडी येथे फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या पुर्वी घडली. यात सोमेश बबन काकडे (वय 42, रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ही आत्महत्या पत्नीच्या मैत्री संबंधामुळे झाल्याची समोर येऊ लागले आहे. त्यामुळे, मयताच्या भावाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली आहे. यावरून आरोपी कविता सोमेश काकडे, नाना बापु शेळके, लता नाना शेळके, संतोष नाना शेळके (सर्व रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत सोमेश काकडे हा संगमनेर शहरा लगत असलेल्या एका कंपनीमध्ये गाडी चालक म्हणुन काम करत होता. त्याची पत्नी ढोलेवाडी येथील असल्याने तो सासऱ्याकडे स्थाईक झाला. 2014 साला पासुन मयत सोमेश व त्याची पत्नी दोन मुले ढोलेवाडी येथे सासऱ्याकडे राहत होते. मयत सोमेश व त्याची पत्नी कविता यांच्यामध्ये नेहमी किरकोळ कारणावरून भांडण होत असे. भांडण झाल्यानंतर सासरचे लोक नेहमी त्रास देत असत. दि. 28 मे 2022 रोजी रात्री 9: 30 वाजण्याच्या सुमारास मयत सोमेश याने भावाला फोन करून सांगितले की, मी संगमनेरवरून निघालो आहे मला घेण्यासाठी बोटा येथे ये. मयत व्यक्तीचा भाऊ त्याला घेण्यासाठी बोटा येथे गेला असता मयत सोमेशने भावाला सांगितले की, पत्नी कविताचे कंपनीतील एका व्यक्ती बरोबर घनिष्ट मैत्रीचे संबंध आहे. त्याबाबतचे मला फोनचे रेकॉर्डिंग सापडले होते. त्यावरून मयत सोमेश ने पत्नीला विचारले असता तिने मयत सोमेश बरोबर भांडण केले. भांडणाचा आवाज ऐकल्यामुळे सासरा, मेव्हणा व सासु यांनी मयत सोमेशला घराबाहेर येऊन शिवीगाळ करून म्हणाले की, तु आमच्या मुलीवर विनाकारण आरोप घेतो. असे बोलुन मयत सोमेशला लथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. मयत सोमेशला पत्नी ही व्यवस्थित पाहत नाही. लक्ष देत नाही. वेळोवेळी अपमान करते. इतकेच नाही तर सासरा, मेव्हणा, सासु हे देखील मयत सोमेशचा अपमान करत. त्यामुळे मला जगावेशे वाटत नाही. असे मयत सोमेशने आपल्या भावाला सांगितले.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी मयत सोमेश व त्याचा भाऊ दोन बहिणी या सोमेशच्या सासरी आले व सोमेशच्या पत्नीला, सासऱ्याला, मेव्हन्याला, सासुला समजावुन सांगितले की, तुम्ही सोमेशला त्रास देऊ नका असे सांगुन निघुन गेले. मात्र, तरी देखील मयत सोमेशला पत्नीवर विषय काढल्यानंतर पत्नी, सासरा, मेव्हणा, सासु हे नेहमी मारहाण करतात. त्यामुळे, मयत सोमेशला सासरी राहवेसे वाटत नव्हते. परंतु, दोन मुलांमुळे रहावे लागते, माझा त्यांच्यात फार जीव आहे. त्यामुळे मी हतबल आहे. पण, मला सासरचे लोक फार त्रास देतात असे मयत सोमेश त्याच्या नातेवाईकांना सांगत होता. दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास मयत सोमेशच्या भावाला सोमेशच्या सासरकडुन फोन येतो की, मयत सोमेश खुप आजारी आहे. दरम्यान दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. तुम्ही लवकर या. मात्र, मयत सोमेश याचा भावाला व्हाट्सऍप वर मेसेज येतो की, संतोष शेळके, नाना शेळके, लता शेळके, कविता काकडे यांच्या वंगाळ संबंधाला विरोध होता त्यामुळे, त्यांनी मला मारहाण केली. म्हणुन मी आत्महत्या करत आहे. त्याखाली मयत सोमेशची सही होती.
मयत सोमेश काकडे यास त्याची पत्नी हिच्या वागण्याच्या कारणावरून सासरे नाना बापु शेळके, सासु लता नाना शेळके, मेव्हणा संतोष शेळके व पत्नी कविता सोमेश काकडे हे नेहमी मारहाण करत होते. त्यामुळे, मयत सोमेशला ती वागणुक अपमानास्पद वाटत असल्यामुळे त्याची नाचक्की होत होती. त्यामुळे, त्याने दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या पुर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर, मयत सोमेशच्या भावाने सर्व कैफियत पोलीस ठाण्यात सांगितले असता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कविता सोमेश काकडे, नाना बापु शेळके, लता नाना शेळके, संतोष नाना शेळके (सर्व रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले करत आहे.