अखेर 18 वषापुर्वी आईला नेणाऱ्याचे काम तमाम! बाप लेकासह आठ जणांना अटक, तो मेला की आहे? पोलिसांचे अपयश.!

- सागर शिंदे 

सार्वभौम (संगमनेर) :- 

गेल्या 18 वर्षापुर्वी बाळु सिताराम शितोळे (रा. येठेवाडी, ता. संगमनेर, जि. अ.नगर) याने सागर शिवाजी वाडगे (रा. येठेवाडी, खंदरमाळ, ता. संगमनेर) याच्या आईला त्याच्या घरी नेले होते. तेव्हापासून ती तिकडेच राहत होती. याचा राग सागरच्या मनात 18 वर्षे घर करुन होता. म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी त्याने बाळु शितोडे यास घुलेवाडी परिसरात पाहिले असता त्याच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. तर, त्याचे अपहरण करुन त्याला शिविगाळ, दमदाटी करुन पट्ट्याने मारहाण केली. तर, त्याचे वडिल शिवाजी वाडगे याच्यासह अन्य आठ जणांनी शितोळे यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना दगडाने ठेचून मारहाण केली. त्यांच्या शरिराची विल्हेवाट लावायची म्हणून दोन मित्रांनी शितोळे यांना रात्रीच्या वेळी प्रवरा नदीपात्रात फेकून दिले. आता त्यांची बॉडी जोवर सापडत नाही. तोवर पोलिसांनी आठ जणांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर, त्यांना अटक देखील केली आहे. खरंतर साक्षिदारांच्या माहितीनुसार शितोळे हे मयत झाले आहे. मात्र, जोवर ते सापडत नाही. तोवर पोलिस 302 नुसार गुन्हा दाखल करणार नाही. कारण, ते मयत घोषित केले आणि अचाकन ते आले तर संगमनेर पोलिसांची प्रचंड नाचक्की होईल. तर, कारवाईला देखील सामोरे जावे लागेल. त्यामुळे, तुर्तास तपास सुरू झाला असून या घटनेला नंतर वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. प्रकरणी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 11 ऑगस्ट 2022 रोजी पोलिसांना माहिती मिळाली. की, आदल्या दिवशी वेल्हाळे शिवारात खंडोबा मंदिर परिसरात एका व्यक्तीला मारहाण करुन त्यास प्रवरा नदिपात्रात फेकूण दिले आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा घटनास्थळी एका चारीमध्ये रक्ताने माखलेले दोन दगड आणि गवत अस्तव्यस्त झालेले दिसून आले. तेव्हा पोलिसांनी दोन प्रत्यक्षदर्शी साक्षिदार म्हणून दोघांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगितले, की आम्ही त्याच्यासोबत गेलो होता. मात्र, आरोपी सागर, मनोज आणि शुभम हे शितोळे यास मारहाण करीत होतो. त्यामुळे, आम्ही तेथून पळून आलो. तर, दुसर्‍या साक्षिदाराने सांगितले की, सागर वाडगे याला शितोळे याचा बदला घ्यायचा होता. त्यामुळे, त्याने त्यास खंडोबा मंदिराकडे नेले आणि त्यास मारहाण केली. हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही तेथून निघुन आलो. तर, तिसर्‍या साक्षिदाराने सांगितले. की, मनोज आणि शुभम हे माझ्या घरी आले होते. त्यांनी मला सांगितले की, शितोळे यास आम्ही रात्री प्रवरा नदीच्या पुलाहून खाली फेकून दिले आहे. अशा प्रकारे आठ जणांचा वेगवेगळा रोल दिसत असून साक्षिदारांच्या म्हणण्यानुसार पोलीस निरीक्षक यांनी फिर्याद दिली आहे.

या गुन्ह्यात मुख्य आरोपी सागर शिवाजी वाडगे (रा. येठेवाडी, ता. संगमनेर, जि. अ.नगर) आणि शिवाजी गेणुभाऊ वाडगे (रा. येठेवाडी) या बाप लेकांचा समावेश आहे. मात्र, अन्य आरोपी देखील 120 (ब) नुसार तितकेच दोषी आहेत. त्यात दत्ता वाडगे (रा. येठेवाडी), आण्णा वाडगे (रा. येठेवाडी), संपत मारुती डोळेझाके (रा. साकुर, ता. संगमनेर), मनोज एकनाथ चव्हाण (रा. पेमगिरी, ता. संगमनेर), शुभम सुनिल खताळ (रा. धांदरफळ, ता. संगमनेर), दाऊ ऊर्फ दिनेश बाळु जेधे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) अशा आठ जणांना सामावेश आहे. या गुन्ह्यात घटनेचे मुळ कारण फक्त आईला 18 वर्षेपुर्वी नेले होते. हेच असून बाळु शितोळे याच्यावर रोष व्यक्त केला आहे. ही एक गुंतागुंतीची फिर्याद दाखल झाली असून यात आता पुढे नेमकी काय वळण लागते. याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र, जोवर पोलिसांना बाळु शितोळे सापडत नाही. तोवर गुन्हा आणि तपास पुर्णत: व्हेंटीलेटरवर असणार आहे.  

120(ब) अन माफीचे साक्षिदार..!!

गुन्हा जरा गुंतागुंतीचा असला तरी फिर्याद वाचल्यानंतर अनेक गोष्टी लक्षात येतात. यात विशेष म्हणजे कलम 364 लागल्याने त्यात सक्षम पुराव्यांची जंत्री गोळा करावी लागणार आहे. तर, यात काही माफीचे साक्षिदार अशा प्रकारचा वास येऊ लागला आहे. अर्थात हा गुन्हा परिस्थितीजन्य पुराव्यांच्या जोरावर स्टॅण्ड राहणार आहे. त्यामुळे, जे काही साक्षिदार घेण्यात आले आहे. ते आरोपी यांच्याशी निगडीत असून ते किती ठाम राहतील हे फार महत्वाचे आहे. तर, घटना करताना यांनी एकसमान उद्देश ठेऊन संगमनमताने केला आहे. त्यामुळे, जी काही शिक्षा असेल ती सर्वांना सारखी लागू शकते. कारण, कलम 120(ब) हा गुन्ह्याचा एकत्रीत स्वरुप स्पष्ट करतो आहे. त्यामुळे, जसे कोपर्डी खटल्यात मुख्य आरोपीने घटना केली आणि अन्य दोघांची काही अंशी अप्रत्यक्ष हस्तक्षेप होता. त्यांना कलम 120(ब) प्रमाणे आरोपी करण्यात आले होते. त्यांना देखील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे, या घटनेत परिस्थितीजन्य पुरावे महत्वाचा दुवा ठरणार आहे. तसेच आरोपी यांनी तथा सहआरोपींनी घटना घडल्यानंतर असे काही घडलेच नाही हे दडविण्यासाठी तथा आरोपींना वाचविण्यासाठी (कलम 201) पुरावे नष्ट केले आहे. त्यातील महत्वाची बाब म्हणजे व्यक्तीच्या बॉडीची विल्हेवाट लावली आहे. तीच बॉडी तीन दिवस होऊन देखील पोलिसांना सापडली नाही हे पोलिसांचे फार मोठे अपयश आहे. त्यामुळे, घटना घडली माहित आहे. तरी देखील पोलीस हतबल झाले हे देखील त्यांचे अपयश म्हणावे लागेल. उद्याच्या काळात याचा कोर्टात फायचा हा आरोपींना होऊ नये म्हणून तापसी अधिकार्‍यांनी काळजी घेतली पाहिजे असे कायदेतज्ञांचे मत आहे. 

खून असून अपहरण...

खरंतर गुन्ह्याची हकीकत पाहिली आणि संपुर्ण घटनाक्रम पाहिला तर सरळसरळ बाळु शिरोळे यांचा खून झाल्याचे नमुद आहे. मात्र, तरी देखील कलम 302 नुसार गुन्हा न नोंदविता कलम 307, 364, 120 (ब), 201, 323, 504 नुसार गुन्हा नोंदविला आहे. अर्थात माणूस मेल्यानंतर देखील त्याचा हाफ मर्डर हा कलम जर मजेशीर वाटतो आहे. मात्र, पोलिसांनी घेतलेली भुमिका कायद्याच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे. कारण, आरोपी जरी सांगत असले की, आम्ही त्याला मारुन प्रवरा नदीत फेकले आहे. मात्र, जोवर शिरोळे यांचा मृतदेह सापडत नाही. तोवर या गुन्ह्यात 302 कलम लागणे शक्य नाही. कारण, तो जोवर मिळत नाही तोवर तो जिवंत आहे असे कायदा सांगतो. तर, कायद्याला भावना चालत नाही त्यासाठी वास्तव असले तरी त्यासाठी कागदी पुरावा असणे गरजेचे आहे. कालांतराने यात परिस्थितीजन्य पुराव्यांचा वापर किती पद्धतशिरपणे होतो. हे पहाणे महत्वाचे आहे. अन्यथा जवखेडे खालसा प्रकरणात तिघांच्या खांडोळ्या करुन विहीर आणि बोअरवेलमध्ये टाकले तरी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आभावाने तिघे आरोपी निर्दोष सुटले. तर, परिस्थितीजन्य पुराव्यामुळेच कोपर्डीच्या घटनेत तिघांना फाशी झाली. त्यामुळे, पोलिसांना हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी फार मोठा कस लावावा लागणार आहे. यात खुद्द पोलीस फिर्यादी झाले असून फिर्याद, तपास, चौकशी आणि पुरावे गोळा करण्यासाठी फारसा कस लावलेला दिसत नाही. तर, कलम 302 च्या दृष्टीने बॉडीचा शोध घेणे, त्यासाठी आवाहन करणे, प्रतिकात्मक फोटो सोशल मीडियावर टाकणे, नदीत गोताखोर लावून शोध घेणे या दृष्टीने हलचाली झाल्याचे अद्याप पहायला मिळाले नाही. त्यामुळे, 302 च्या दृष्टीने तपास झाला नाही तर 364 नुसार काय होईल हे नव्याने सांगण्याची गरज नाही..!!

हेबियस कॉर्पसची चर्चा..!!

ही घटना दि. 10 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यानंतर पोलिसांना माहिती झाल्यानंतर त्यांनी त्या दिवसापासून काही संशयीतांना ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू केला. जसजसा घटनाक्रम उघड होत गेला तसतसे संशयीत वाढत राहिले. मात्र, 24 तास उटून देखील संशयीत म्हणून त्यांना ताब्यात ठेवणे हे देखील कायद्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. अशा वेळी 24 तासानंतर जर ताब्यात असणार्‍या एका व्यक्तीच्या घरच्यांनी तथा नातेवाईकांनी न्यायालयात धाव घेतली असती. तर, पोलिसांनी पळता भुई थोडी झाली असती. म्हणजे पोलिसांनी एकतर काही का होईना तत्काळ गुन्हा दाखल करावा लागला असता किंवा संबंधित व्यक्तींना अटक तरी दाखवावी लागली असती. म्हणजे, ताब्यात असणार्‍या व्यक्तीला डांबुन ठेवले असेल तर त्यास तत्काळ न्यायालयासमोर हजर करावे लागते. यालाच तर हेबियस कॉर्पस म्हणतात. त्यामुळे, संगमनेरात याबाबत चांगलीच चर्चा सुरू होती. तर, संशयीत टपरीवर चहापाण करायल येत होते. इतके फ्री वातावरणात त्यांच्यावर नजर होती. मात्र, गुन्हा दाखल नाही, तपास आणि चौकशी युद्धपातळीवर सुरू, असला अनोखा प्रकार आणि तपास संगमनेरात पहिल्यांदा पहायला मिळाला. खरंतर, अशा प्रकारात देखील न्यायालयाची परवानी घेणे अपेक्षित असते. मात्र, गुन्हात हकनाक कोणाचे नाव गोवले जाऊ नये याची शाश्वती होण्यासाठी असेल पाऊल महत्वाचे म्हणले तरी अक्षेप घेण्याचे काही कारण वाटत नाही...!!