आईच्या प्रियकराला बाप-लेकाने ठेचून मारले.! मृतदेह प्रवरेत फेकला.! आरोपी ताब्यात पण गुन्हा कोणता नोेंदवायचा पोलिस संभ्रमात...!!
सार्वभौम (संगमनेर) :-
पोटचे लेकरू आणि धर्माच्या पतीला सोडून तिने प्रियकरासोबत संसार थाटला. पण, लेकरु मोठं झालं आणि अचानक त्याच्यासमोर आपला सावत्र बाप आला. त्याने मित्रांना बोलविले आणि थेट त्याचे अपहरण केले. हाच का तो हे विचारण्यासाठी मुलाने बापाला व्हिडिओ कॉल केला आणि खात्री पटताच बेदम मारहाण केली. नंतर बाप देखील तेथे आला आणि त्याने आपल्या पत्नीच्या प्रियकराला ठेचून मारले. मृताची विल्हेवाट कोठे व कशी लावायची? म्हणून त्यास कापडात गुंडाळून प्रवरा नदीपात्रात फेकूण दिले. ही घटना म्हणजे काही चित्रपटाची कहानी नाही. तर, प्रत्यक्षात संगमनेर शहरात दि. 10 आणि 11 ऑगस्ट 2022 रोजी घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात काही जणांनी संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, हे अपहरण म्हणून नोंदवायचे की खुनाचा गुन्हा नोंदवायचा? याबाबत पोलिसांमध्ये अद्याप संभ्रम आहे. यात व्यक्तीचे प्रेत सापडले नसल्याने कलम 302 नुसार गुन्हा नोंदविणे पोलिसांना जड वाटू लागले आहे. त्यामुळे, या प्रकारणात कलम 364 (अ)(अपहरण) नुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
ही एक 18 वर्षे पुर्वीची प्रेम कहाणी आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागावर असणार्या येठेवाडी येथे एक सामान्य जोडपं रहात होते. त्यांना एक मुलगा देखील झाला होता. मात्र, त्यांच्या संसारावर शिरोळे नामक व्यक्तीची वक्रदृष्टी पडली आणि त्याने संबंधित महिलेला प्रेमाची साद घातली. मी लग्न करीत आणि आयुष्यभर साथ देईल. तसे झाले देखील, हे पळून गेले आणि त्यांनी सगळं विसरुन 18 वर्षे आपला संसार सुखाने थाटला होता. पण, अनैतिकतेचा कलंक कधी पुसला जात नाही, तेच यांच्याबाबत देखील झाले. तब्बल 18 वर्षाने मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या आईचा इतिहास समजला. तो गेल्या काही दिवसांपासून आपल्या आईला पळवून नेणार्या शिरोळेचा शोध घेत होता. पण, योग्यवेळ त्याला कधी सापडली नाही. ना कधी शिरोळे समोरासमोर आला. त्यामुळे, सगळा रोष मुलाने गिळून ठेवला होता. तर, बायको पळून गेल्यानंतर बापाची नाचक्की तर झालीच होती. पण, रोष देखील प्रचंड साठलेला होता.
त्या दिवशी निमित्त होते संगमनेर तालुक्यातून रेल्वे जाणार म्हणून ज्या जमिनींचे अधिग्रहण झाले आहे. त्या शेतकर्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. म्हणून हा मुलगा देखील तेथे आला होता. तर, त्याच वेळी शिरोळे देखील घुलेवाडी परिसरात आला होता. जेव्हा या मुलाने आपण लहान असताना आपल्या आईला पळवून नेणार्या व्यक्तीला पाहिले. तेव्हा त्याच्या तळपायची आग मस्तकात गेली आणि त्याने आपल्या काही मित्रांना तेथे बोलावून घेतले. या मानसाने माझ्या आईला माझ्यापासून हिरावून घेतले आहे. त्यामुळे याला जरा चोप द्यायचा आहे असे म्हणून त्याला घुलेवाडी परिसरातून उचलले आणि मारुती शोरुमच्या मागे असणार्या एका मंदिर परिसरात नेले. तेथे नेवून त्याने आपल्या वडिलांना व्हाटसअॅपहून व्हिडिओकॉल केला. हाच आहे का तो व्यक्ती? ज्याने माझ्या आईला पळवून नेले होते. तेव्हा तिकडून बापाचे उत्तर आले. होय.! हा तोच व्यक्ती आहे. याला चांगला बेदम चोप दे.! मी येईपर्यंत त्याला सोडू नको...!!
दरम्यान, मुलगा हा एका फायनान्स करणार्या मुलांच्या संपर्कात होता. पठार भागावर कोणाच्या गाड्या उचलुन न्यायच्या असेल तर हा मुलगा लोकेशन देत होता. घरांची माहिती देत होता. हाप्ते काढून द्यायला आणि अन्य कामासाठी मदत करायचा. त्यामुळे, हा फायनान्सवाले कर्मचारी चांगले मित्र झाले होते. त्यांनीच शिरोळेला बेदम मारण्यासाठी मदत केली. हा प्रकार 10 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडला होता. तेव्हा व्हाटसअॅपहून व्हिडिओकॉल पाहून मुलाचा बाप आणि चुलत भाऊ देखील तेथे आले होते. त्याने शिरोळे यास पाहिले आणि बेभान होऊन त्यांनी यास मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तेथे एक खड्डा होता त्यात ही दोघे पडली. त्यावेळी पत्नीला पळवून नेल्याचा इतका रोष होता. की, त्याने जवळ पडलेला दगड उचलला आणि थेट शिरोळेच्या डोक्यात टाकला. त्यावेळी त्याची कोणतीही हालचाल झाली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो तेथेच मयत झाला होता.
दरम्यान, आता त्याचा मृत्यु झाला अशी त्यांची खात्री झाली असावी. पण मग या व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची तरी कशी? माग, या मुलाच्या दोन मित्रांनी त्यांना मदत केली. रात्री यांनी ही बॉडी एका कापडात गुंडाळली आणि गाडीत भरली. तेथून यांनी थेट संगमनेर-पुणे रोडवर असणारा प्रवरा नदिवरील मोठा पुल गाठला. पुलावर कोणी येणार नाही अशी परिस्थिती पाहून शिरोळे यांची बॉडी पाण्यात फेकून दिली आणि ते चालते झाले. त्यांना असे वाटले होते. की, झाले गेले आता ही हत्या आपण पचविली. मात्र, हा प्रकार एका व्यक्तीने पाहिला आणि त्यांनी एका मध्यस्तीच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक यांच्या कानावर घातला. ही घटना खरी आहे का? याचा शोध घेण्यासाठी संगमनेर पोलिसांच्या टिमने दि.11 ऑगस्टपासून शोधयंत्रणा राबविली. त्यानंतर यात तत्थ्य आढळून आले. घटनास्थळी काही संशयीत गोष्टी मिळून आल्या घटनाक्रम खोटा नसून असे काही घडले आहे. हे देखील त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तब्बल आठ जणांना ताब्यात घेतले आहे. तर यात अन्य व्यक्तींचा सहभाग आहे. मात्र, त्यांचा या गुन्ह्यात रोल काय? याची निच्छिती करुन आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.