पोटच्या लेकानेच घेतला आईचा जीव.! भावाचाही जीव घेण्याचा प्रयत्न, घरात रक्ताचे थारोळे, गुन्हा दाखल, आरोपी अटक.!
लहान मुलास औषध पाजण्याच्या कारणाहून पतीपत्नी यांच्यात वाद झाले. हे वाद टोकाला जाण्यापुर्वी आई सोडविण्यासाठी गेली असता मुलाने तिला धक्काबुक्की करून तिच्याच डोक्यात खोरे टाकून ठार मारले. ही घटना अकोले शहरातील सुभाष चौक परिसरात गुरूवार दि. 11 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात पमाबाई किसन पवार (वय 48) हिचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी विनोद किसन पवार (वय 26) याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात कलम 302 व 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विनोद याने त्याचा मोठा भाऊ याच्यावर देखील जिवघेणा हल्ला केला असून जखमी भावावर उपचार सुरू आहेत. आरोपी हा दारु पिला होता, त्यामुळे, नशेत त्याने अशा प्रकारची घटना केल्याने दारु ही किती घातक आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण, त्याला आता वर्षानुवर्षे जेलमध्ये बसावे लागणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरूवार दि. 11 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी विनोद हा दारु पिवून घरी आला होता. घरात लहान बाळ असल्यामुळे त्याला औषध पाजण्याहून त्या दोघांमध्ये वाद झाले. हे वाद टोकाला गेल्यामुळे दारुड्या विनोदने त्याची पत्नीस मारहाण सुरू केली. आता हा प्रकार विनोदच्या आईने पाहिला असता अधिक प्रश्न वाढू नये म्हणून ती प्रंजळ भावनेने पतीपत्नीच्या वादात गेली आणि तिने विनोदला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा गडी तराट असल्यामुळे, त्याने आईला देखील धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यास सुरूवात केली. हा गडी आई आणि पत्नीला ऐकत नाही म्हणून घराच्या शेजारीच राहणारा त्याचा मोठा भाऊ संतोष पवार हा मध्ये आला. त्याने देखील विनोदला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तरी देखील घरात राडा सुरूच ठेवला.
दरम्यान, आई त्यास समजून सांगत होती, तोच याने शेजारी पडलेला खोरे (फावडे) उचलले आणि थेट आईच्या डोक्यात मारले. काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात त्याची आई पडली. तर, दुसर्या क्षणी तेच खोरे आरोपी विनोद याने मोठा भाऊ संतोष याच्या डोक्यात मारले. मात्र, त्याने प्रसंगावधान राखून तो वार चुकविला. मात्र तरी देखील डोक्यात खोलवर जखम झाली. डोक्यातून प्रचंड रक्त वाहू लागले. हा प्रकार पाहिल्यानंतर आरोपी विनोद याने तेथून पळ काढला आणि तो पसार झाला. मात्र, आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून संतोषने स्वत:ला सावरले आणि आपल्या जवळच असणार्या चालत भावांच्या सहायाने आईला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. तिला गाडीवर टाकले तेव्हा तिची जरा देखील हलचाल होत नव्हती. मात्र, तरी देखील अकोले ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल केले. मात्र, त्यांनी तात्पुरता उपचार केला आणि पुढे हलविण्यास सांगितले.
दरम्यान, काही झालं तरी आई ती आई असते. त्यामुळे, ती वाचली पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, संगमनेर गाठण्यापुर्वीच तिने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे, तिला पुन्हा अकोले ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. तेथे खात्री केली असता महिला मयत झालेली होती. त्यानंतर वैद्याकीय अधिकार्यांनी पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेची चौकशी केली आणि जखमी असलेले संतोष पवार यांच्या फिर्यादीहून विनोद पवार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या पथकाने विनोदला अटक देखील केली आहे. तर, त्यास न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र, या घटनेमुळे अकोले शहरात दु:खाचे वातावरण पसरले आहे.