बाप रे.! 68 शेतकर्यांची 4 लाखांना फसवणुक.! पिक विमा ई-सेवा केंद्रावाल्याने घशात घातला.! दोघांवर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमेनर तालुक्यातील 68 शेतकर्यांचे पिक नुकसान भरपाईचे 4 लाख रुपये दोन ई-सेवा केंद्रावाल्यांनी स्वत:च्या घशात घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 2018 ते 19 या दरम्यान घडली होती तर अनुदान आपल्या खात्यावर आले नाही हे 2021-22 रोजी लक्षात आल्यानंतर शेतकर्यांनी थेट तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी घटनाचे चौकशी केली असता यात दोघे दोषी आढळले असून त्यांच्यावर गोसावी यांनी स्वत: फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे. प्रसन्न गोरे व प्रविण सुधाकर ताजणे (रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) अशी आरोपी करण्यात आलेल्या ई-सेवा केंद्र चालक मालकांची नावे आहेत. तर, कडूकाळ दिवसात शासनाने दिलेला शेतकर्यांच्या तोंडातला घास काढून स्वत:च्या घशात घालणार्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते सुशांत आरोटे साहेब यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 12 ऑगस्ट 2020 रोजी विनोद सुर्वे (रा. जवळे कडलग. ता. संगमनेर) या जागरुक शेतकर्याने तालुका कृषी अधिकार्याकडे तक्रार केली होती. त्यात म्हटले होते. की, सन 2018 मधील रब्बी अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी व 2019 मधील खरीप बजाज अलाईन्स कंपनी यांचेकडे पिकविमा उतरविला होता. त्याची रक्कम मिळावी असा अर्ज तालुका कृषी अधिकार्याकडे करण्यात आला होता. मात्र, त्यात काही अफरातफर झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी पिक विमा तक्रार निवारण समिता तथा तहसिलदार अमोल निकम यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यांनी तो अर्ज दि. 26 ऑगस्ट 2020 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला. त्यांनी दि. 11 जुलै 2022 रोजी तालुका कृषी अधिकार्यांना आदेश दिला. की, तुम्ही ई-सुविधा केंद्र चालविणार्यांच्या विरोधात फौजदारी करावाई करावी. त्यानंतर तालुका कृषी अधिकार्यांनी त्यांवर अवलोकन करून आपले सरकार सेवा केंद्र चालक (मोमीनपुरा संगमनेर) येथील प्रविण सुधाकर ताजणे यांच्यावर कारवाई सुरू केली.
दरम्यान, या सेवाकेंद्र चालकाने सन 2018-19 मध्ये रब्बी हंगामात 62 शेतकर्यांचे पिक विमा एकुण 3 लाख 71 हजार 21 रुपये व 2019-20 मधील खरीप हंगामातील 6 शेतकर्यांचे फळपिक विमा 30 हजार 673 रुपयांचे पिकविमा हाप्ता नोेंदविला होता. तर, याबाबत शेतकर्यांना त्याने बनावट पावत्या दिल्या होत्या. त्यानंतर चौकशी केली असता असे लक्षात आले की, शेतकर्यांनी जी पिक विम्याची रक्कम भरली होती. ती या लुटारूंनी शासनाकडे किंवा संबंधित कंपन्यांकडे जमा केली नाही. तर, ती स्वत:च्या फायद्याकरीता वापरली. तर, शेतकर्यांनी बनावट पावत्या देऊन त्यांची फसवणुक केली आहे. त्यामुळे, आपले सरकार ई सेवा केंद्र मालक प्रसन्न गोरे व चालक प्रविण ताजणे यांच्या विरोधात तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी यांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी अशा एक ना दोन तब्बल 68 शेतकर्यांना गंडा घालुन त्यांचे 4 लाख 16 हजार रुपयांचे नुकसान केले आहे.
शेतकर्यांनी काळजी घ्यावी
जवळजवळ 68 शेतकर्यांची फसवणुक झाली आहे. जेव्हा शेतकर्यांची तक्रार आली तेव्हा पोर्टलवर ऑनलाईन मेन्यु तापसून शहनिशा केली असता नो पॉलिसी फाऊन्ड, प्लिझ चेक अॅण्ड रिट्राय असा संदेश प्राप्त होत होता. त्यानंतर संबंधित रिसिप्ट आणि र्ई.सेवा केंद्र यांची चौकशी केली. तसेच अनेक शेतकर्यांच्या रिसिप्ट चेक केल्या असता एकाच नंबर अनेक शेतकर्यांना दिल्याचे लक्षात आले. त्यामुळे, हा बनावट प्रकार केल्याचे समोर आले. आता चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे. पुरावे देखील पोलिसांना दिले आहे. शेतकर्यांना लुटणार्या, त्यांची फरवणुक करणार्यांना चांगली शिक्षा होईल असा तपास करुन शेतकर्यांना न्याय दिला पाहिजे. मला अपेक्षा आहे असे होईल. तर शेतकर्यांनी अशी कोणाची फसवणुक होणार नाही याची काळजी घ्यावी तर काही अन्याय झाल्यास माझ्याशी संपर्क साधावा.
- प्रविण गोसावी (कृषी अधिकारी, संगमनेर)
अखेर न्याय मिळाला..!
कोरोनाच्या कडूकाळ दिवसात शेतकरी पिचला होता. त्याला मदतीची गरज असताना कंपनी आणि शासनाने हात पुढे केला होता. मात्र, काही लुटारूंनी शेतकर्यांच्याच तोंडातला घास ओढला आहे. एकीकडे संगमनेरात पिकांच्या व शेती अवजारांच्या चोर्या होत आहेत. तर, दुसरीकडे अशा पद्धतीने शेतकर्यांची फसवणुक होत आहे. असे होत असेल तर कसा शेतकरी उभा राहील. 2018 साली झालेल्या अन्यायाला वाचा फोडता-फोडता शासनाने 2022 उजडविले. आता या नुकसान भरपाईची रिकवरी व्हावी हीच अपेक्षा आहे. तर, गेल्या कित्तेक दिवसांपासून धुळ खात पडलेले हे प्रकरण तालुका कृषि अधिकारी प्रविण गोसावी साहेब यांनी मार्गी लावले. त्यामुळे, त्यांच्यामुळे न्याय मिळाल्याने शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
- विनोद गोडसे (शेतकरी)