चेअरमन होण्यासाठी पिचड साहेब व दादासाहेब रूपवते यांचे शरद पवारांसमोर जातीहून खडाजंगी.! बहुजनांचा चेअरमन त्यांना आवडत नाही.!

 

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

            अगस्ति सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी दादासाहेब रुपवते, मधुकर पिचड, भाऊसाहेब हांडे यांच्यासह अनेकांचे फार मोठे योगदान आहे. तो इतिहास आपल्यासामोर मांडला जाईल. परंतु, दादासाहेब रुपवते यांना चेअरमन पदाहून हटवून स्वत: चेअरमन होण्यासाठी पिचड साहेबांनी दादासाहेबांना जातीवाचक शिविगाळ केल्याचे अशोक भांगरे यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. त्याबाबत काही प्रत्यक्षदर्शी व्यक्ती आणि इतिहास तपासला असता त्यात काही अंशी तत्थ्यता असल्याचे अनेक अभ्यासकांचे मत आहे. इतकेच काय.! दादासाहेबांनी देखील पिचड साहेबांनी अपशब्द वापरल्याचे सांगण्यात येते. त्याबाबत हा लेख मांडत आहे. खरंतर, काही प्रत्यक्षदर्शी व्यक्ती, तालुक्यातील जुनी जाणकारी मंडळी यांच्या मुलाखती घेऊन ही माहिती आपल्यासमोर मांडली जात आहे.

अगस्ति कारखाना उभा करण्यासाठी 1972 पासुनचे तीन प्रस्ताव नामंजुर झाल्यानंतर 1988 साली भाऊसाहेब हांडे हे मुख्य प्रवर्तक असलेला प्रस्ताव सारख संचालक पुणे येथे दाखल झाला.  त्याला 1989-90 साली मंजुरी मिळाली आणि सिताराम पाटील गायकर, मिनानाथ पांडे, यादवराव वाकचौरे यांच्यासह काही व्यक्तींनी पुण्याहून धुमाळ यांच्या सहीचे मंजुरीपत्र हाती घेतले. त्यावेळी, चेअरमन कोणी व्हायचे, येथून सुरूवात झाली होती. तेव्हा, शरदचंद्र पवार साहेब  यांनी पिचड साहेबांना सांगितले. की, रूपवते यांचे देखील त्यात मोठे योगदान आहे. त्यामुळे, कोणताही वाद न करता दादासाहेब रुपवते यांना पहिले चेअरमन करा. तेव्हा ठरल्याप्रमाणे दादासाहेब रुपवते हे 1991 साली शासन नियुक्त मंडळात चेअरमन झाले, तर भाऊसाहेब हांडे हे व्हा.चेअरमन झाले. बाकी, पिचड साहेब, सुगंधराव देशमुख, किसन आरोटे, मिनानाथ पांडे, सिताराम पाटील गायकर, तुकाराम मालुंजकर, रावसाहेब शेटे, सुधाकर देशमुख, सयाजीराव देशमुख, कचरुपाटील शेटे, किसन सदगिर रभाजी आंबरे असे काही संचालक मंडळ होते. तेव्हा 1992 साली शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते कारखान्याचे भुमिपूजन झाले. मात्र, जसजशी मुळ कारखान्याच्या कामाची उभारणी सुरू झाली. तेव्हापासून पिचड आणि रुपवते यांच्यात एकवाक्यता राहिली नाही. टेंडर देणे, मशिनरी खरेदी करणे, वेगवेगळ्या कंपन्यांना कामे देणे याहून यांच्यात प्रचंड मतभेद होत होते. यांच्यातील हा वाद प्रचंड टोकाचा होत होता. तेव्हा सहा महिन्यातच इतका वाद झाला होता. की, पिचड साहेबांचे निष्ठावंत या मंडळात होते. त्यांना काढून टाकण्यात आले. तर, भाऊसाहेब हांडे यांनी त्यांच्या समर्थनातील काही लोक घेतले होते. त्यानंतर पुन्हा हे मंडळ कार्यरत झाले. त्यात देखील रुपवते हे चेअरमन तर हांडे व्हा.चेअरमन होते.

त्यानंतर, पिचड साहेबांनी त्यांना चेअरमन पदाहून हाटविण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. काही व्यक्तींनी हांडे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. हा वाद इतक टोकाला गेला. की, तो मिटविण्यासाठी थेट शरद पवार साहेब यांच्या दालनात सर्वांना बसावे लागले. त्यावेळी त्याकाळचे सहकारमंत्री शिवाजीराव देशमुख हे देखील तेथेच होते. पिचड साहेब आणि दादासाहेब रुपवते यांच्यात इतकी  भांडणे झाली. की, त्यांनी अक्षरश: एकमेकांना जातीहून शिविगाळ केल्याचे प्रत्यक्षदर्शी कचरुपाटील शेटे सांगतात. त्यावेळी, पवार साहेबांनी दोन्ही नेत्यांना आकळविले. तर, भाऊसाहेब हांडे यांनी तेव्हा दादासाहेब रुपवते यांची समज घातली. यांना चेअरमन व्हायचे आहे. त्यामुळे, हा उपद्याप सुरू आहे. त्यामुळे, तुम्ही राजिनामा देऊन टाका अन मी देखील राजिनामा देतो. यांच्यातील हा वाद अक्षरश: अकोले तालुक्यातून राज्याच्या मंत्रालयात जाऊन पोहचला होता. त्यानंतर हे राजिनामा देतील अशा प्रकारची परिस्थिती मुद्दाम तयार करण्यात आली होती. दोन्ही मागासवर्गीय नेते एकमेकांना भिडल्याने त्या दिवसापासून कधीही येथे बहुजन नेतृत्वाचा चेअरमन पदी उदय होऊ दिला गेला नाही.

त्यानंतर, मिनानाथ पांडे म्हणतात की, आम्ही पिचड साहेबांचे निष्ठावंत होतो. तरी देखील वास्तव सांगितले पाहिजे. ते असे की, पिचड साहेबांनी दादासाहेब रुपवते यांना न सांगता नव्याने मंडळ स्थापन केले. त्यात ते स्वत: चेअरमन झाले. तर सिताराम पाटील गायकर यांना व्हा. चेअरमन केले. तेव्हापासून ते आजवर अगस्ति सहकारी साखर कारखान्यात कधीच बहुजन समाजाचा चेअरमन होऊ शकला नाही. जर, दादासाहेब रुपवते यांच्याकडे अधिक काळ कारखान्याचा कारभार राहिला असता तर त्यांनी तेव्हाच भाऊसाहेब हांडे यांना किंवा त्यांच्यानंतर सिताराम पाटील गायकर यांना चेअरमन केले असते. मात्र, दादासाहेबांच्या नंतर जे पिचड साहेब कारखान्यात चेअरमन म्हणून बसले तर आजवर त्यांनी कधी बहुजन समाजास संधी दिली नाही. दादासाहेब रुपवते हे अनुसुचित जातीतून होते. त्यांना तालुक्याने काही दिले नव्हते. मात्र, ते भुमिपूत्र असल्याने त्यांना अकोल्याविषयी आत्मीयता होता. म्हणून विधानपरिषदेतून जाऊन त्यांनी अकोल्यासाठी कॉलेज, कारखाना, दुधसंघ, अकोल्याचा पुल यांसह अन्य संस्था व विकासासाठी मोठे योगदान दिले. मात्र, त्यांना पाच वर्षे देखील चेअरमन ठेवण्याची मानसिकता पिचड साहेबांनी दाखविली नाही. अशोकराव भांगरे यांनी कोतुळच्या सभेत जो पिचड-रुपवते यांच्या वादातील धेडपट नावाचा उल्लेख केला होता. त्याची पार्श्वभूमी केवळ काही मतभेद आणि चेअरमन पदाहून झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.