पर्यटकांची गाडी वाहुन गेली, काँग्रेसच्या झेडपी अध्यक्षाच्या मुलासह दोघांचा मृत्यू, एक बचावला.!

 

संग्राही चित्र

- सचिन भवारी

सार्वभौम (वारंघुशी/राजूर) :-

       अकोले तालुक्यातील भंडारदरा, वारंघुशी, बारी, वाकी हा परिसर हिरवाईने नटला असून राज्यातून पर्यटक अकोल्याच्या दिशेने येत आहेत. कोठे पाण्याचा अंदाज नाही तर कोठे दरीचा ठाव नाही. त्यामुळे, वारंघुशी फाटा परिसरात पर्यटकांची गाडी वाहुन गेली असून त्यात दोन पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, एकाना प्रसंगावधान राखुन स्वत:ची सुटका केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. रात्रीची वेळ असल्यामुळे, ही घटना लवकर लक्षात आली नाही. परंतु, गाडी पाण्यात गेल्यामुळे, फक्त तिची मागची बाजु पाण्यातून वर दिसत होती. स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टरच्या सहायाने गाडी ओढून काढली असून रात्री 12 वाजेपर्यंत यात कोण-कोण आहे. हे शोधकाम सुरू होते. यात अ‍ॅड. आशिष प्रभाकर पालोदकर (वय 34, रा. पोलाद, ता. सिल्लोड. जि. औरंगाबाद) व रमाकांत प्रभाकर देशमुख (वय 34, रा. ताड पिंपळगाव ता. कन्नड, जि.औरंगाबाद) या दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनंता रामराव मगर (रा. शिंगी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) हे सुर्दैवाने बचावले आहेत. यातील आशिष हा काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पालोदकर यांचा धाकला मुलगा होता. या घटनेने हळहळ व्यक्त केली असली तरी. येणार्‍या काळात भंडारदरा परिसरात अधिक गर्दी होणार आहे. त्यामुळे, पर्यटकांनी स्वत:ची व दुसर्‍याचा जीव जाऊ शकतो. अशा प्रकारचे वर्तन करुन नये. असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे. दरम्यान,  गाडीत चौघेजण होते, त्यातील दोघांचा मृतदेह मिळून आला आहे. तर, तिसरा व्यक्ती सुखरुप आहे. मात्र, चौथ्या व्यक्तीची अद्याप शोध लगलेला नाही. रात्री ९ पासून ते अद्याप पावेतो चौथ्या व्यक्तीला शोधण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे, आपत्ती व्यवस्थापन विभागाने पानबुडी आणि गोताखोर यांना घटनास्थळी पाचारण केले आहे. अद्याप एका व्यक्तीचा शोध घेणे सुरु होते. पण, तो मिळून आलेला नाही. शक्यतो हा देखील व्यक्ती मयत झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा व्यक्ती आढळला तर मृतांची संख्या तीन होऊ शकते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे, भंडारदारा पानलोट क्षेत्रात चांगलाच पाऊस असल्यामुळे हा परिसर हिरवाईने नटला आहे. अकोले हे मिनी जम्मू कश्मिर म्हणून ओळखले जाते. ते पाहण्यासाठी राज्यातून पर्यटक अकोल्याकडे यात असतात. असेच औरंगाबाद येथील काही तरूण निसर्ग पाहण्यासाठी आले होते. शुक्रवारी रात्री 8:30 वाजता ते वारंघुशी परिसरात आल्यानंतर त्यांना येथील रस्त्यांबाबत फार काही माहिती नव्हती. त्यामुळे, वाहन चालकाने पेंडशेत परिसरात गाडी घातली. मात्र, गाडीचा रस्ता चुकला आणि गाडी थेट खोल पाण्यात गेली. पाण्याचा प्रवाह आणि पुढे मशिन असल्यामुळे गाडीचे तोंड खाली बुडाले. तर फक्त मागिल बाजु रस्त्याहून दिसत होती.

दरम्यान, हा प्रकार एका स्थानिक नागरिकाने कालांतराने पाहिला असता तत्काळ त्यांनी गावातील नागरिका जमा केले. तर, यातील एक तरुण अनंता मगर हे देखील कसेबसे गाडीतून बाहेर पडले होते. नंतर, स्थानिक लोकांनी गावातील ट्रॅक्टर आणून गाडी ओडून काढण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नानंतर यश देखील आले. परंतु, गाडीत कोण व किती लोक होते. हे सांगण्या इतपत देखील बचावलेले अनंता मगर यांची मानसिकता नव्हती. ते पुर्णत: भेदरून गेेले होते. त्यानंतर नागरिकांनी राजूर पोलिसांनी संपर्क करुन माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळाकडे रवाणा झाले. तोवर दोघांचा मृतदेह होती लागल्यामुळे नागरिकांनी त्यांचे खिसे तपासले असता त्यात काही ओळखपत्र मिळून आले. त्यानंतर या दोघांची देखील ओळख पटली आणि नंतर त्यांच्या कुटुंबियांना संपर्क करण्यात आला. दोघांवर सकाळी त्यांच्या गावाकडे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

सावधान.!

पर्यटकांना विनंती आहे. की, अकोल्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे, रस्त्याहून जोराने पाणी वाहते आहे. रस्ते अरुंद असून त्यावरील पुल देखील छोटो-छोटे आहे. परिणामी डोंगर दर्‍यांमधून येणार्‍या पाण्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही. त्यामुळे, कोणी धाडसाने गाड्या काढण्याचा प्रयत्न करू नये, कोणी स्टण्ट करु नये. जेथे धोका आहे अशा ठिकाणी जाऊ नये. सेल्फीच्या नादात दरी, पाणी, भिंती, ओढे, झाडे या ठिकाणी धाडसाचे प्रयोग करु नये. काही रस्ते नव्याने झाल्यामुळे, त्यावर बारीक कच आहे. त्यामुळे, वाहन वेगाने असताना ब्रेक दाबला तर बर्‍याच गाड्यांचे अपघात होताना दिसले आहे. त्यामुळे वाहने सावकाश चालवावीत. ज्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध आहे. तेथे जाण्याचे धाडस करु नये. काही अक्षेपहार्य किंवा संशयीत वाटले तर तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा.

- नरेंद्र साबळे (राजूर पोलीस अधिकारी)

सन्मान देतो- मान ठेवा

पर्यटकांनी भंडारदारा कळसुबाई, रतनवाडी अशा निसर्गमय परिसरात येताना कोणत्याही प्लॅस्टिकच्या पिशव्या आणु नयेत. तसेच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येताय तर दारुच्या बाटल्या आणि मद्यपान करून निसर्गाच्या सौदर्याचा विपर्यास करु नये. आदिवासी बांधव हे प्रचंड सहकार्यवादी व प्रमाणिक आहेत. त्यामुळे, त्यांच्याशी माणूस म्हणून वागा. त्यांच्या स्टॅलवर वाद घालुन चारदोन रुपयांसाठी भांडू नका. हे चारदोन महिने त्यांच्यासाठी उपजिविकेचे तथा रोजगाराचे असता. त्यामुळे, शुल्लक कारणाहून शिविगाळ, दमदाट्या आणि मारामार्‍या करु नका. तसे झाल्यास कायदेशिर कारवाईला सामोरे जावे लागेल. परंतु, पर्यटक हे अतिथि आहेत. त्यांचा आम्ही सन्मान करतो. तुम्ही देखील आदिवासी बांधवांचा आदर करावा ही विनंती.

- आकाश देशमुख (राजूर)