पत्नीने पतीला प्रेयसिसोबत पकडले, त्या दोघांनी हिला गोचीडचे औषध पाजले.! सुदैवाने ती जगली, तिघांवर गुन्हा, मजनू अटक लैला पसार.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                 नवऱ्याचं लफडं राईटहॅन्ड पकडल्याने त्या दोघांनी पत्नीला ठार मारण्याचा प्लॅन आखला. या गड्याचं देखील त्या प्रेयसिवर प्रेम जडले होते. त्यामुळे ही आडसर येत होती. म्हणून हिचा काटा कसा काढायचा याचा पुर्वनियोजित कट यांनी आखला आणि गायींच्या गोचिड मारण्याचे औषघ यांनी तिच्या तोंडात ओतून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आता हा काही चित्रपटातील कथानक नव्हे.! तर, ही एक वास्तव घटना आहे. संगमनेर तालुक्यातील दाढ खु येथे दि. 8 जुलै 2022 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला असून यात महिलेवर उपचार सुरु आहेत. ही घटना पोलिसांना माहित होताच त्यांनी महिलेचे जबाब नोंदविले असून आरोपी दिपक संजय जोशी (रा. दाढ खु. ता. संगमनेर) याच्यासह त्याच्या प्रेयसिवर देखील आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या घटनेनंतर तेथे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण व्हायला नको. म्हणून पोलीस निरिक्षक भोये यांनी जोशीला तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  आरोपी दिपक याचे काही दिवसांपुर्वी लग्न झाले होते. मात्र, कालांतराने त्याचे बाहेर असणारे उद्योग पत्नीच्या निदर्शनास येऊ लागले होते. वारंवार फोनवर बोलणे, घरात लक्ष देणे, नेहमी मोबाईलवर चॅटिंग करणे असले प्रकार होताना जाणवत होते. त्यामुळे, एक दिवस या बहाद्दराचे कारणामे पत्नीने राईटहॅण्ड पकडले. दिपक हा त्याच्या प्रेयसिला भेटायला लोणी येथे जात होता. त्यामुळे, कामाधंद्याच्या नावाखाली याचे कारणामे उघड करुन त्याच्या नातेवाईकांना दाखविण्याचा चंग पत्नीने बांधला व तिने त्याचा पाटलाग केला. आपल्या पत्नीला आपली रासलिला माहित झाल्याचा संशय आल्याने त्याने नेहमी सावध भुमिका घेतली. मात्र, संशयाच्या कारणाहून यांच्याव नेहमी वाद होत होते. मात्र, कालंतराने त्यास असे विक्षिप्त व जिवघेणे वळण लागेल असे  दोघा तिघांनाही वाटले नव्हते. परंतु, पतीच्या अति वागण्याने पत्नीचा जीव गेला असता, त्याची आई आरोपी झाली अन प्रेयसी जेलमध्ये जाणार. किती भयानक प्रकार आहे हा..

           दरम्यान, यांच्यात प्रचंड टोकाचे वाद झाले आणि आरोपी दिपक हा त्याच्या प्रेयसिला भेटण्यासाठी लोणी येथी निघुण गेला. मात्र, आज उद्या येईल या अपेक्षेनंतरही तो पुन्हा आलाच नाही. त्यानंतर पत्नीला माहिती मिळाली. की, दिपक व त्याची लैला दोघे लोणी येथे भाड्याची खोली करुन राहत. म्हणून तिन थेट लोणी गाठली. दि. 8 जुलै 2022 रोजी दुपारी दोघांच्या राहत्या ठिकाणी जावून पत्नीने आरोपी दिपक व त्याच्या प्रेयसिला एकाच खोलीत राईटहॅण्ड पकडले. त्यानंतर, पत्नीचे दुर्गेचा आवतार घेतला आणि तेथे काय झाले असेल याची आपल्याला कल्पना असेलच.! लोणी येथे त्यांचेत प्रचंड वाद झाले. आरोपी दिपक याने त्याच्या आईला फोन केला आणि  लोणी येथे बोलावुन घेतले. तेव्हा, हे सर्वजन संध्याकाळी 7 वा.चे सुमारास दाढ खु येथे आले. तेव्हा आरोपी दिपक याने त्याच्या पत्नीस सांगितले. की,  तु मला लागत नाही तु येथुन निघुन जा. मला आशा प्रकारे  हिचेशी लग्न करायचे आहे. तु मला अडसर करु नको असे म्हणाला. त्यामुळे, पत्नीने त्यास विरोध केला. देवा ब्राम्हणांच्या समक्ष लग्न केले आहे. आई बाप सोडून तुमच्याशी संसार थाटला आहे. आता हे आर्धवाट आयुष्य  घेऊन मी कोठे जाऊ? तिने त्यास विनंती केली, त्याच्या प्रेयसिला देखीस समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यात कोणतेही परिवर्तन झाले नाही. 


          दरम्यान, हा कायमचा काटा दुरच केला पाहिजे. वारंवार हिची कटकट नको म्हणून या तिघांनी तिला ठार मारण्याचा प्लॅन केला. त्यावेळी फिर्यादी तथा दिपकच्या पत्नीला या दोघींना खाली पाडले. तिला घट्ट पकडून ठेवले. आता हे आपला घातपात करणार अशी शंका येताच पत्नीने आरडोओरड करायला सुरुवात केली. मात्र, तरी दिपकच्या प्रेयसिने तिचे तोंड दाबुन धरले. त्यानंतर आरोपी दिपक याने गोठ्यातुन गोचीड मारण्याच्या औषधाची बाटली आणली. तर, आज हिचा विषय कायमचा संपुन टाकायचा असे म्हणुन बाटलीचे झाकन उघडुन पत्नीस जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध पाजले. मात्र, कालांतराने महिलेला रुग्णालयात हलविण्यात आले. तीन दिवस तिची प्रकृती नाजूक होती. मात्र काल स्थर झाल्यानंतर राहाता येथील प्रवरा हाँस्पीटल लोणी येथे उपचार घेताना पुर्ण शुद्दीवर आल्यानंतर जबाब नोंदवून आपला पती, त्याची प्रेयसी व तिची सासू यांच्यावर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.