बी.जे.देशमुख आणि पिचडांचा कौतुक सोहळा ऐतिहासिक नव्हे हारामी म्हणावा लागेल.! दोघांनी विश्वास गमविला- वाकचौरे.!



सार्वभौम (अकोले) :-

            परिवर्तन मंडळाचे संस्थापक बी.जे.देशमुख आणि दशरथ सावंत यांनी पिचड साहेबांना पाठींबा दिला. त्यामुळे, काल एकमेकांना शिव्याशाप देणारे एकाच व्यासपिठावर आले आणि संपुर्ण तालुक्यात दोन्ही नेत्यांवर सोशल मीडियातून टिकेची झोड उठली. यात सगळ्यात एक गोष्ट अधोरेखीत करण्यासारखी होती, की, ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी परिवर्तन मंडळातून बाहेर पडून कोणत्याही परिस्थितीत पिचड साहेबांना पाठींबा नाही म्हणजे नाही. त्यात तडजोड नाही. अशी ठाम भुमिका घेतल्याने त्यांचे कौतुक झाले. त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीला शुन्यातून सुरूवात झाली, कधी विरोधकांनी वेठीस धरले तर कधी पक्षाने सन्मान दिला नाही. कधी नेतृत्व तोडके निघाले तर कधी एकास एक करुन देखील मान मिळाला नाही. तरी देखील मिळेल त्या व्यासपिठावर विचार मांडत त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. मात्र, पुन्हा घरी बसलो तरी बेहत्तर पण पिचड साहेबांच्या व्यासपिठावर येणार नाही. अशी वैचारिक आणि ठाम भुमिका त्यांनी मांडली आणि देशमुख, सावंत व दराडे यांना रामराम ठोकून ते चालते झाले. त्यानंतर कोठे जायचे? तर समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आ. डॉ. लहामटे, अशोकराव भांगरे, सिताराम पा. गायकर यांनी त्यांना साद घातली आणि आज त्यांनी शेतकरी समृद्धी विकास मंडळाला पाठींबा दिला आहे. अर्थात त्यांच्याकडे फार मतदान नाही. पण, एक मताचे मुल्य भाजपला (1999 नुसार) चांगले माहित आहे. त्यामुळे, मेंगाळ यांची मदत समृद्धी मंडळाला सहायभूत ठरणार आहे. तर, कोणतीही अट व शर्त न ठेवता कोणीही चालेल पण पिचड नको. या भुमिकेवर मेंगाळ यांनी त्यांच्या समर्थकांसह गायकरांच्या समृद्धी मंडळाला पाठींबा दिला आहे.


तर, काल देशमुख व सावंत यांनी पिचड साहेबांना पाठींबा दिल्यानंतर त्यांनी बर्‍याच काही आरोपांचे खंडन करुन आम्ही पिचड साहेबांवर आरोप केले नाही. ती एक परिहार्यता होता. असे मत मांडले. तर, काल पिचडांना अक्षरश: खालच्या भाषेत बोलुन त्यांना भ्रष्टाचारी म्हणून घोषीत केले होते. आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून त्यांचा कौतुक सोहळा पार पडला. यावर सिताराम पाटील गायकर, अशोक देशमुख, विजय वाकचौरे यांनी चांगल्याच तोफा डागविल्या आहेत.  

विजय वाकचौरे म्हणाले की, मला बी.जे. देशमुख यांचा पहिलाच मुद्दा प्रचंड हस्यास्पद वाटला. ते पिचड साहेबांनी आजवर शिव्या घालत होते अनेक आरोप त्यांनी केले आणि काल शेजारी बसून ते पिचडांना आदरणीय म्हणून लागले. किती मोठा हा विरोधाभास आहे. म्हणजे, ज्याची खावी पोळी, त्याचीच वाचवावी टाळी हे त्यांनी पुण्यात असल्यापासून तत्व पाळले आहे. पहिल्यांदी एखाद्याची आब्रु वेशीला टांगायची आणि नंतर त्यास चारित्र्यसंपन्न व्यक्ती म्हणून शुद्धपत्र द्यायचे. हे असले धंदे भाजपमध्ये पुर्वापार चालत आले आहेत. देशमुख यांनी परिवर्तन पॅनल उभा केला होता. त्याची धेय्यधोरणे, उदिष्ठे काय होती? याचा त्या दोघांना विसर पडला आहे. यांनी तेव्हापासून गायकर-पिचड यांच्यावर वैयक्तीक टिका टिपण्ण्या केल्या आहेत. हे असले धंदे राजकारणात चालत नाही. आज परिवर्तनात डॉ.लहामटे, भांगरे कोठे आहेत? तो पॅनल पिचडांच्या विरोधात उभा राहिला आणि पिचडांच्या गटात जाऊन सामिल झाला. इतका मोठा यु टर्ण तर देशात कोठे पहायला मिळाला नाही. ती किमया या दोघांनी करुणन दाखविली आहे. खरंतर, त्यांनी तटस्थ भुमिका बजावली असती तर हे लोकांच्या विश्वासास पात्र ठरले असते. मात्र, ते म्हणतात आमच्याकडे दोन पर्याय होते. पिचड आणि गायकर. त्यात आम्ही पिचड निवडले. मुळात गायकर गटाची भूमिका प्रचंड क्लेअर होती. काही झाले तरी चालेल, घरी बसू पड उपद्रवी लोकांना घ्यायचे नाही. त्यामुळे, पिचड हा पर्याय उरला आणि तो तुम्ही स्विकारला. या कृतीमुळे, सुपारी सारखा कार्यक्रम वाटला आणि लोकांमध्ये तुमची विश्वासहार्यता शुन्य झाली.

खरंतर, देशमुख आणि सावंत साहेब यांच्यासोबत 10 वेळी बैठकी घेऊन झाल्या होत्या. त्यांना काही गोष्टी समजून सांगितल्या तर त्यांच्याकडून काही गोेष्टी समजून घेतल्या. तशा पद्धतीने शक्यत्या दुरुस्त्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यांची नेहमी इतकी धिटाई होती. की, हिटलर सारखा हमरुषी कायदा यांना कारखान्यावर लागू केला. द्या माहिती, सांगा हिशोब, हे कसं, ते कसं, म्हणजे 21 जणांचे मंडळ राहिले बाजुला. यांना उत्तरे देता-देता नाकिनव आला. त्याच काळात कारखाना सुरू होत होता. त्यामुळे, यांच्या उपद्रवी वागण्याचा कारखान्यावर विपरीत परिणाम झाला. तरी देखील यांचे समाधान झाले नाही. तेव्हा तर, खुद्द पिचड साहेब सांगत होते. यांच्यामुळे बदनामी होते, कर्ज मिळत नाही. आज ते मांडीवर येऊन बसले तर दोघे गोड झाले. म्हणजे, या पिचडांनी पडद्याआड राहून हिरोगिरी केली अन प्रत्यक्षात गायकर यांना व्हिलन करण्याचे काम केले आहे. असा व्यक्ती कारखाना चालविण्यासाठी सक्षम आहे असे देशमुख म्हणतात. खरोखर त्यांचे पाय धुवून पाणी पिले पाहिजे. असा अभ्यासू माणूस जगात आम्ही पाहिला नाही. गेल्या 10 दिवसात या पिचडांनी कधी कर्ज उपलब्ध केले नाही, कोणाला फोन केला नाही, हालहवाला घेतला नाही. त्यांना फक्त खुर्चीचा मोह आहे. ते 25 वर्षे चेअरमन होते, त्यांच्या काळात काय काय झाले हे आमच्यापेक्षा त्यांना जास्त माहित आहे. तरी देखील असा माणूस कारखाना चालवू शकतो असे यांना वाटते म्हणजे हे कोणत्या प्रकारे उत्तम प्रशासक होते देवाला माहित..!!

दुर्दैव या गोष्टीचे वाटते की, देशमुख म्हणतात दगडापेक्षा विट मऊ.! त्यामुळे, त्यांना दगड आणि विट यातील फरक कळतो की नाही.! याबाबत आम्हाला शंका आहे. गेली दिड वर्षे तुम्ही लोकांची माथी भडकविली. अनेकांच्या आब्रु चव्हाट्यावर आणल्या. काय साध्य केलं? जनतेने तुम्हाला मातीत गाडलं. ते इतक की, साधा पॅनल देखील तयार करता आला नाही. इतकी तुमच्या बुद्धीची माती केली. तरी तुम्हाला विट आणि दगड यातीला फरक समजला नाही हे दुर्दैव आहे. याहून तुमच्या बुद्धीची कीव येते की, पिचड साहेब म्हणतात आम्ही संचालकांना आचारसंहिता ठरवून देऊ, त्यावर तुम्ही देखील विश्वास ठेवला.!  आहो.! गेली 25 वर्षे त्या मानसाने कधी आचारसंहिता तयार केली नाही. गाड्यांवर ड्रायव्हर, पेट्रोल डिझेल, ऑफिसात कामगार, शेतात गडी, घरात बाजार हे आरोप कोणी केले? जर गेली 25 वर्षे आचारसंहिता तयार करुन स्वत:ने पाळली असती तर आज इतके कोटी कर्ज झाले असते का? असो त्यांच्या शब्दाचे वाईट मुळीच वाटत नाही. फक्त एखाद्या राजाने बाळाची समजूत काढावी अशी तुमची समजूत काढली. ते हे एका उत्तम निवृत्त प्रशासकाची. हे अनेकांच्या बुद्धीला निव्वळ बाळबोध वाटते आहे. ते तुम्हाला कसे पटले, ही पिचड साहेबांचे कौशल्य म्हणावे लागेल आणि त्याला खरोखर दाद द्यावी लागेल.

देशमुख साहेब तुम्ही जशी पिचड साहेबांच्या मांडीला मांडी लावली. तशी त्या तात्या विंचुसारखी तुमची गत झाली. तुझा आत्मा माझ्यात अन माझा आत्मा तुझ्यात.! ओम, भट स्वा हा.!! म्हणजे, तुम्ही त्यांच्या शेजारी बसल्यावर म्हणु लागले. की, गायकारांनी गाड्या केल्या, मेळावे घेतले, लोकांना जेवणे दिली. मग पिचड साहेबांनी काय केले? हे दिसले नाही का? म्हणजे केवळ गायकर नावाची काविळ तुम्हाला झाली आहेे. त्यांचे मोठेपण देखवत नाही. तुमच्या चष्म्यातून फक्त पिचड आणि त्यांचा 40 वर्षाचा तालुक्याचा व 25 वर्षाचा कारखान्यातील कारभार अगदी नितळ, निर्मळ धुतल्या तांदळासारखा दिसू लागला आहे. याला म्हणतात पिचड निष्ठा.!! तुम्ही म्हणता दिड वर्षापासून जनतेला कारखान्याबाबत ज्ञान अवगत झाले. तर, मला कळले नाही. तुम्हाला का पॅनल उभा करता आला नाही? लोकांना सोडा.! तुम्हाला किती ज्ञान अवगत झाले? अन झाले असते तर तुम्ही पिचड साहेबांना साथ दिली असती का? असे फार काही प्रश्न आणि त्याची उत्तरे अनुत्तरीत आहेत. खरंतर, आता तुम्हावर काय बोलांव काळत नाही. कारण, तुम्ही म्हणतात आम्हाला पिचड चांगले व योग्य वाटतात. तर डॉ. अजित नवले हे राज्याचे आणि देशाचे नेते आहेत. तुम्ही आत्ता काल परवा शेतकर्‍यांची म्हणजे फक्त कारखान्याची बाजु मांडायला लागले. नवले यांची उभी हयात शेतकरी कष्टकर्‍यांसाठी आहे. त्यांना असे वाटते की, समृद्धी मंडळ कारखाना चालविण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे, आता तुम्ही हुशार आहेत की, डॉ. नवले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. शेवट इतकेच सांगतो.! पिचडांना साथ देणे हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा चुकीचा निर्णय होता. तो पाठींबा नव्हे.! तर तुम्ही तालुक्यातील शेतकर्‍यांचा विश्वास गमविला आहे. लोकांना शिव्या देऊन, वैयक्तीक टिका करुन, कोणाला चुकीच्या माहित्या देऊन आणि धोतरं उडवून राजकारण होत नाही. हे मी सांगण्यापेक्षा 18 तारखेला शेतकरी मतदार राजा दाखवून देईल. यात तिळमात्र शंका नाही..!!

टिप :- सदर मुलाखत ही रिपाईचे राज्यसचिव विजयराव वाकचौरे यांची असून. सार्वभौम त्यास जबाबदार नाही.