पिचडांच्या विरोधात 19 पत्रकार परिषदा घेऊनही देशमुख व सावंतांचे परिवर्तन मंडळ भाजपत विलीन.! नेत्याचे बंड.! मी, पिचडांकडे येणार नाही, तुम्ही जा.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्याच्या राजकारणात आजकाल काय घडेल आणि काय नाही.! याबाबत कोणीच काही सांगू शकत नाही. कधी आयुष्यभराचे राजकीय वैरी समजून सावंत साहेबांनी पिचड साहेबांकडे पाहिले, त्यांना श्राप दिले तेच सावंत साहेब आज नातजावयास पाडण्यासाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. तर, ज्या गायकरांचे त्यांना आज वावडे आहे. त्यांच्यासाठी जिल्हा बँकेला माघार घेऊन प्रेम व्यक्त केले. अगदी कालपर्यंत सावंत आणि बी.जे.देशमुख यांनी पिचड साहेबांवर काय-काय आरोप नाही केले? त्यांच्या विरोधात जाऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आज ते म्हणतात आम्हाला असे वाटते की, पिचड साहेब कारखाना चालविण्यास योग्य आहे? वा रे पठ्ठ्यांनो.! म्हणजे, पिचड चेअरमन, त्यांचा कारभार भ्रष्ट, त्याची टोळी, त्यांचा अनागोंदी कारभार, साखर, पेट्रोल, डिझेल, व्यक्तीगत कामासाठी कर्मचारी असे अनेक आरोप करून एक ना दोन तब्बल 19 पत्रकार परिषदा घेऊन पिचड आणि गायकर यांच्यावर अनोखे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तर, फोनवर बोलुन-बोेलुन लोकांचे कान जाम केले. त्याच पिचड साहेबांच्या मांडीला मांडी लावून पिचड चांगले कसे आहेत. हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणजे, राजकारण्यांनी जनतेला वेड्यात काढाव.! मात्र, किती? याला देखील मर्यादा असते. आता उलट परिवर्तन मंडळ भाजपत विलिन झाल्यामुळे, बी.जे.देशमुख व सावंत साहेब यांची विश्वासहार्यता संपली असून त्याचा तोटा पिचड साहेबांना होणार. अशा प्रकारची टिका जनतेतून उमटू लागली आहे.
रूंभोडी गावातून परिवर्तन मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ती इतकी कमकुवत होती. की, अशोक भांगरे यांच्यासमवेत पिचडांच्या विरोधार सुरू झालेला ऐल्गार अखेर पिचड साहेबांच्या गटात सामिल होऊन सुरू झाला. म्हणजे, हे पुर्वनियोजित होते की काय? असा प्रश्न पडू लागला आहे. कारण, त्यात पहिल्यांदा आमदारांना सोबत घेऊन त्यांना टुकार ठरविण्यात आले. त्यानंतर भांगरे साहेबांचा वापर करुन व्यासपिठ रंगविण्यात यांनी धन्यता मानली. कधी बंड पुकारायचे तर कधी पुन्हा पत्रकार परिषदा घेऊन आम्ही एक झाले अशा पद्धतीचे तडजोडी राजकारण व बेगडा विरोध तालुक्याला पहायला मिळाला. काल, शंभर जणांचा मेळावा नंतर अवघ्या 10 जणांवर येऊन ठेपला. त्यामुळे, परिवर्तन होतय की अधोपत हे तालुक्याच्या लक्षात आले. अखेर दोघेच राहिले. नंतर त्यांना बाजीराव दराडे येऊन मिळाले. ज्यांनी 2019 मध्ये धनंजय मुढे यांच्या व्यासपिठाहून राजुरच्या बाजारपेठेत पिचड साहेबांना अक्षरश: अपशब्दांनी लाखोल्या वाहिल्या होत्या. त्यांना पिचड हेच योग्य व्यक्ती आहे असे वाटू लागले आहे. यात मारुती मेंगाळ यांना खरोखर शंभर तोफांची सलामी दिली पाहिजे. की, त्यांनी भाजपला पाठींबा दिला नाही. हा तालुका पुरोगामी विचारांचा आहे. कारखान्यात का होईना पण येथे भाजपला बळ देणे तथा पिचड साहेबांच्या सुरात सुर मिळविणे त्यांनी नापसंत केले. काही झाले तरी मी पिचडांच्या बरोबर जाणार नाही हे स्पष्ट केले आणि ते भाजप पुरस्कृत परिवर्तन मंडळातून बाहेर पडले.
खरंतर, अकोले तालुक्यात आजकाल पुरोगामी विचार शिल्लक राहिलेत का? असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. कारण, खुद्द सावंत साहेब भाषणात म्हणाले होेते. की, कोणत्याही निवडणुकीत येथे भाजपला बळ देऊ नका. आज कारखान्यात सावंत हे भाजप तथा शेतकरी विकास मंडळात सामिल झाले आहे. तर, पिचड साहेब त्यांच्या भाषणात म्हणाले. की, आम्ही कोणतीही सैदेबाजी केली नाही. आम्ही विचारांनी एकत्र आलो आहोत. त्यामुळे, आजवर पुरोगामी विचारांचे झेंडे मिरविणार्या सावंत साहेबांना भाजपने फक्त राज्यपाल करतो अशी कुणकुण केली तरी सगळे विचार सोडून ते खुशाल धावत जातील. अशी टिका त्यांच्यावर होऊ लागली आहे. तर, बी.जे.सावंत यांची पहिल्यापासून भूमिका चुकली. जगात सगळे नालयाक आहेत तेच एकटे शहाणे अशा प्रकारच्या अविर्भावामुळे, त्यांची आवस्था ना घर का ना घाट का.! अशी झाल्याचे पहायला मिळाले. पिचड आणि गायकर यांना नावे ठेवता-ठेवता त्यांना स्वत:चा अस्थित्व गमवावे लागले अशी टिका सोशल मीडियावर होऊ लागली आहे. त्यात सुनिल बद्रिके त्यांच्या फेसबुकहून म्हणतात की, बी.जे.देशमुख यांनी आजवर पिचडांवर केलेले आरोप हे फक्त प्रसिद्धीसाठीच होते, आज हे तालुक्याला कळले असेल. बी.जे हे पिचडांनी सोडलेला बहुरूपी बोलका पोपट होता हे आज सिद्ध झाले आहे. तर, शेतकरी पुत्र सुरेश नवले म्हणतात परिवर्तनाच्या गप्पा मारणारे मधी परावर्तीत आणि प्रभावीत झाले समजले नाही. देशमुख आणि सावंत यांनी आता तरी शेतकर्यांची चेष्टा थांबविली पाहिजे असे मत त्यांनी मांडले.
खरंतर, समाज माध्यमांमधून सावंत आणि देशमुख यांच्या निर्णयाचे पडदास उमटू लागले आहेत. कारण, त्यांनी परिवर्तनाची भाषा केली आणि लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसू लागला. मात्र, निवडणुकीतून माघार तर घेतलीच.! मात्र, भाजपला त्यांनी पाठींबा दिला. म्हणजे स्थापनेतील दादासाहेब रुपवते वगळले तर उभी हयात पिचड कारखान्याचे चेअरमन राहिले. त्यांच्याच काळात भलेमोठे कर्ज आणि अनागोंदी व गैरकारभार झाला असे त्यांचे मत होते. असे असताना देखील वर्षे दिड वर्षे परिवर्तनाच्या नावाखाली लोकांचे मनोरंजन केले का? असा प्रश्न जनतेना विचारत आहे. यात विशेष म्हणजे, सावंत आणि बी.जे. देशमुख यांनी पिचड साहेबांवर कोणत्या शब्दावर विश्वास ठेवला? तर, साहेब म्हणाले माझ्याकडे बहुमत नसल्याने त्यांनी सहा वर्षात अनागोंदी कारभार केला. हे कारण, यांना देखील पुरेसे वाटले हे मात्र विशेष आहे. मग गेली 1995 ते 2022 पर्यंत कोण चेअरमन होते? यांच्याकडे बहुमत नव्हते तर हे चेअरमन राहिले तरी कसे? यांच्याकडे कारखाना चालविण्याची हिम्मत होती तर गायकर साहेबांकडे का अधिकार दिले? त्यांनी चुकीचा कारभार केला तर तुम्ही राजिनामा का दिला नाही? किंवा त्यांना विरोध केला किंवा गुन्हा का नोंदविला नाही? असे अनेक प्रश्न पुढे येतात. परंतु, म्हणतात ना.! झाकली मुठ सव्वालाखाची.! आता काय ते समजून घ्या. कारण, हेच पिचड साहेब बी.जे.देशमुख आणि सावंत साहेब यांना टोमणे मारत होते. आज तेच मांडीला मांडी लावून कारखाना सहमती एक्सप्रेमध्ये बसल्याचे चित्र दिसू लागले आहे. एकंतर, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशा प्रकारची भुमिका सात्याने ज्यांनी मांडली. त्यांच्यावर आता लोक विश्वास ठेवतील का? यालाच जुन्या चेअरमनला पुन्हा चेअरमन करण्यासाठी मैदानात उतरलेल्या परिवतर्र्नवादी लोकांना मतदार दारात उभे करतील का? परिवर्तन मंडळ म्हणजे भाजपची बी टीम होती का? असे अनेक प्रश्न जनता उपस्थित करू लागली आहे. त्याचे उत्तर येणार्या 18 तारखेला पहायला मिळणार आहे.
खरंतर, आढळा पट्ट्यातून शंभरभाऊ चोखंडे यांच्यामागे मोठा जनाधार आहे. त्यांनी आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. की, ज्या व्यासपिठावर बाजीराव दराडे असतील. त्या व्यासपिठावर मी दिसणार नाही. दराडे हे कानडे समाजाच्या जोरावर निवडून आले होते. त्यांनी त्याची जण ठेवली नाही. त्यामुळे, दराडे जेथे असतील तेथे आम्ही नसू असे चोखंडे यांनी मत व्यक्त केले आहे. त्यामुळे, कालपर्यंत जनसेवक शंकरभाऊ हे पिचड साहेबांसोबत होते. आता त्यांची भुमिका नेमकी काय असणार आहे? हे देखील पाहणे महत्वाचे आहे.
खरंतर, रवि मालुंजकर यांनी एक वक्तव्य केले होते. की, अगस्ति कारखान्याच्या प्रत्येक विटा-विटावर शरद पवार साहेबांचे नाव कोरलेेले आहे. तेच रवि मालुंजकर भाजपच्या मंडळाला समर्थन करताना दिसले. मी अखेरच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीशी आणि पवार कुटुंबाशी एकनिष्ठ आहे असे मालुंजकर म्हणत होते. मात्र, दुर्दैवाने जेव्हा पवार साहेब हेलिकॉप्टरने कारखान्यावर उतरले तेव्हा साधं एक फुल देखील देण्याची धारिष्ट्य भाजपमधील नेत्यांचे झाले नाही. खास करुन पिचड साहेबांचे झाले नाही. त्या भाजपसोबत मालुंजकर गेले. ते ही केवळ गावात सावंत साहेबांनी सरपंच केले म्हणून. त्यामुळे, त्यांनी शुल्लक पदासाठी निष्ठा पणाला लावली, केवळ झेंडे फडकवून आणि बिल्ले लावून तथा स्टेटसला पद ठेऊन निष्ठा सिद्ध होत नाही. तर, पद आणि प्रतिष्ठा गेली तरी बेहत्तर परंतु, निष्ठेवर कोणी प्रश्नचिन्ह उभे करता कामा नये. हा उपद्याप कशासाठी? तर केवळ मालुंजकर यांची प्रतिमा चांगली असून त्यांचे निर्णय चुकत असल्याचे लोक बोलु लागले आहेत. आता राष्ट्रवादीशी निष्ठा सांगणारे मालुंजकर भाजपच्या व्यासपिठावर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.