पत्रकाराची लॉजवर आत्महत्या, मृतदेहाचा कोळसा, पोलिसांकडून माहितीस टाळाटाळ, चिठ्ठी गायब झाली?
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील एका लॉजवर एका व्यक्तीने स्वत:च्या आयुष्याला कंटाळून जाळुन घेतले. तो इतका जळालेला होता. की, निव्वळ त्याचा सांगाडा शिल्लक राहिला होता. जेव्हा लॉजच्या रुममधून धुरांचे लोळ बाहेर पडू लागले तेव्हा हा प्रकार समोर आला. तेथील कर्मचार्यांनी लाथांनी दरवाजा तोडला आणि रुममधील आग विझविण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवार दि. 3 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यात सागर रघुनाथ ठाकरे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा पोलिस घटनास्थळी गेल्यानंतर त्याच खोलीत तब्बल 15 दारुच्या बाटल्या मिळून आल्या तर या तरुणाने एका चिठ्ठी लिहीली असून त्यात कौटुंबिक काही बाबी देखील त्याने मांडल्या असून अन्य काही गोष्टी असल्याचे बोलले जात आहे. त्यात त्याने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. मात्र, पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली असून संशयाचा धुर बाहेर पडू लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सागर ठाकरे याचे घुलेवाडी येथील एका तरुणीशी लग्न झाले होते. तो धुळे येथील असला तरी त्याच्या कुटुंबात कलह सुरूच होता. तो गेल्या काही दिवसांपुर्वी संगमनेर येथे आला होता. तो एका वृत्तपत्रात गेल्या काही दिवसांपासून काम करत होता. तसे त्याच्याकडे पत्रकारीतेचे आयकार्ड देखील होते. मात्र, तो आता धुळे सोडून नाशिक येथे कामानिमित्त स्थायिक होणार होता. तो दि. 27 मे 2022 रोजी सासरवाडी येथे गेला होता. मात्र, तेथे काय झाले याबाबत पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. तसेच तो नाशिकला जातो असे सांंगून संगमनेरातच एका लॉजवर राहिला. त्याच्या मनात प्रचंड अस्थिरता होती. त्याला कोणापासून तरी नक्कीच त्रास होत होता. मात्र, तरी देखील मद्याचा सहारा घेऊन तो सर्व दु:ख गिळत असल्याचे प्राथमिक मत समोर येऊ लागले आहे.
दरम्यान, दि. 3 जून 2022 रोजी सकाळी संबंधित लॉजमधून धुरांचे लोळ बाहेर पडू लागले. त्या रुमला पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे, तेथील कर्मचार्यांनी तत्काळ दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. काही काळ लाथा मारल्यानंतर दरवाजा तुटला तर आत आग्नीतांडव सुरू होता. तेव्हा लॉजवर काम करणार्या तरुणांनी प्रसंगावधान राखत पाण्याच्या बादल्या आणल्या आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सकाळी 10 वाजण्याच्या सुमारासचा असावा. जेव्हा दरवाजा तोडून पाणी आणले तोवर जवळ असणार्या सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या. मृतदेहाच्या अंगावरील कपडे जळून बर्यापैकी बॉडी जळालेली होती. तरी देखील कर्मचार्यांनी मोठ्या धाडसाने त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
दरम्यान, ही घटना पोलिसांना समजल्यानंतर तेथे काही पोलिस हजर झाले. बर्यापैकी खोली जळाल्यामुळे तेथे काहीच शिल्लक नव्हते. मात्र, एक बॅग जरा कोपर्यात असल्यामुळे ती वाचलेली होती. पोलिसांनी ती उचकली असता त्यात काही कागदपत्रे मिळून आली. तर तेथे एक डायरी आणि चिठ्ठी देखील होती. त्या चिठ्ठीत काही कौटुंबिक विषय देखील लिहीलेले होते, आपल्या जवळच्या व्यक्तींना भावनिक साद देखील घातलेली होती. तर काही ठिकाणी खंत व्यक्त केलेल्या होत्या. आता ती चिठ्ठी पहिल्यांदा पोलिसांकडे होती. त्यातील मचकूर देखील काही व्यक्तींनी वाचला होता. मात्र, नंतर जेव्हा पोलिसांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी अशी चिठ्ठी नसल्याचे सांगितले. तर काहींनी सांगितले त्यात विशेष काहीच नाही. त्यामुळे, जे असेल ते मांडण्यास, सांगण्यास काय हरकत आहे? मात्र, पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली तर प्रचंड संदिग्ध उत्तरे मिळाली. त्यामुळे, एका बाजुने जीव गेला. परंतु दुसर्या बाजुने त्यास न्याय देण्याऐवजी भलती कारस्थाने शिजू नये म्हणजे झालं.! अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या होत्या.
दरम्यान, संबंधित चिठ्ठीत काय आहे? याची मागणी करण्यासाठी काही सामाजिक संघटना आता पुढे येणार आहेत. हा तरुण इथला नसला म्हणून काय झाले? त्याच्या टाळुवरचे लोणी कोणी खाऊ नये अशी भूमिका आता काही समाजसेवकांनी घेतली आहे. त्यासाठी पोलीस अधिक्षक व गृहमंत्री महोदय यांच्याकडे पत्रव्यावहार करण्यात येणार असून या घटनेला केवळ सीआयरपीसी 174 (आकस्मात मृत्यू) वर न थांबविता आयपीसी प्रमाणे कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. काही झालं तरी कोणी दोषी असेल तर गुन्हा नोंदला पाहिजे आणि नसेल तर कोणाकडून हकनाक अर्थपुर्ण तडजोडी करुन घटनेवर पांघरून घालण्याचे काम खपवून घेतले जाणार नाही. अशी भूमिका सामजसेवकांनी घेतली आहे.