छेडछाड प्रकरणे! जिच्यावर प्रेम केले, त्याने तिच्या तोंडात मारली.! जिच्या हातचे जेवण केले, तिचाच हात धरला.! चौघे अटक.!
सार्वभौम (संगमनेर) :-
मुलीचा कॉलेजपर्यंत पाठलाग केला म्हणून वडिल अरोपींनी विचारायला गेला. तर, त्याने धक्काबुक्की सुरू केली. जेव्हा मुलगी सोडविण्यासाठी गेली, तेव्हा त्याला राग आला आणि त्याने मुलीच्या देखील श्रीमुखात लावली. ही घटना दि. 28 जून 2022 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास समनापूर परिसरात घडली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल बाळासाहेब शेरमाळे, ऋषीकेश बाळासाहेब शेरमाळे व बाळासाहेब भिमाजी शेरमाळे (रा. समनापूर. ता. संगमनेर. जि.अ.नगर) अशा तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाणे करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक मुलगी दि. 27 जून 2022 रोजी कॉलेजला चालली होती. तेव्हा आरोपी राहुल शेरमाळे हा तिला म्हणाला की, तु मला फार आवडते. मात्र, तरी देखील तिने त्याला भाव दिला नाही. त्यामुळे, राहुलने पीडित अल्पवयीन मुलीचा कॉलेजपर्यंत पाटलाग केला. हा प्रकार नंतर पीडित मुलीने आपल्या वडिलांना सांगितला असता ते राहुल यास समजून सांगण्यासाठी त्याच्या घराजवळ गेले. मात्र, त्यांच्या समजून सांगण्याने राहुल यास फार राग आला आणि त्याने पीडित मुलीच्या वडिलांना शिविगाळ दमदाटी व धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. आपल्या वडिलांना मारहाण होते की काय म्हणून पीडित मुलगी मधे गेली असता आरोपी राहुल याने तिच्या श्रीमुखात लावली. तर, आरोपी बाळासाहेब शेरमाळे हा तेथे कोयता घेऊन आला. आमच्या नादी लागाल तर तुमच्याकडे पाहुण घेऊ असे म्हणून धमकी दिली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
हॉटेल पंचवटीत दरोडा, राडा.!
तर, संगमनेर शहरातील हॉटेल पंचवटी येथे बेवड्यांनी प्रचंड राडा घालुन एका महिलेची छेडछाड केली. ही धक्कादायक घटना 26 जून 2022 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडाली. यात चौघांना आरोपी करण्यात आले असून त्यांनी हॉटेच्या मॅनेजरला मारहाण करुन गल्ल्यातून 5 हजार रुपये काढून तेथे दरोडा टाकला आहे. याप्रकरणी प्रणय मायती याने दिलेल्या फिर्यादीनुसार सुशांत बाबासाहेब जोंधळे (कौठे कमळेश्वर) अनिल विलास कोल्हे (कोल्हेवाडी), अक्षय भरत कोल्हे व ऋषीकेश गणपत काळे (दोघे रा. कोल्हेवाडी रोड, ता. संगमनेर) अशा चौघांना आरोपी करण्यात आले असून पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हेवाडी शिवारातील चौघे तरुण हॉटेल पंचवटी येथे जेवण करण्यासाठी गेले होते. मात्र, त्या दरम्यान त्यांचा वेटर सोबत वाद झाला. हे आरोपी दारुच्या नशेत असल्यामुळे, टेबलावरील वाद हा थेट काऊंटरवर गेला. तेथे त्यांनी हॉटेलच्या मॅनेजरला शिविगाळ, दमदाटी व धक्काबुक्की सुरू केली. मात्र, हॉटेलवाल्यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा वाद थेट एका महिलेचा हात धरण्यापर्यत गेला आणि नशाधुंद तरूणांनी महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केला. तेथ जेवण करू, राडा घालुन, शिविगाळ दमदाटी करून, महिलांची छेडछाड करुन या तरुणांनी हॉटेलच्या गल्ल्यातील पाच हजार रुपये देखील काढून घेतले आणि तेथून चालते झाले. त्यानंतर हॉटेलमधील मायती यांनी संगमनेर पोलीस ठाणे गाठले आणि चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून त्यांना आत टाकले आहे. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाणे करीत आहेत.