कारखाना टिकवायचा असेल तर तो पिचडांच्या ताब्यात द्या-गडकरी; आमदार आता दुरुस्त करण्याची वेळ आली आहे-विखे


-Sagar Shinde

सार्वभौम (अकोले) :-

राज्याचे माजी मंत्री मधुकर पिचड साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी अकोल्यात आले होते. त्यांनी अधुनिक पद्धतीने शेती आणि उद्योेग व्यावसाय करण्याची साद घातली. सीएनजी, इथेनॉल आणि निसर्गाची हानी होणार नाही अशा पद्धतीने विकास करणे अपेक्षित आहे असे त्यांनी मत मांडले. तर, नगर जिल्ह्यातून पेट्रोल हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करा अशी साद विखे पाटील यांना घातली. तसेच कारखानदारीला अन्य उत्पादनांची जोड हवी आहे. तरच कारखानदारी टिकेल. त्यात इथेनॉल प्रकल्प हा महत्वाची भूमिका पार पाडेल असे ते म्हणाले. तर, अगस्ति कारखाना टिकवायचा असेल किंवा त्याचा विकास करायचा असेल तर तो पिचड साहेबांच्या ताब्यात द्या.! अन्यथा त्याची बिकट हाल होतील असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. तसेच, आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील निळवंडे धरणाहून ना. बाळासाहेब थोरात यांच्यावर लक्ष साधले. पाणी अकोल्याचे आणि कौतुक संगमनेरचे असे काहीसे सुचवत टिका करुन निळवंडे धरणाचे शिल्पकार मधुकर पिचड हेच असल्याचे सांगितले. तसेच आता 2019 ला चुक केली आता आमदार पुन्हा दुरूस्त करण्याची वेळ आली आहे असे म्हणून वैभव पिचड यांना जनतेने आमदार करावे असे सुचक विधान त्यांनी केले. तर, पिचड साहेबांमुळेच शालिनिताई विखे पाच वर्षे जिल्हा परिषद अध्यक्षा होऊ शकल्या, त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून वेळप्रसंगी काम करु असे ते म्हणाले. तर, कृतज्ञता व्यक्त करताना मधुकर पिचड साहेब म्हणाले की, 7 वेळा मला जनतेने आमदार केले आहे. आयुष्यात जे-जे स्मरण केले ते-ते मी केले आहे. आता ते संभाळण्याचे काम तुमचे आहे. अगस्ति कारखाना हा टिकला पाहिजे, त्यामुळे तो बिनविरोध व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. परमेश्वर मला किती आयुष्य देईला मला माहित नाही. मात्र, मी सुखाने मरणार आहे. तर, पिचड साहेबांना राज्यात कोठेतरी राज्यपाल म्हणून नियुक्त करण्याचा आग्रह शिवाजीराजे धुमाळ यांनी केला. 

राधाकृष्ण विखे पाटील

गेल्या 40 ते 50 वर्षाच्या वाटचालीत पिचड साहेबांनी अकोल्यातीलच नव्हे तर राज्यातील आदिवासी जनतेची फार प्रामाणिकपणे सेवा केली आहे. अशा सोहळ्यासाठी देशाचे नेते नितीनजी गडकरी येणे म्हणजे एक दुग्धशर्करा योग आहे. खरंतर पिचड साहेबांनी जेव्हा समाजकारण सुरू केले तेव्हा त्यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता, तरी देखील त्यांनी संघर्ष सुरू करून विकासाचा ध्यास घेतला आणि ते जनमानसांमध्ये जाऊन पोहचले. पिचड साहेब म्हणजे सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणारा नेता आहे. 1980 ते 2022 या काळाचा जर अभ्यास केला तर अकोले तालुक्याचे चित्र नक्कीच सर्वांना बदललेले दिसेल. ही काही सहजासहजी झालेली किमया नाही. ते पिचड साहेबांच्या संघर्षाचे यश आहे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि राज्यकत्यांनी त्यांना दिलेली साथ आहे. खरंतर या मानसाचे वय झाले आहे तरी देखील जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरुन लढण्याची तयारी साहेबांची आहे. एव्हाना वैभव पिचड यांच्यापेक्षा अधिक काम करण्याची क्षमता मधुकर पिचड साहेबांची आहे. त्यांना कधी सत्तेची हाव नाही, जेथे जनतेचा प्रश्न अडेल तेथे ते उभे राहतात. एव्हाना त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजिनामा देखील दिला आहे. त्यामुळे त्यांना सत्तेची जरा देखील हाव नाही.

आ. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, पिचड साहेबांच्या शब्दामुळेच शालिनिताई विखे पाटील ह्या पाच वर्षे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झालेल्या आहेत. कदाचित साहेब विसरुन गेले असतील. मात्र, त्यांचे ते ऋण आम्ही आजवर विसरलो नाही. जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा आम्ही साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू. पाटील म्हणाले की, निळवंडे धरणाचे खरे श्रेय्य पिचड साहेबांचे आहे. त्यांनी ते मंजूर केले असून त्यासाठी मोठा पाठपुरावा केला आहे. मात्र, भलतेच लोक त्याचे श्रेय्य घेऊ पाहत आहे. भंडारदरा अकोल्यात, निळवंडे अकोल्यात आणि त्यांच्या पाण्यावर भलत्याचाच डोळा आहे. पाणी खाली नेण्यासाठी यांचा आटापिटा सुरू असतो असा टाला त्यांनी ना. बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला. आता 2019 मध्ये जे झाले ते झाले, तुम्ही वेगळा माणूस आमदार म्हणून निवडला आहे. मात्र, आमदार दुरूस्त करण्याची वेळ आली आहे. पिचड साहेबांना अनेकांनी सोडलं, त्यांचा फायदा घेतला त्यांना देखील जागा दाखविण्याची वेळ आली आहे. आपलं नेतृत्व हे पिचड साहेब आहेत. त्यांच्याच मागेे आपल्याला उभे रहायचे आहे. खरंतर गडकरी साहेबांनी जेथे स्पर्श केला त्याचे सोने झाले आहे. त्यामुळे, ते येथे आले आता अकोल्याचे सोने होणार आहे.

माजी मंत्री मधुकर पिचड.!

आठ दशकं पुर्ण केलेले पिचड साहेब म्हणले की, माझा जन्म शिक्षकाच्या घरात झाला. शिकण्यासाठी मी पुण्याला गेलो. मात्र, प्रधान सरांच्या आशिर्वादाने समाजसेवेचा धडा मिळाला आणि तालुक्यात जनतेची सेवा करु लागलो. पुढे पठार भाग आणि अकोल्याच्या जनतेने मला सात वेळा आमदार केलं. गेल्या 56 वर्षे पुर्वीचा अकोले फार वेगळे होते. येेथे रस्ता सोईचे नव्हते, पाणी, विज, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रोजगार, सावकारशाही हे सर्व फार भयानक होतं. आमच्या डोळ्यादेखील पावसाचे पाणी खाली वाहून जात होते. तेव्हा कोणी आम्ही फार मोठा लढा उभा केला आणि येथील पाटपाण्याची चळवळी उभी करून मुळा, प्रवरा आणि आढळावर धरणं बांधली. त्यात निळवंडे धरण, पिंपारकणे पुल, पिंपळगाव खांड धरण, अनेक केटीवेेअर मुळा बारमाही अशी अनेक स्पप्न पुर्ण झाले. त्यासाठी मला शरदचंद्र पवार साहेब, अजित दादा यांच्यासह अनेकांची फार मदत झाली. आता हे सर्व उभे करण्याचे काम मी केले आहे. ते संभाळण्याचे काम तुम्हाला करायचे आहे, असे पिचड साहेब म्हणाले.

गेल्या 50 वर्षेच्या काळात तालुक्याचा चेहरा बदलला आहे. अगस्ति कारखाना, दुधसंघ, मार्केट कमिटी यांची आम्ही स्थापना केली. कारखान्यावर गडकडी साहेबांच्या मदतीने इथेनॉल प्रकल्प उभा केला. मात्र, गेल्या काही वर्षापुर्वी राजकारण्यांच्या मारामार्‍यांमध्ये कारखाना दोन वर्षे बंद पडला होता. त्याचा फार मोठा तोटा झाला, म्हणून तर उद्याच्या निवडणुकीत कारखाना हा बिनविरोध व्हावा अशी माझी इच्छा आहे. या तालुक्यात पर्यटन विकासात पट्टाकील्ला, कळसुबाई, रंधाफॉल, भंडारदरा अशा अनेक ठिकाणी विकासांची कामे झाली आहेत. तरुणांच्या हाताला रोजगार निर्मिती झाली आहे. तर, महत्वाचे म्हणजे देशाच्या आदिवासी बजेट जर कोणी मांडले असेल तर ते मी स्वत: मधुकर पिचड आहे. आज 5 हजार कोटी आदिवासी बजेट आहे. त्यासाठी शरदज पवार यांची मला मदत झाली आहे. तसेच क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक ठाणे कारागृहात व्हावे यासाठी मी पुढाकार घेतला होता. तेथे देखील ते स्मारक झाले आहे. आद्याप काही कामे करायची आहेत. कोकणात जाणारे पाणी तालुक्यासाठी आडवायचे आहे. अशी अनेक कामे आहेत. मात्र, जे काही करायचे होते. ते मी बर्‍यापैकी केले आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात मी सुखाने मरणार आहे. कारण, जे-जे मी स्मरण केले, ते-ते मी केेलं आहे....!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...

गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करत असताना पिचड साहेबांशी फार वेळा संपर्क झाला. आदिवासी मंत्री म्हणून त्यांनी न्यायासाठी फार मोठा संघर्ष केलेला आहे. समाजातील जातपात नष्ट झाली पाहिजे, त्यांना समाजात संधी मिळाली पाहिजे हेच त्यांचे विचार आहे. त्यामुळे, आदिवासी उन्नतीसाठी पिचड साहेबांनी फार मोठे काम केले आहे. पुर्वी पाहिले तर आदिवासी भागात दवाखाना असे तर डॉक्टर नसायचे, डॉक्टर असले तर नर्स नसायच्या, किंवा संसाधने नसायची. मात्र, सुदैवाने परिस्थिती बदललेली आहे. ते बदलण्यात अनेकांचे योगदान असेलही. मात्र, त्यात अग्रक्रमाने पिचड साहेबांचे नाव घ्यावे लागेल. कारण, ते आदिवासी मंत्री राहीले असून त्यांचा या विकासात फार मोठा वाटा आहे. गडकरी म्हणाले की, मी या विचारांचा माणूस आहे की, कोणताही माणूस जात, धर्म, पंथ यांनी मोठा नसतो. कारण, छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले ही लोक त्यांच्या विचारांनी आणि कर्तुत्वाने मोठे आहेत. त्यामुळे पिचड साहेबांना देखील कोणी प्रमाण देण्याची गरज नाही. ते आपल्या कर्तुत्वाने फार मोठे आहेत.

सहकाराबाबत ते म्हणाले की, नगर जिल्हा फार नशिबवान आहे. येथे सहकार फार मोठा आहे. उसाचे उत्पादन देखील फार आहे. कारखानदारीमुळे साखरेचा ऊत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, तरी देखील येणार्‍या काळात कारखानदारी टिकवायची असेल तर त्यासाठी जोडधंद्यांना महत्व दिले पाहिजे. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे इथेनॉल प्रकल्पांना प्राधांन्य देऊन त्याचे उत्पादन वाढविले पाहिजे. कारण, देशाला 240 लाख टन साखरेची गरज आहे.तर तिची निर्मित्ती 280 लाख टन होते. त्यामुळे, येणार्‍या काळात साठा अधिकाधिक होणार आहे. त्यामुळे, कारखाने तोट्यात जाण्याची शक्यता आहे. आता येणार्‍या काळात नगर जिह्यातून पेट्रोल हे हद्दपार करायचे आहे. त्यासाठी जिल्ह्यात इथेनॉलचे पंप आणि गाड्या देण्याची कबुली गडकरी यांनी दिली आहे. त्यासाठी त्यांनी विखे पाटील यांना साद घातली असून पेट्रोल हद्दपार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे. येणार्‍या काळात शेतकरी हा अन्नदाता नव्हे.! तर उर्जादाता बनला पाहिजे. त्यात त्यांनी बायोसीएनजी वैगरे संकल्पना कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर, अगस्ति कारखाना टिकवायचा असेल किंवा त्याचा विकास करायचा असेल तर तो पिचड साहेबांच्या ताब्यात द्या.! अन्यथा त्याची बिकट हाल होतील असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. 

आजचे अर्ज

आज अगस्ति सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत इच्छूक उमेदवार म्हणून 393 अर्ज विक्री झाली आहे. तर, 175 अर्ज दाखल झाले आहेत. आज आमदार किरण लहामटे यांचे वडिल यमाजी लहामटे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर, भास्कर बिन्नर, मच्छिंद्र  धुमाळ, संचालक महेश नवले, गुलाबराव शेवाळे, मधुभाऊ नवले यांचे चिरंजीव विक्रम नवले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सुभाष कदम, संजय वाकचौरे यांच्यासह 175 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.