घुलेवाडीत दोन गटात तुंबळ हाणामारी, एकच वारात हात धडावेगळा केला, रक्ताच्या थारोळ्यात तरुण तडफडत होता.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील नाशिक पुणे हायवेवरील अमृतेश्वर मंदिरासमोरील परिसरात जुनावाद मिटवण्यासाठी आलेल्या दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन एका तरुणाने धार-धार शस्राने वार करून हातच धडापासुन वेगळा केल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दि.19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान अमृतेश्वर मंदिर परिसरात घडली. यामध्ये साई दिलीप वाकुडे (रा. विडी कामगार,ता. संगमनेर) या तरुणाचा हात पूर्ण छाटल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला. तो गंभीर जखमी असल्याने नाशिक येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. ही घटना घडताच आरोपी फरार झाले. असुन पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आलेले नाही. तर साई वाकुडे हा अत्यावस्थेत असल्याने अद्याप त्याने जबाब दिलेला नाही. त्यामुळे, पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल नाही. परंतु, या घटनेने संपूर्ण संगमनेर शहर हादरून गेले आहे. कारण, हा वार धार-धार कोयत्याने केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शहरातील तरुण कोयते घेऊन फिरताना दिसत असुन तशा करावाया देखील पोलिसांकडुन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे,संगमनेर शहरात चालले तरी काय? ड्रग्ज, गांजा, हुक्का आता तर कोयत्याने वार करून हात तोडल्याची घटना समोर आल्याने शहरातील नागरिकांना मन सुन्न करणाऱ्या घटना एक-एक समोर येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल मंगळवार दि.18 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास काही तरुण घुलेवाडी परिसरातील कॉलेज समोर एकत्र आले. तेथे किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. या वादात कोण भारी पडते असा श्रेयवाद आपापसात चालू झाला. या वादात दहा ते बारा जणांनी एका युवकास मारहाण केली. या तरुणाला मारहाण करून ते म्हणाले. की, संगमनेरचे बाप आम्हीच आहे आणि तुझा बाप पण आम्ही आहे. त्यामुळे, या तरुणाला हे शब्द काळजाला लागले. हा तरुण बोलला की, उद्या तुमच्याकडे बघतो. परंतु, या तरुणाची दहशत असल्याने अनेकांना या घटनेत मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण, या तरुणाला ही मारहाण व शिवीगाळ जिव्हारी लागल्याने त्याच्या मनामध्ये राग होता.
दरम्यान, बुधवार दि.19 नोव्हेंबर रोजी सकाळी हा वाद मिटवण्यासाठी अनेक तरुणांनी प्रयत्न केला. त्यापैकी साई वाकुडे हा देखील मिटवण्यासाठी गेला होता. परंतु, काल या तरुणाचा मारल्याचा राग त्यांच्या मनामध्ये धुमसत होता. तो धार-धार शस्राने तयारी करून आला. वाद मिटवण्यासाठी तरुण नाशिक पुणे हायवेवरील अमृतेश्वर मंदिरासमोर आले. त्यांच्यामध्ये कालच्या घेटनेची चर्चा सुरू झाली. मात्र, या तरुणाला ज्याने शिवीगाळ केली. मारहाण केली तो त्याच्या समोर आला. त्या तरुणाला पाहिल्यानंतर राग अनावर झाला. त्याने धार-धार शस्राने हल्ला करणार. त्यावेळी साई वाकुडे हा मध्ये आला. या तरुणाने हात पुढे केला असता त्याचा हाताचा पंजा मनगटापासुन वेगळा झाला. त्यामुळे, साई वाकुडे हा रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला. तो गंभीर जखमी असल्याने या तरुणाला तात्काळ नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. हल्ला केल्यानंतर तिघांनी तेथुन धुम ठोकली आहे. ही सर्व धक्कादायक घटना आज सकाळी 9 ते 10 वजनाच्या दरम्यान घडली.पोलीस पुढील तपास करत आहे.
खरंतर, संगमनेर शहरात पोलिसांच्या अंगावर जाणे अरेरावी करणे ही आता फॅशन होऊ लागली आहे. राहता तालुक्यातील काही लोकांनी पोलीस आवारातच पोलिसांवर हात उचलला होता. आता पुन्हा कासारे येथील तरुण शहरातील 132 केव्ही जवळुन दुचाकीवर घरी चाला होता. त्याचा धक्का पायी चालणाऱ्या एका व्यक्तीला लागला. त्यानंतर दोघांमध्ये थोडासा वाद झाला. मात्र, ज्या व्यक्तीला धक्का लागला त्याचा नातेवाईक तेथे आला. आणि तो कासारे येथील तरुणाला अरेरावीची भाषा करू लागला. हा सर्व प्रकार पोलिसांनी पाहिला. पोलिसांनी तेथे जाऊन भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, धक्का लागणाऱ्याचा नातेवाईक इतका अरेरावी करू लागला. की, तो पोलीस निरीक्षक यांच्या अंगावर धाऊन गेला. त्यांनी तेथेच त्याला खाकी दाखवली. त्याचा चांगलाच समाचार पोलिसांनी घेतल्याची चर्चा आता संगमनेर शहरात रंगू लागली आहे. राजकीय वलयाखाली छाप सोडण्यासाठी गेला. परंतु, तो त्याच्या अंगलट आला.
दरम्यान, संगमनेर शहरात तरुण मुले मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळत आहे. नशेच्या गोळ्या खाऊन ते एकमेकांवर हल्ले करत आहे. आता या गोळ्यांचे कनेक्शन श्रीरामपूरातुन संगमनेरात येत असल्याचे बोले जात आहे. तर शहरात कधी हुक्का पिताना सुशिक्षित घराण्यातील मुले आढळतात तर कधी ड्रग्ज घेताना कॉलेजची मुले यासर्व घटना घडुन देखील पोलिसांची हातावर घडी तोंडावर बोट आहे. मात्र, या गुन्हेगारीच्या टोळ्यांना आता राजकीय अभय मिळत आहे. ते नेते मंडळींची पोस्टर लावुन गावात मिरवत असतात. आता यामध्ये अल्पवयीन मुले देखील टोळी करून नशा करतात. नंतर रात्रीच्यावेळी सामान्य माणसांना रस्त्याला लूटमार करताना पाहायला मिळतात. अकोलेनाका परिसरात या तरुणांनी धुमाकूळ घातला आहे. अनेकवेळा अधिकाऱ्यांच्या देखील यामध्ये चौकशी करण्यात आली आहे. कारण, तेथील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही. गुंजाळवाडी रोड, नाशिक पुणे महामार्ग, परदेशपुरा, अकोलेनाका येथे अल्पवयीन तरुणांनी टोळ्या करून चैन स्नॅचिंग, मोबाईल काढणे, डिझेल चोरी, रस्त्यावरील माणसांना अडवून रोख रक्कम काढणे असे प्रकार सुरू आहे. त्यामुळे, संगमनेर शहर पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक राहिला की नाही असा प्रश्न संगमनेर शहरातील सुज्ञ नागरिकांना पडत आहे.
