मुलीवर सामुहिक बलात्काराचा प्रयत्न.! तिच्या डोळ्यादेखत आईवर मेजरचा अत्याचार, चौघांनी घर जाळले, पती गेल्यानंतर मित्रांचे कारणामे,गुन्हा दाखल.!



सार्वभौम (संगमनेर) :-

           पती मयत झाल्यानंतर त्यांच्या मित्राने सात्वन म्हणून पत्नीला भेट दिली. आता ही एकटी आहे म्हणून त्याने वारंवार ये जा सुरू केली. हे देशभक्त आहे म्हणून पीडित महिलेने त्याच्याकडे एक आधार म्हणून पाहिले. मात्र, त्याने मित्र मयत झाल्यानंतर जी लाखो रुपयांची रक्कम मिळाली ती स्वत:च्या खात्यावर घेऊन महिलेची फसवणुक केली. त्यानंतर गुन्हा देखील नोंदला गेला. हा गुन्हा मागे घेण्यासाठी मेजर दारु पिवून पीडितेच्या घरी गेला आणि तिच्या मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकी देत महिलेवर अत्याचार केला. तरी देखील गुन्हा मागे घेतला नाही म्हणून आरोपी याने त्याचे मित्र आणूनच पीडितेचे जालना येथील घर जाळुन टाकले. त्यानंतर महिला दोन मुलींसह संगमनेर येथे आली असता आरोपी तेथे देखील आले आणि केस मागे घेत नाही म्हणून पीडितेच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे आयुष्य बरबाद होऊ नये म्हणून पीडित महिला त्यांच्या पाया पडली असता सगळ्यांच्या समोर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. अर्थात ही घटना एखाद्या चित्रपटाची मुळीच नाही. तर चित्रपटाला लाजवेल अशी वास्तवात घडलेली आहे. मात्र, यात तिला कोणाकडून न्याय मिळाला नाही. अखेर महिला आयोगाच्या आदेशाने संगमनेर पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरोपी शामकुमार देवानंद पुरभे (रा. मासरुळ, जि. बुलढाणा) बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमेनर येथे राहणार्‍या एका तरुणीचे 14 मे 2013 रोजी लग्न झाले होते. पती अधिकारी असल्यामुळे ते जालन्यात राहत होते. दि. 1 एप्रिल 2021 रोजी पीडितेच्या पतीचे निधन झाल्याने हे कुटुंब एकटे पडले होते. तेव्हा आरोपी हा सीआयएसएफ कार्यरत होता. तो पीडितेच्या पतीचा मित्र असल्यामुळे त्याने या कुटुंबाचे सांत्वन केले. एक विश्वासू माणूस म्हणून हा अधिकारी मयत झाल्यानंतर जी काही रक्कम भेटली होती. ती सर्व मेजरने त्यांच्या खात्यावर घेतली. मात्र, कालांतराने याची नियत फिरली आणि त्याने पैसे देण्यास नकार दिला. पीडितेने मुलींच्या शिक्षणासाठी, घर खर्चासाठी पैशांची वारंवार मागणी केली. मात्र, आरोपीने कायम उडवाउडविची उत्तरे देऊन टाळाटाळ केली. त्यामुळे, महिलेने दि. 19 डिसेंबर 2021 रोजी कायदेशीर मेजरच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर तो पसार झाला.

दरम्यान, दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी तो महिलेला व्हाटसअ‍ॅपवर धमक्या देत होता. मुलींना मारुन टाकीन, तुला ठार करेल असे प्रकार वारंवार होत होते. मात्र तरी देखील महिलेने धिर सोडला नाही. मात्र, काही दिवसानंतर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तो दारू पिऊन महिलेच्या घरी गेला आणि आल्याआल्या त्याने मुलीच्या गळ्याला चाकु लावला. दिलेली फिर्याद मागे घे.! नाहीतर हिला ठार करील असे म्हणून त्याच दिवशी महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर नशेत असताना अत्याचार केला. आता पहिलाच गुन्हा दाखल असताना त्यात न्याय मिळाला नाही. आहे तोच गुन्हा मागे घेण्यासाठी इतकी उठाठेव सुरु आहे. तर दुसरी फिर्याद देऊन कोठे इज्जतीचे पंचनामे करुन घ्यायचे? अशा हतबल परिस्थितीत जे झाले त्यावर पांघरून टाकून अत्याचार गिळून घेतला. मात्र, हा प्रकार येथेच थांबला नाही. तर, आरोपीने त्याचे काही मित्र आणले आणि दि. 17 जानेवारी 2022 रोजी पीडितेचे घर जाळुन टाकले. याबाबत महिलेने कादीम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. मात्र, त्यावर देखील समाधानकारक न्याय मिळाला नाही. आता घर जळाल्यानंतर बेघर अवस्थेत जायचे कोठे? म्हणून तिने दोन मुली घेऊन संगमनेर गाठले.

दरम्यान, आता तरी सुखाने आयुष्य जगता येईल असे मायलेकींना वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. एप्रिल 2022 मध्ये रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास शामकुमार पुरभे, जयराम पाठे, अक्षय मांडवे आणि पंकज धमणे हे सर्व दारु पिऊन संगमनेरला आले. पुरभे म्हणाला की, तु बरेच दिवस भेटली नाही असे म्हणून त्याने मुलीचा हात धरला आणि पीडितेशी झटापट सुरू केली. आपल्या आईसोबत हा माणूस चुकीचे वागतो आहे हे लक्षात येताच मुलीने त्यास विरोध केला. मात्र, तोच अन्य तिघांनी मुलीस धरले आणि म्हणाले की, हिच्या मुलीवरच अत्याचार करू, त्याशिवाय हि गुन्हे मागे घेणार नाही. तेव्हा, या तिघांनी मुलीच्या कपड्यांची आढाताण सुरू केली. मात्र, मुलीची इज्जत जायला नको म्हणून पीडितेने आरोपींच्या पायावर हात ठेवले. तिला बरबाद करु नका म्हणून विनंती केली. तुम्ही म्हणाल तसे करु असे सांगितले.  तेव्हा आरोपी पुरभे याने सर्वाच्या समक्ष पीडित महिलेवर अत्याचार केला. तु ज्या काही केसेस केल्या आहेत त्या मागे घे, अन्यथा मुलींचा जीव घेऊ वैगरे धमक्या देऊन सर्वजण तेथून निघुन गेले.

दरम्यान, आता हा आयुष्याचा राडा बंद करुन सुखाने जगावे म्हणून केसेस मागे घेण्याचा निर्णय देखील या माऊलीने घेतला. मात्र, त्याच दरम्यान आरोपी पुरभे यास बुलढाणा पोलिसांनी अटक केली आणि महिलेला संघर्ष करण्यासा बळ आले. त्यानंतर तिने खरोखर सामाजिक काम करणार्‍या महिलांशी संपर्क साधला आणि थेट महिला आयोगाकडे आपली कैफियत मांडली. सुदैवाने तिला तेथे न्याय मिळाला आणि आयोगाने संगमनेर पोलीस निरीक्षक यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आरोपी योग्यवेळी अटक झाला म्हणून महिलेने जो काही त्रास सहन केला. त्याला खर्‍या अर्थाने काही प्रमाणात न्या मिळाला असे म्हणता येईल. उपरोक्त फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. आता त्यात किती वास्तव आहे हे पोलिसांनी शोधून पीडित व्यक्तीस न्याय देणे अपेक्षित आहे. मात्र, जो काही प्रकार समोर आला आहे तो पाहिल्यानंतर खरोखर समाज व्यवस्था, मैत्री, नाती, शासन-प्रशासन आणि नैतिकता ही अस्थित्वात आहे का? असा प्रश्न सामान्य मानसांना सहज पडून जातो..!!!