अखेर अर्ज भरुन कैलास वाकचौरेंचा पक्षप्रवेश, अंतीम क्षणी 505 अर्ज विक्री, 287 प्राप्त, महाविकास आघाडी एकवटली.! तिरंगी लढत.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
गेल्या कित्तेक दिवसांपासून अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र रंगिबेरंगी दिसत होते. आज अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख होती. त्यामुळे, 3 वाजण्याच्या अखेर 505 अर्ज गेले होते. तर त्यापैकी, अंतीम क्षणापर्यंत 287 अर्ज निवडणुक अधिकार्यांकडे जमा झाले. यात महत्वाचे म्हणजे, गेल्या कित्तेक दिवसांपासून लांबनिवर पडलेल्या कैलास वाकचौरे (राष्ट्रवादी गटनेते) यांच्या पक्ष प्रवेशाला आज मुहुर्त मिळाला आहे. त्यांनी राष्ट्रवादीकडून पुन्हा आपली उमेदवारी केली आहे. त्यामुळे, हा पिचड साहेबांना फार मोठा धक्का सिताराम पाटील गायकर यांनी दिला आहे. वाकचौरे उद्या दि.21 जून रोजी मुंबईत अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा घरवापसी करणार आहेत. तर, यापलिकडे परिवर्तनाच्या मंडपात बी.जे.देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून ज्यांनी गायकरांसह अनेकांवर कठोर शब्दात टिका टिपण्णी केली. ते अशोकराव भांगरे देखील पुन्हा राष्ट्रवादीच्या मुळ प्रवाहात आपल्याला पहायला मिळाले. अर्थात भांगरे यांनी कधी अक्षेपहार्य भाषणे केली नाही. पण, नको तशी संगत लागल्याने त्यांना एकेकाळी माफी मागण्याची वेळ आली होती. आज मात्र, त्यांच्या वाटा बदलल्या असून ते येथे किंग मेकरच्या भुमिकेत पहायला मिळाले. तर, दुसरीकडे काँग्रेसने अकोले नगरपंचायतीत वेगळी चुल मांडली होती. त्याचे परिणाम काय झाले हे सर्वश्रुत आहे. मात्र, सहकारात त्यांनी सामोपचाराच्या गाडीत बसणे पसंत केले आहे. त्यामुळे, सहकाराचे तज्ञ मधुभाऊ नवले यांची टिम राष्ट्रवादीच्या सोबत बसलेली दिसली. तर, निवृत्त प्रशासक बी.जे.देशमुख यांनी गेली वर्षे दिडवर्षे कारखान्याची स्थिती काय आहे? हे सांगण्याचा प्रयत्न केला. कारखाना कडेेलोटावर आहे, तो कर्जबाजारी असून तर काही महिन्यात बंद पडणार आहे. असे काहीसे सांगून जनजागृती केली. मात्र, या दरम्यान, मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य कारखान्याची निवडणुक लढविणार नाही. असे पत्रकार परिषदेत छातीठोक सांगणार्या साहेबांनी आज अचानक ढांगाढोंगात अर्ज भरल्याने त्यांच्यावर मीडियातून बोचरी टिका होताना दिसली. तर, दुसरीकडे शेतकरी नेते दशरथ सावंत साहेब यांनी बैलगाडीतून येत आपला अर्ज दाखल केला. या पलिकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुशांत अरोटे व सुरेश नवले नमकी काय भुमिका घेतील हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आज अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर बर्यापैकी चित्र स्पष्ट झाल्याचे पहायला मिळाले.
याबाबत सविस्तर असे की, 2019 च्या निवडणुकीत मा.आ.वैभव पिचड यांचा विधानसभेला पराभव झाला आणि त्यानंतर जसजशा निवडणुका येत गेल्या. तसतसे माजी.मंत्री मधुकर पिचड साहेबांचे निष्ठावंत नेते कार्यकर्ते त्यांना सोडून चालते झाले. त्यात जिल्हा बँक लागली आणि 16 मार्च 2020 रोजी सिताराम पाटील गायकर बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ 18 नोव्हेंबर 2020 रोजी मधुभाऊ नवले आणि पिचड साहेबांची निष्ठावंत मिनानाथ पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. म्हणजे. सन 1995 साली जशी परिस्थिती निर्माण झाली होती. तशी 2020 ते 22 या दरम्यान पहायला मिळाली. तेव्हा (1995) मात्र कैलास वाकचौरे पिचड साहेबांच्या सोबत होते. आता मात्र, कारखाना आणि जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी दि.20 जून 2022 रोजी साहेबांना सोडून आपल्याच घरी नांदण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे, अर्थात आज उद्या करता-करता त्यांनी गेली पाच महिने घड्याळाचे काटे फिरते ठेवले होते. मुंबई की तालुक्यातील मेळाव्यात असे करता-करता काही सेकंद आणि मिनिटात अनेकांची टिकटीक बंद करून टाकली आहे.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे, एकीकडे पिचड साहेब, दुसरीकडे गायकर साहेब आणि तिसरीकडे बी.जे.देशमुख साहेब अशा प्रकारचे चित्र सध्यातरी स्पष्ट दिसून लागले आहे. तर, कोणत्याही परिस्थितीत आता कारखाना बिनविरोध होईल असे चित्रच धुसर झाले आहे. त्यामुळे, जोवर (22 जून ते 6 जुलै) माघारीचा तारीख टळत नाही. तोवर काही संकल्पना स्पष्ट होणार नाही. मात्र, गायकर गट हा परिवर्तन पॅनलला कोणत्याही परिस्थितीत साद घालणार नाही. तर उलटपक्षी पिचड साहेब परिवर्तन पॅनलला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात. अशी शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारची चर्चा आहे. आता खर्या अर्थाने राज्यासारखी परिस्थिती अकोल्यात निर्माण झाली आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे बळ आणि दुसरीकडे भाजपचे बळ. त्यामुळे, कारखान्यात फार काट्याची टक्कर होणार असे चिन्ह दिसत आहे. तर, राष्ट्रवादीने आता समायोजन केले तर ठिक अन्यथा नगरपंचायतीप्रमाणे भोंगळ कारभाराचे दर्शन झाले तर थोडाफार तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे, आज एक दिसणारे 6 जुलै पर्यंत कोठेकोठे दाणाफान होतात. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
खरंतर, गेल्या कित्तेक दिवसांपासून कारखाना अडचणीत आहे. असे बोलले जात होते. मात्र, अशा परिस्थितीत निवडणुक लागली आणि बोलबोल करता 505 अर्ज विकले गेले. अंतीम क्षणी 287 अर्ज प्राप्त झाले असून यात पिचड साहेब, गायकर साहेब, सावंत साहेब आजी-माजी संचालक अशा अनेक मातब्बर लोकांनी दोन-दोन अर्ज भरले आहेत. त्यामुळे, सरासरी 21 जागेसाठी 225 अर्ज असण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी फक्त विकास शेटे वगळता कोणाचा अर्ज नव्हता. तर, 44 अर्ज विकले गेले होते. दुसर्या दिवशी 109 तर 52 अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर 393, त्यानंतर 112 असे अंतीम 505 अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी, 218 जणांनी अर्ज नेवून ते भरले नाहीत. तर 287 जणांनी उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यात दि. 21 जून 2022 रोजी बरेच अर्ज छाननीमध्ये उडण्याची शक्यता आहे. तर, सात गटांची छाननी 21 जून रोजी 11 वाजेपासून सुरू होणार असून 2:30 पर्यंत ती चालणार आहे. अकोले, इंदोरी, आगार, कोतुळ, देवठाण, महिला राखीव आणि संस्थात्मक प्रतिनिधी अशी क्रमश: छाननी असून प्रत्येक गटाला अर्धा तास देण्यात आला आहे. छाननी वेळी उमेदवार व सुचक यांनाच कगदपत्रांसह प्रवेश राहणार आहे. उशिरा हरकत स्विकारली जाणार नाही, वेळेत हरकत घ्यायची असल्यास ती लेखीच स्वरुपात स्विकारली जाणार आहे असे निवडणुक अधिकार्यांचे आदेश आहेत.