राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष व्हायला उतावळे नवरे.! आमदारांचा दणका, आता लवलेटर आणि माफीनाम्याचे कौतुक नको.! कोण होणार अध्यक्ष.!


- sagar shinde

सार्वभौम (अकोले) :-

          अकोले तालुक्यात 2019 च्या परिवर्तनात  राष्ट्रवादीला आपला गड राखण्यात यश आले. डॉ. किरण लहामटे 1 लाख 53 हजार मते घेत निवडून आले. अर्थात ही कोण्या एकाची ताकद नव्हती तर संबंध जनता एकवटली आणि परिवर्तनाच्या नावाखाली त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीला पसंती दिली. दरम्यानच्या काळात जे काही चारदोन डोके होते. त्यांनी असे काही चित्र उभे केले. की, डॉ. लहामटे यांना आम्हीच निवडून आणले आहे. त्यात कोणी असे होते. की, डॉ. लहामटे यांना तिकीट देण्यात आमचा खारीचा वाटा आहे. त्यामुळे, गेली दोन वर्षे काही तथाकथित कार्यकर्ते अशा काही अविर्भावात फिरत होते की, जणुकाय आम्हीच आमदार आहोत. पण, आमदारांनी त्यांची गाडी त्यांच्याच तालामालात सुरू ठेवली. गाडीखाली कोण चाललय, गाडीचे श्रेय्य कोण घेतय याकडे त्यांनी आजवर दुर्लक्ष केले. मात्र, हाद्द पार करायला देखील काही मर्यादा असतात. त्यांचे उल्लंघन झाले आणि अनपेक्षित जिल्ह्यातून काही सुत्रे हलली. त्यात राष्ट्रवादीच्या युवक तालुकाध्यक्षांची हकालपट्टी झालीच. मात्र, त्यांच्या पाठोपाठ संपुर्ण कार्यकारणी मंडळ बरखास्त झाले. त्या निमित्ताने पक्षात बंडखोरी करुन उजळ माथ्याने फिरणार्‍या काही व्यक्तींना देखील बाहेरचा रस्ता दाखविला गेला. त्यानंतर आता नव्याने येथे कोणाची वर्णी लागणार? असा प्रश्न उपस्थित झाला असता त्यात काही नावे चर्चेत येऊ लागली आहे. आता कोणाला संधी द्यायची हा आमदार साहेब आणि जिल्हा पातळीचा विषय आहे. मात्र, आगीतून उठून फुफूट्यात पडायची वेळ येऊ नये म्हणजे झालं.!

मुळत: प्रश्न रवि मालुंजकर यांच्यापासून सुरू होतो. अगदी पक्षाशी एकनिष्ठ, कर्तुत्ववान गडी, नितळ, निर्मळ आणि प्रांजळ मनाचे व्यक्तीत्व. परंतु झालं काय? ते त्यांच्या गावात जसे सरपंच झाले. तेव्हापासून त्यांच्यावर वरदहस्त ठेवलेल्या ज्येष्ठ व्यक्तीशी निष्ठा राखताना त्यांना पक्षनिष्ठा, आपल्या पदाची जबाबदारी आणि आमदार यांच्यातील फरक लक्षात आला नाही. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी पंचायत समिती येथे नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांना क्रॉस केले. तेव्हापासून ते मालुंजकर हे एक चर्चेचा विषय ठरले. मुळात जसे आमदार एका ज्येष्ठ व्यक्तीविषयी बोलल्यानंतर मालुंजकर यांना झटका आला. तसे थोरात साहेबांना ते उलटून बोलले तेव्हा अनेकांना झटका आलाच की.! एव्हाना खुद्द नामदार साहेबांना देखील त्याचे वाईट वाटले. कारण, त्यांच्या शब्दाचा आदर आख्खा महाराष्ट्र करतो. त्यामुळे, त्यांच्याशी बोलताना किती तारतम्य बाळगले पाहिजे याचे भान तेव्हाच मालुंजकर यांना असायला हवे होते. कारण, ते सरपंच यापेक्षा एका मोठ्या आणि सत्ताधारी पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष होते. त्यांनी चार चौघात हा प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडायला हवा होता. किंवा वैयक्तीक भेटून नामदारांना पटविता आले असते. इतके मोठे पद त्यांच्याकडे होते. मात्र, झाले काय? त्यांच्या भावना प्रांजळ असल्या तरी त्याचा विपर्यास झाला आणि त्यांना टिकेचे धनी व्हावे लागले. परिनामी हे सगळे आमदारांच्या हस्तक्षेपाने झाले असा आरोप झाला आणि काही व्यक्तींनी नामदारांचे कान फुकले. परिनामी हा तेढा गेली कित्तेक दिवस सुटला नाही.

आता नामदारांचे मन जिंकण्यासाठी मालुंजकर यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांचे अकोल्यात जंगी स्वागत गेले. मात्र, हे कोण? असा प्रश्न पुढे आला असता पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या. एव्हाना त्या करुन देण्यात आल्या. खरोखर तेव्हापासून तर आजवर आ. डॉ. लहामटे हे मालुुंजकर यांना शब्दभर बोलले नव्हते. तेव्हा, मालुंजकर यांच्यावर कारवाई करा अशी मागणी झाली. तरी, आमदारांनी ठामपणे ना चा पाढा वाचून दाखविला. मात्र, हमारी बिल्ली हमपर म्याँव.! अशी गत झाली आणि या तालुकाध्यक्षांनी आमदारांचा निषेध केला. खरंतर, राजकारण इतकं प्रामाणिक आणि प्रांजळ असते तर रामराज्य आले असते. मात्र, मालुंजकर यांनी सरपंच म्हणून दिलेली प्रतिक्रिया बरोबर असली तरी, एक जबाबदार तालुकाध्यक्ष म्हणून शंभर टक्के चुक होती. त्यामुळे, एकदा पाठीशी घालणे सहाजिक होते. मात्र, वारंवार पाठीशी घातले तर काळ सोकावतो. त्यामुळे, येणार्‍या काळात पक्षविरोधी काम करणे, पक्षातील नेत्यांची अवहेलना करणे, बंडखोरी करणे हे ज्यांच्या अंगवळणी पडले आहे. त्यांच्यासाठी हा फार मोठा धडा ठरला आहे. आता फक्त माफीनाम्याचे कौतुक नाचवायला नको. पत्रकबाजी आणि मी कसा धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे हे मांडून मला फक्त कार्यकर्ता म्हणून रहायचं आहे असली सोंग नाचवायला नको. अन्यथा, राष्ट्रवादीच काय पक्ष कोणताही असो, त्याला उतरती कळा लागल्याशिवाय राहणार नाही असे जाणकार लोक मत व्यक्त करु लागले आहेत. 

आता, मालुंजकर यांच्यानंतर नव्याने युवकाध्यक्ष कोण? असा प्रश्न पडल्यानंतर अनेकांनी गुढग्याला बाशिंग बांधले आहे. कोणी आमदारांच्या गाडीत बसून त्यांच्या डोळ्यासमोर नांदू लागले आहेत. तर कोणी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र, खर्‍या अर्थाने वेळ देणारा, पक्षाशी एकनिष्ठ राहणारा, युवकांमध्ये काम करणारा, विशेष म्हणजे खरोखर युवक दिसणारा, दोन रुपये खर्च करण्याची ताकद असणारा, उपक्रमशिल तरुण या पदावर नियुक्त करणे अपेक्षित आहे. हा तरुण शहरातील नको तर तालुक्यातून अर्थात शहराच्या जवळ असणार्‍या गावातून दिला पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून काही नावे चचेर्र्त आहेत. मात्र, ज्यांनी पात्रता देखील नाही ते उतावळे नवरे झाले आहेत. ही निवड करीत असताना आता आमदार महोदय आणि राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपील पवार यांनी 2019 च्या भुतकाळाचा विचार न करता 2024 च्या भविष्यकाळाचा विचार करुन निवडी केल्या पाहिजे. आमदार महोदयांना थोड अविश्वसनिय वाटेल. मात्र, हे सत्य आहे की, तालुक्यात जी काही पदे वाटली आहेत. त्यापैकी काही पदाधिकारी वगळता अनेकजण आमदारांवर टिका टिपण्णी करण्यात व्यस्त आहेत, इकडच्या चुगल्या तिकडे सांगण्यात दंग आहेत, पक्षा-पक्षात वाद लावण्यात माहिर आहेत, नेत्यानेत्यांमध्ये भांडण लावणारे कलाकार आहेत. त्यामुळे, आता तरी योग्य व्यक्तीला संधी देणे अपेक्षित आहे. 

  महत्वाचे..!

आज दि. 28 मे रोजी सायंकाळी सावंतवाडी येथे निळवंडे धरणाच्या पाटाच्या बोगद्याची सरकारी शुटिंग सुरु होते. तेव्हा एक ड्रोन कॉमेरा हा जास्त हवेमुळे रेंजच्या बाहेर गेला आहे. तो इंदोरी, बागडदरा, रुंभोडी, म्हाळदेवी या परिसरात जाण्याची शक्यता आहे. कृपया जर हा ड्रोन कोणाला सापडला तर त्वरित संपर्क साधावा. प्रामाणिक व्यक्तीने तो आणुन दिल्यास योग्य ते बक्षिस दिले जाईल. सपर्क :- 8888782010 आणि 8390607263