मै तुमको बहुत चहता हुँ, क्या मै तुम्हारे साथ सो सकता हँ.! शेजारी रहायला आला अन गरोदर ठेवून पळून गेला.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील अलकानगर परीसरात एका 20 वर्षीय महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला सहा महिन्यांची गरोदर असल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलीसांनी सुफीयान जब्बार शेख (वय 25 रा. भारतनगर, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित महिला गरोदर असल्याने आरोपी सुफीयान शेख हा कुटुंबासह पसार झाला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहे. तर संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढत आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक असल्याने पोक्सो सारखे गंभीर गुन्हे दाखल होत आहे. त्यामुळे, तालुक्यातील सामाजिक संघटनानी पुढे येऊन जनजागृती करणे अपेक्षीत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिलेच्या शेजारी आरोपी सुफीयान शेख हा एक वर्षांपूर्वी कुटुंबासह राहण्यासाठी आला. आरोपी सुफीयान शेख व पिडीत महिलेचे घर शेजारी असल्याने त्याची पिडीत महिलेवर अगदी बारीक नजर राहत होती. मात्र, एक व्यक्ती म्हणुन त्याची तिच्यावर वाईट नजर होती. पिडीत महिलेची आई व भाऊ हे दररोजच्या कामासाठी घराबाहेर गेले. पिडीत महिलेला एकांत पाहुन या वासनांध नराधमाची नजर पिडीत महिलेवर पडली. पिडीत महिला घरात एकटीच असल्याने याने घराच्या पाठीमागच्या दरवाजाने घरात शिरकाव केला. आरोपी सुफीयान शेख याला घरात अचानक पाहुन पिडीत महिलेने आरडा-ओरडा केला व बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोपी सुफीयान शेख याने ऐकले नाही. तो धमकी देत म्हणाला की, तुम मुझे बहुत पसंद हुं, मैं तुम्हारे सात सोना चाहता हुं असे म्हणुन त्याने पिडीत महिलेसोबत अश्लिल चाळे करण्यास सुरवात केली. व पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध संभोग केला. त्यानंतर, कोणाला काही सांगितले तर मैं तुझे मार डालुंगा अशी धमकी दिली. दरम्यान, आरोपी सुफीयान शेख याने पिडीत महिलेच्या घरी कोणी नसले की त्या संधीचा फायदा उचलला व जीवे मारण्याची धमकी दिली. नराधम सुफीयान शेख याच्या दबावाला आणि धमक्यांना पिडीत महिला बळी पडली. आरोपी सुफीयान शेख या धमकीचा फायदा उचलत पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी बलात्कार केला. काही दिवसांनंतर पिडीत महिलेच्या पोटात दुखू लागले. पिडीत महिलेने आरोपी सुफीयान शेख याला सांगितले असता त्याने पिडीत महिलेला एका खाजगी दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरांनी पिडीत महिलेला सोनोग्राफी करण्यास सांगितले. आरोपी सुफीयान शेख हा पुन्हा पिडीत महिलेला सोबत घेऊन सोनोग्राफी करतो. त्यामध्ये पीडित महिला सहा महिन्यांची गरोदर असल्याचे समजते. हे आरोपी सुफीयान शेख याला समजताच तो कुटुंबासह त्या परिसरातून धुम ठोकतो असे पिडीत महिलेच्या सांगण्यावरून लक्षात आले आहे. दरम्यान,पिडीत महिलेला राग अनावर झाला. तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. पिडीत महिलेने आरोपी सुफीयान शेख याला पाठीशी न घालता थेट पोलीस ठाणे गाठले व सर्व कैफियत सांगीतली असता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहे.