११ वी च्या विद्यार्थिनीसोबत त्याने गुपचूप संसार थाटला, तीन महिन्याची गरोदर राहिल्याने प्रकार समोर आला.! मजनुसह बापासह अटक.!

 


 सार्वभौम (अकोले) :- 
                         ११ वी च्या मुलीसोबत एका तरुणाने प्रेमसंबंध ठेवून तिला लग्नाचे अमिष दाखविले.  घरच्यांच्या विरुद्ध जाऊन या बहादराने तिच्याशी गुपीतपणे संसार देखील थाटला. ती घरात एकटी असताना तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केले. विशेष म्हणजे पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील त्याने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेतला. यात ती तीन महिन्याची गरोदर राहिल्याने दोन कुटुंबात प्रचंड वाद झाला आहे. ही घटना अकोले तालुक्यातील देवठाण येथे दि. 15 मे 2022 रोजी घडली आहे. यात कमलेश सुखदेव पथवे व सुखदेव पांडू पथवे (दोन्ही रा. देवठाण, ता. अकोले, जि.अ.नगर) यांच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या कारणाम्यामुळे बापाला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
         याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित विद्यार्थिनीने ११ वी शाखेचे नुकतेच पेपर दिले आहे. गेल्या ७ ते ८ दिवसांपुर्वी ती घरी नसल्याने तिच्या आजीने तिची शोधाशोध केली. तेव्हा देवठाण येथील शाळेच्या आवारात पीडित मुलगी ही आरोपी कमलेश पथवे याच्यासोबत बोलताना दिसून आली. तेव्हा आजीने तिला ग्रामीण भाषेत चांगलेच झापले आणि घरी चल अशी सुचना केली. मात्र, तेव्हा ती म्हणाली की, माझे कमलेशवर फार प्रेम आहे. त्याचे देखील माझ्यावर प्रेम आहे. तो माझ्यासोबत लग्न करणार आहे. तू येथून निघुन जा. तेव्हापासून यांचे प्रेम बऱ्यापैकी जगजाहिर होत चालले होते. त्यांचा हा प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला. ही दोघे कामानिमित्त नाशिक येथे असल्यामुळे ते तत्काळ देवठाण येथे आले. त्यांनी आपल्या मुलीस समजून सांगितले. आम्ही कष्टाने कामे करुन तुम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे, असले काही उद्योग न करता तुम्ही शिकून मोठं व्हावं. बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्यानंतर मुलीने पुन्हा असे करणार नाही असे सांगितले. जर असे उद्याग करायचे असेल तर नाशिक येथे चल असे म्हटले असता मुलीने तिकडे जाण्यास नकार दिला.  समज दिल्यानंतर तिचे आई वडिल निघुन गेले.
        दरम्यान, हा सर्व प्रकार घडून देखील गेल्या काही दिवसांपुर्वी आजी भाजीपाला विकण्यासाठी गेली असता आरोपी कमलेश हा त्यांच्या घरी गुपचूप येत होता. पीडितेवर अत्याचार करीत होता. मात्र, त्यांनी आता सर्वच सामाजिक व कायदेशिर मर्यादा ओलांडल्या होत्या. कारण, पीडित मुलगी घरी येत नसल्याचे लक्षात आले असता आजी तिला पाहण्यासाठी कमलेश पथवे याच्या घरी गेली होती. तेव्हा ही दोघे त्यांच्याच घरी राहत असल्याचे आजीने पाहिले. तेव्हा तिने हा प्रकार कमलेशचे वडिल सुखदेव पथवे यांना सांगितला. तेव्हा त्याने आजीला शिविगाळ दमदाटी केली. मला सर्व माहित आहे. तुला जे करायचे ते करुन घे असे म्हणत त्याच्या मुलास पाठीशी घातले. आजीने पीडित मुलीस घरी चल अशी विनंती केली असता ती म्हणाली की, आता आम्ही नवरा बायको आहोत. मला येथेच रहायचे आहे, मला तुमच्या  घरी यायचे नाही. त्यावेळी सुुखदेव पथवे याने आजीशी हुज्जत घातली व तेथून काढून दिले.
          दरम्यान, घडला प्रकार पीडित मुलीच्या आई वडिलांना सांगितला असता त्यांचा अपघात झाल्यामुळे त्यांना यायला उशिर झाला होता. या दरम्यान अवघ्या ११ वी च्या मुलीसोबत आरोपी याने संसार थाटला होता. जेव्हा आई आली तेव्हा मुलीला त्यांनी आपल्या घरी आणण्यासाठी गेले असता पथवे कुटुंबाने तिला येऊ दिले नाही. तेव्हा तिच्या आईने त्यांना समजून सांगितले की, माझी मुलगी अजून लहान आहे, तिचे वय नाही, तिला समज नाही. प्रेम आणि विवाह समजण्याइतपथ तिचे विचार नाही. त्यामुळे, तिला आमच्याकडे द्या. तरी देखील आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा आईने मुलीस ताब्यात घेऊन घरी नेले आणि तिला घडल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेव्हा तिने सांगितले की, आरोपी हा गेल्या ७ ते ८ दिवसांपासून माझ्यावर अत्याचार करतो आहे. मला गेल्या तीन महिन्यांपासून मासिक पाळी आलेली नाही. तेव्हा आईने डॉक्टरांकडे नेऊन पीडितेची तपासणी केली असता ती तान महिन्याची गरोदर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वैद्यकीय अहवालानुसार आता कमलेश पथवे आणि सुखदेव पथवे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.