शेतकऱ्यांच्या मालावर डल्ला मारणारी सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद.! अकोल्यात चौघांना ठोकल्या बेड्या.!

 

सार्वभौम (अकोले) :- 

                           अकोले तालुक्यात  वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वस्तु चोरणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून चारा कापण्याचे मशिन, पाणी उपसा करणाऱ्या मोटारी, दुचारी, मिल्किंग मशिन अशा विविध वस्तूंसह 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात चौघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना पुढील चौकशीसाठी दि. 11 मे 2022 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात तुषार बद्रीनाथ गवांदे, बबन सयाजी मांदळे (दोन्ही राहणार चैत्यनपुर ता अकोले) मयुर रामदास महाले व दौलत साहेबराव महाले (दोन्ही रा. बेलापुर ता. अकोले) अशी चोरट्यांची नावे आहेत. तर, अकोले पोलीस ठाण्याचे सहायक पलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी यापुर्वी देखील अशीच चोरट्यांची टोळी पकडली होती. त्यांच्याकडून देखील मोठा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यामुळे, घुगे यांचे तालुक्यातील सामाजिक संघटनांनी कौतुक केले आहे. आता अटक केलेले आरोपी हे सराईत असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उलक होऊ शकते. त्यामुळे, जर कोणाचे काही चोरी गेले असेल तर त्याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा. कष्टकरी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांना आम्ही सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाही. असे घुगे म्हणाले.

         

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील काही दिवसांपासुन अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मिल्कींग मशीन तसेच चारा कापण्याचे यंत्राचे (कुट्टी मशीन ) इंजिन चोरी जाण्याचे प्रकार वाढले होते. या दरम्यान, दि. 6 जानेवारी 2022 रोजी रात्री चैतन्यपूर परिसरातुन एका शेतकऱ्याची 20,000 रु. किमंतीची मिल्कीग मशिन चोरी गेलेबाबत अकोले पोलीस स्टेशन तक्रार दाखल झाली होता. त्यानुसार अकोले पोलीस स्टेशनला कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा प्रकार सातत्याने घडत असल्याने सहायक पोलीस निरिक्षक मिथुन घुगे यांनी नाकाबंदी, कोंम्बीग ऑपरेश सुरु केले. तेव्हा गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तुषार बद्रीनाथ गवांदे व बबन सयाजी मांदळे (दोन्ही राहणार चैत्यनपुर ता अकोले) हे मिळुन चोरी करतात. तेव्हा त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी पहिल्यांदा जरा नाटकं केली. मात्र, जरा त्यांना पट्ट्याने ढिल्ले केले असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. हे काम आम्ही दोघांनीच नव्हे तर मयुर रामदास महाले व दौलत साहेबराव महाले (दोन्ही रा. बेलापुर ता अकोले)  यांनी देखील केले. त्यानंतर दोघांची नावे कळवुन यांचे मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याने वरील चारही व्यक्तींना पोलिसांनी अटक केली. आज त्यांना मा. न्यायालयासमोर हजर करुन त्यांची दि. 11 मे 2022 रोजी पावेतो  पोलीस कस्टडी रिमांड घेतली आहे. 

          दरम्यान त्यांचेकडून 20 हजार रुपये किमंतीचे स्वंयचलित मिल्कींग मशिन (दुध काढण्याचे मशिन), 24 हजार रुपये किमंतीचे 4 कुट्टी मशीनचे इंजिन तसेच सदर चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 3)50 हजार रुपये किमंतीची बजाज प्लटिना मोटार सायकल नंबर एम एच 17 सी एस 2836  आणि 45 हजार रुपये किमंतीच स्पेंडर मोटार सायकल नंबर एम एच 17 सी पी 6343 मोटार सायकल  असा एकुण 1 लाख 39 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास अकोले पोलीस करीत असुन सदर आरोपीं यांचेकडुन अकोले पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात चोरी गेलेल्या गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे. सदर आरोपी विरुदध अकोले  पोलीस स्टेशनला प्रत्येकी २ गुन्हे दाखल आहेत. 

            सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो व मा. अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन घुगे, पोउपनिरी भुषण हांडोरे,व अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोना किशोर तळपे, पोना विठ्ठल शेरमाळे, पोकॉ सुहास गोरे, पोकॉ सुयोग भारती, पोकॉ अविनाश गोडगे, पोकॉ आत्माराम पवार, यांनी केली असुन पुढील तपास पोना किशोर तळपे व पोना विठ्ठल शेरमाळे हे करीत आहे.

 तर रविवार दि. 6 मार्च 2022 रोजी घुगे यांना गोपनिय पद्धतीने माहिती मिळाली होती की, अकोले तालुक्यातील गर्दणी, खानापूर आणि तांभोळ येथे सोयाबीन चोरीचे आरोपी आहेत. त्यानुसार घुगे यांच्या पथकाने गर्दनी येथे छापा टाकून पहिल्यांदा अजय बाळु मेंगाळ, लहु वाळीबा मेंगाळ (रा. तांभोळ, ता. अकोले), विजय अशोक खोडके (रा. खानापूर, ता. अकोले) व भिमाराज गंगाराम मेंगाळ (रा. खानापूर, ता. अकोले) या चौघांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या होत्या. त्यांना पोलिसांनी सर्व प्रकार आणि साथीदार यांच्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून पोलिसांनी समाधानकारक उत्तरे मिळाली नव्हती. त्यामुळे, पाहे प्रसादाची वाट आणि आमचा रामराम घ्यावा या पद्धतीचा वापर केला असता चौघे आरोपी अगदी पोपटासारखे बोलले होते. कशी चोरी केली, कशात घालुन सोयाबीन नेली, कोठे नेऊन ठेवली, आणखी कोठे चोरी केली, सोबत सहआरोपी कोण होते? हे सर्व सांगितल्यानंतर त्यांनी राजूर येथील आणखी दोघांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी राजूर गाठले आणि तेथून मयुर लहाणु मुर्तडक आणि नंदु रामा भाले (रा. दिगंबर, ता. अकोले) या दोघांना ताब्यात घेतले. आम्ही नाही त्यातले म्हणताच त्यांना खाकीचा प्रसाद प्रदान केला असता दोघांनी आपला गुन्हा कबुल केला होता.

तर अकोले तालुक्यासह संगमनेर, कोपरगाव, घारगाव अशा अनेक ठिकाणी विहिर आणि नदीवरील मोटर चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या. त्यामुळे, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी विशेष पथक तयार करुन लक्ष घातले होते. त्यामुळे, तालुक्यात कोंम्बींग ऑपरेशन आणि नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात अकोल्यातील कळस येथून चार दरोडेखोरांना या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून काही पाण्याच्या मोटारी व अन्य 11 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. भाऊसाहेब तुकाराम डोके, संदिप सखाराम पथवे, विकास वसंत वाकचौरे, निलेश गोरख अगविले (सर्व रा, कळस बु. ता. अकोले. जि. अ.नगर) अशा चौघांना पोलिसांनी अटक केली होती. एकंदर चोरीचे सत्र कमी करण्यात घुगे यांना यश येत आहे. तर, गुन्ह्याची उकल होऊन त्याची रिकवरी देखील होताना दिसत आहे.