गायकरांचा पिचडांना मोठा दणका.! माजी आमदारांचा ठराव केला नामंजुर.! बोटं मोडणार्‍यांना हे घ्या प्रमाण.!

    


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

    सन 2019 च्या पराभवानंतर सिताराम पाटील गायकर हे 16 मार्च 2021 रोजी खुद्द अजित दादा पवारांच्या मध्यस्तीने स्वगृही परतले. मात्र, त्यांच्या गटाला आमदार महोदयांसह कार्यकर्त्यांनी फारसे स्विकारले नाही. घर का ना घाट का अशी राजकीय दोलायमान परिस्थितीत आजही दिसून येते. हे पक्षात नाही अशा अविर्भावात काही टिकोजी त्यांनी टिकेचे धनी करतात तर त्यांना राजकीय दृष्ट्या बदनाम करण्यासाठी राष्ट्रादीतच काहींनी मानसे पेरली आहेत. त्यामुळे, गायकर आणि पिचड म्हणजे सहमती एक्सप्रेस, पिचडांचा नको गायकरांचा राजिनामा घ्या, ही दोघे एकाच माळेचे मणी आहेत अशी वल्गना करणार्‍यांनी खर्‍या अर्थाने ही माहिती चपराख देणारी आहे. कारण, अगस्ति दुधसंघात माजी आमदार वैभव पिचड यांचा ठराव खुद्द गायकर साहेबांनी पुर्ण ताकद लावून नामंजुर केला आहे. दोन्ही बाजुंची समान माते झाल्याने ना कोरम पुर्ण झाला ना बहुमत झाले. तरी देखील जनरल मॅनेजर यांनी ठराव नगरच्या सारख सहसंचालकांकडे सादर केला होता. त्याला गायकर गटाने अक्षेप घेऊन तो बेकायदेशीर कसा आहे. हे सिद्ध करून नामंजुर करुन घेतला. त्यामुळे, हे पुतना मावशीचे प्रेम नव्हे.! तर पवार घराणे आणि आमदार किरण लहामटे यांच्या नेतृत्वाशी मी प्रामाणिक आहे. हे त्यांनी सिद्ध करुन दाखविले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे, पिचडांना मोठा धक्का बसला असून चेअरमन आणि व्हा-चेअरमन त्यांचे असून देखील माजी आमदारांना तेथे गायकरांनी राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली आहे. तर त्यांच्या निष्ठेवर अक्षेप घेणार्‍यांच्या तोंडात मारल्यासारखा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

सन 1976 साली अगस्ति दुधसंघाची स्थापना झाली. त्यावेळी स्व.दादासाहेब रुपवते, स्व.यशवंतराव भांगरे यांचे राज्यात चांगले चालत होते. तर तालुक्यात माजी मंत्री मधुकर पिचड हे तेव्हा सभापती असल्याने त्यांचा बोलबाला होता, त्यांच्यासह भाऊसाहेब हांडे, सिताराम पाटील गायकर यांच्यासराखे अनेकजण दुधसंघाच्या उभारणीसाठी झटत होते. जवळजवळ तेव्हापासून ते अगदी आज 2022 पर्यंत पिचड साहेबांनी दुधसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आता मात्र 2019 च्या विधानसभेच्या पराभवानंतर तालुक्याची गणिते बदलली आहेत. डॉ. लहामटे हे आमदार झाले तरी त्यांना एकही स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेता आली नाही. पंचायत समिती आणि नगरपंचायत ही त्यांच्या बगलबच्च्यांमुळे कधी ताब्यातून गेली हे देखील समजले नाही. मात्र, त्यातून त्यांनी काही एक धडा घेतल्याचे दिसत नाही. उगच कोणाचे तरी ऐकायचे आणि त्यांच्या अधिन जाऊन आपल्याच लोकांवर टिकास्त्र उगारुन त्यांना बळीचा बकरा करायचे. हे आपण कॉलेजच्या गेटवर काय झाले ते पाहिले. होतीच लोकसेवा आणि परिवर्तनाची आवड तर पिचडांचा राजिनामा होईपर्यंत का आंदोलन केले नाही? आहो.! ज्या पिचडांनी पंधरा दिवसांपुर्वी रिपाईला एक स्विकृत नगरसेवकाचा शब्द दिला त्याची काही तासात धुळदान केली आणि विरोधकांचा एकही राजिनामा न घेता सहा महिन्यांच्या बोलीवर आंदोलन मिटले. ते ही आपल्याच मानसांच्या राजिनाम्यावर? ही चाल कोणाची? याचे आत्मचिंतन आमदारांनी केले पाहिजे..! हे मांडण्याचे कारण असे की, ज्या गायकरांनी तुम्ही पिचडांचे सोबती म्हणत होते. त्यांनी हसत-हसत पाच जणांचा राजिनामा तुमच्या स्विधीन केला. मात्र, तेथे देखील त्यांच्यावर काही व्यक्तींनी कानफुकी केली...असो..!

पण, तालुक्याला माहित झाले पाहिजे. की, दि. 16 एप्रिल 2022 रोजी कारखान्याच्या ठरावासाठी अगस्ति दुधसंघाला त्यांच्या ठरावासाठी पत्र मिळाले. त्यासाठी चेअरमन वैभव पिचड यांनी 18 एप्रिल 2022 रोजी संचालक मंडळाची तातडीने बैठक बोलविली. त्यावेळी, चेअरमन वैभव पिचड, व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर, विठ्ठल डुंबरे, रामदास आंबरे, प्रविण धुमाळ आणि नंदा कचरे असे सात संचालक हजर राहिले. त्यामुळे, सभेचा कोरम पुर्ण झाला नाही. परिणामी बहुमत न झाल्याने ठराव मंजुरीसाठी मोठा पेच निर्माण झाला. का? तर गायकर पाटलांच्या गटाचे सर्व संचालक तेव्हा गैरहजर राहिले. त्यांनी दाखवून दिले की, वस्त्रहरण करण्याची किंमत काय असते? मात्र, तरी देखील पिचडांनी त्यांचा ठराव तयार करुन नगरच्या सारख सहसंचालकांकडे सादर केला. मात्र, लढाई सुरू झाली त्यात कोणाला क्षम्य नाही. त्यामुळे, गायकर गटाच्या एक सोडून बाकी निष्ठावंतांनी कोठे माती खाल्ली नाही. त्यांनी वैभव पिचड यांच्या ठरावावर नगरला जाऊन अक्षेप नोंदविला. हा ठराव बेकायदेशीर कसा आहे हे त्यांनी सिद्ध करुन दाखविले. आम्ही त्या ठरावाशी संमत नाहीत हे ठणकावून सांगत त्यास नामंजुरीची दिशा दिली.

आता खरंतर हा ठराव मंजुर झाला कसा? याबाबत फार मोठा प्रश्न पडतो. कारण, बहुमत नसताना ते कोणी अधिकारी असतील त्यांनी कोरम आभावी सभा कायदेशीर स्थगित करणे अपेक्षित होते. नव्याने मिटींगसाठी अजेंडा काढून मिटींग घेणे आवश्यक होते. कारण, या प्रक्रियेसाठी तोवर 10 दिवसांचा कालावधी बाकी होता. मात्र, खुद्द जनरल मॅनेजर यांनीच दि. 27 एप्रिल 2022 रोजी दुपारी नगर गाठले आणि नगरच्या सारख सहसंचालकांकडे पिचड यांचा ठराव सादर केला. अर्थात ते देखील दबावाखाली काम करतात की काय? असा प्रश्न पडतो. जेव्हा हे बेकायदेशीर काम गायकर पाटलांच्या समर्थक संचालकांना समजले तेव्हा त्यांनी नगर गठले आणि दि. 28 एप्रिल 2022 रोजी संबंधित ठरावावर अक्षेप घेतला. सभेचा कोरम पुर्ण नाही, ही सभा बेकायदेशीर आहे. त्यामुळे, ठराव पारीत करु नये असे लेखी दिल्यामुळे, संबंधित ठराव नामंजुर झाल्याची खात्रीशिर माहिती रोखठोक सार्वभौमच्या हाती आली आहे. त्यामुळे, विठ्ठल चासकर, भाऊपाटील नवले, शरद चौधरी, सुभाष बेनके, सोपान मांडे, रेखा नवले, स्व.भाऊसाहेब हांडे यांचे नातू रवी हांडे यांचे खरोखर कौतुक केले पाहिजे. की, त्यांनी त्यांची निष्ठा सिद्ध केली आहे. दुर्दैवाने अशा काही गोष्टी कोणी कोणाला सांगत नाही. किंवा उठसुट घे पत्रकार परिषदा आणि कर आरोप प्रत्यारोप असा स्वभाव गायकरांचा नाही. त्यामुळे, असे प्रकार जनतेसमोर येत नाहीत. मात्र, त्यांना बदनाम करण्याची सुपारी काही चेल्याचपाट्यांनी घेतली आहे. त्यांच्या डोळ्यात जळजळीत आंजन घालण्यासाठी हे वृत्त नक्कीच पुरेसे ठरणार आहे.