थांब गं, मला तुला प्रपोज करायचा आहे.! 10 वी च्या मुलीवर तोंड दाबून अत्याचार.! राईट हॅन्ड पकडल्याने धु-धु धुतला.!
सार्वभौम(संगमनेर) - :
आईला डबा घेऊन गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तरुणाने तोंड दाबुन उसाच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. ही धक्कादायक घटना महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन रविवार दि.1 मे 2022 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील राजापूर शिवारात घडली. याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार रामा उर्फ हर्षद बाळासाहेब भोकनळ (रा. मंगळापुर, ता. संगमनेर) याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने करत आहे. तर, संगमनेर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत फक्त गुन्हे दाखल होत असून त्याची उकल काही होताना दिसत नाही. त्यामुळे, पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर दिवसेंदिवस रोष वाढत चालला असून कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. याचे उत्तम उदा. म्हणजे संगमनेरातील रथाची मिरवणुक होय.!
उपरोक्त गुन्ह्याची सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलीचे आई-वडील शेतात मजुरीने काम करून आपला गुजरान करतात. त्यामुळे, पिडीत मुलगी आई-वडीलांना नेहमी कामात मदत करू लागते. सद्या पिडीत मुलीचे दहावीचे बोर्डाचे पेपर झाले असल्याने आईला शेतात मदत म्हणुन नेहमीप्रमाणे जनावरांसाठी गवत आणण्यासाठी ती गेली होती. शेतात जात असताना दि. 30 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजता आरोपी रामा उर्फ हर्षद भोकनळ याने पिडीत मुलीला रस्त्यात अडवुन थांबविले आणि म्हणाला की, मला तुला प्रपोज करायचा आहे. मी तुला शाळेत पेपर चालु असताना पाहिले होते. तु मला फार आवडते. त्यावर पिडीत मुलगी म्हणाली की, मी तुला ओळखत नाही. मी तुला कधी पाहिले नाही. असे बोलुन पिडीत मुलीने त्याला नकार दिला. पण, तिच्यावर आरोपी भोकनळ याची नेहमी नजर राहत होती. मात्र, एक व्यक्ती म्हणुन त्याची तिच्यावर वाईट नजर होती. दरम्यान, रविवारी दि. 1 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलगी आईसाठी जेवणाचा डब्बा घेऊन शेतावर गेली होती. आईकडे जेवणाचा डबा देऊन पिडीत मुलगी आई काम करत असलेल्या उसाच्या शेतातील गवत काढायचे काम करत होती. पिडीत मुलगी गवत काढत असताना एकटीला पाहुन आरोपी रामा उर्फ हर्षद भोकनळ याची नियत फिरली. त्याने हळुवारपणे पाठीमागे जाऊन हाताने तिचे तोंड दाबुन पीडित मुलीला शेतात नेऊन या नराधमाने तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने अतिप्रसंग केला.
दरम्यान, पिडीत मुलीचा भाऊ शेतावर आला असता त्याने आईला विचारले की, बहीण कुठं आहे. तेव्हा गवत काढत असलेल्या ठिकाणी मुलगी दिसत नसल्याने आई व भाऊ सैरभैर होऊन पाहु लागला. पिडीत मुलीचा शोध घेत असताना आई व भाऊ शेतात गेले असता भावाला आरोपी रामा भोकनळ हा नराधम बहिणीवर अतिप्रसंग करत असल्याचे पाहिले. भावाला राग अनावर झाल्याने त्याने आरोपी भोकनळ याला ओढत शेताबाहेर काढुन मारहाण केली. त्यानंतर, पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात फोन केला. आरोपी भोकनळ यास पोलिसांच्या ताब्यात दिले. पिडीत मुलीने घडलेली घटना पोलिसांपुढे कथन केली. दरम्यान, याप्रकरणी पिडीत मुलीने या घटनेबाबत माहिती दिली असता तिच्या सांगण्याहुन रामा उर्फ हर्षद बाळासाहेब भोकनळ याच्यावर बाल लैंगिक अत्याचार,अट्रोसिटी यांच्यासह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने करत आहेत.