आवरुन ठेव.! पळुन जायचं आहे.! आई-बापाला आंधारात ठेऊन मुलगी पळाली, युपीत अत्याचार.! प्रियकराला अटक..!

सार्वभौम (अकोले) :-

 अकोले तालुक्यातील कोतुळच्या विद्यालयातून 10 वीचे पेपर झाल्यानंतर घुलेवाडी येथे मामाकडे सुट्टीला गेलेल्या अल्पवयीन मुलीला शेजारी राहणार्‍या एका तरुणाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसविले. माझे तुझ्यावर प्रेम जडले आहे, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे अशा प्रकारची प्रलोभने दिली आणि त्यानंतर दोघांचे फोनवर संभाषण सुरू झाले. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी थेट दिल्ली गाठली. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील त्याने तिच्यावर दिल्ली जाऊन अत्याचार केला. ही घटना दि. 24 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, घडलेला प्रकार ना मुलाच्या घरच्यांना माहित होता ना मुलीच्या पालकांना. त्यामुळे दोघांनी आपापल्या मुलांच्या मिसिंग दाखल केल्या आणि त्यानंतर हा गुत्ता लक्षात आला. आता  दोघांना संगमनेर व अकोले पोलिसांनी दिल्लीहून आणले असून मुलीस पालकांच्या ताब्यात दिले आहे. तर, याप्रकरणी इस्माईल अजगर अली अंन्सारी (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील कोतुळ येथे राहणार्‍या एका मुलीने इयत्ता 10 वीचे पेपर दिले होते. घरी काय करायचे म्हणून ती संगमनेर शहरालगत असणार्‍या घुलेवाडी येथे मामाकडे गेली होती. तेथे तिची ओळख जवळच राहणार्‍या इस्माईल अंन्सारी याच्याशी झाली. दोघे ऐकमेकांशी गुपचूप बोलत होते. तर, कधी एकमेकांना भेटत होते. हा प्रकार कोणाच्या लक्षात यायला नको म्हणून त्यांनी फोनवर संभाषण सुरू केलेे. व्हाटसअ‍ॅपवर हाय-बाय, हाय हॅलो सुरू झाले आणि नंतर दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर मामाकडून या मुलीस पुन्हा कोतुळ येथे सोडविले होतेे. तरी देखील यांच्यात फोनहून संपर्क होत होता. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, माझे तुझ्यावर फार प्रेम आहे वैगरे कौतुक सुरू असल्याने त्यांच्यातील प्रेम भावना कायम होत्या.

दरम्यान, दि. 20 मार्च 2022 रोजी पीडित मुलगी कोतुळ येथे असताना आरोपी इस्माईल अंन्सारी याचा तिला फोन आला. की, मी पुढच्या महिन्यात कोतुळला येणार आहे. तेव्हा तु आवरून ठेव आपण दोघे पळून जाऊन लग्न करु. त्यानंतर दि. 18 एप्रिल 2022 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीचे आई वडिल दवाखान्यात गेले असता आरोपी इस्माईल अन्सारी व अनिकेत सोनवणे ही दोघे घरी आले आणि तिला लग्नाची साद घातली. तेव्हा पीडित मुलगी म्हणाली की, माझे वय अद्याप 18 पुर्ण झाले नाही. त्यामुळे आपल्याला लग्न करता येणार नाही. तेव्हा इस्माईल म्हणाला की, जेव्हा तुझे वय लग्नाचे होईल तेव्हा आपण लग्न करु. मात्र, आता येथून चल. तेव्हा या तिघांनी कोतुळ, धामनगाव पाट, अकोले, सिन्नर आणि थेट शिर्डी रेल्वे स्थानक असा प्रवास केला. त्यावेळी रात्रीचे 12:30 वाजले होते. इस्माईल याने हजरत निजामुद्दीनचे (दिल्ली) तिकीट काढले होते. हे दोघे प्रेमी दिल्लीला रवाणा झाले आणि सोनवणे हा गाडी घेऊन पुन्हा माघारी आला.

दरम्यान, दि. 19 एप्रिल 2022 रोजी ही दोघे आरोपीचे काका यांच्या घरी उत्तरप्रदेशात गेले. तेव्हा इस्माईल याने त्यांना सांगितले की, माझे हिच्यावर प्रेम आहे. आम्ही दोघे लग्न करणार आहोत. तेव्हापासून ही दोघे तेथेच राहिले. दि. 21 एप्रिल रोजी दुपारी पीडित तरुणी तिच्या बेडमध्ये झोपली होती. तेव्हा आरोपी हा तेथे गेला आणि त्याने तिच्याशी लगट करून नको ते चाळे सुरू केले. तेव्हा पीडित तरुणी म्हणाली की, आपले लग्न झाले नाही. त्यामुळे, असे काही करू नको. तेव्हा तो म्हणाला की, आपण लवकरच लग्न करणार आहोत. तेव्हा पीडितेची इच्छा नसताना देखील इस्माईल अंन्सारी याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या दरम्यान, या दोघांचे हे चाळे त्यांच्या कुटूंबाला बिल्कुल माहित नव्हते. त्यामुळे, मुलाच्या पालकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात त्याची मिसिंग दाखल केली तर अकोल्यात मुलीच्या पालकांनी मिसिंग दाखल केली. त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले की, हा काय प्रकार आहे. त्यानंतर मुलाच्या पालकांनी त्याचा शोध घेतला असता तेव्हा समजले की, ही दोघे काकांकडे आहे. तेव्हा इस्माईलच्या भावाने त्यांना संगमनेरला आणले. त्यानंतर मुलीच्या जबाबानंतर आरोपी इस्माईल अंन्सारी याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.