पोलिस अधिकाऱ्यांच्या अपमानाने घडविला इतिहास.! साहेबांचा अपमान, कर्मचाऱ्यांचा सन्मान.!

 


सार्वभौम(संगमनेर):- 

                      संगमनेर तालुक्यात जनावरांच्या कत्तली खुल्लेआम झाल्या. त्याचे हृदयद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि हिंदुत्ववादी संघटनांसह संगमनेरकरांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले. त्यामुळे, आशा निष्पाप गोवंशाच्यारक्ताने माखलेल्या हाताने कोणतीही धार्मिक पुजा नको. ज्यांना धर्माच्या अस्मितेपेक्षा मलिदा मोठा वाटतो आशा पोलीस निरीक्षकांना गावाचे दैवत  बजरंग बलीच्या रथाला मानाचा झेंडा लावण्यास व विधिवत पुजा करण्यास विरोध केला. त्यामुळे, 93 वर्षांनंतर आज प्रथमच महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांच्या हस्ते हा मानाचा झेंडा रथावर चढवला गेला. त्यामुळे, पोलीस निरीक्षक यांच्या कार्यकीर्दीवर पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या संगमनेरचे गोडवे अनेकजण गातात त्या सुसंस्कृत संगमनेर मध्ये आता पोलिसां देखत जातीय दंगली, पोलिसांवर हल्ले, अवैध गोमांस, गांजा, दिवसा ढवळ्या वाळु तस्करी, मटका,चोऱ्या, घरफोड्या,छेडछाड हे सर्व प्रकार पहिला मिळत आहे. त्यामुळे, सुसंस्कृत म्हणला जाणार संगमनेर बिहारकडे वाटचाल करतो का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुन्ह्यांचा आलेख हिमालया सारखा वाढत आहे. त्यामुळे, अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात येथील लोप्रतिनिधी स्वारस्य मानतात पण,परिस्थिती टोकाला जाण्यापूर्वीच  या गोष्टींकडे लक्षवेधले पाहिजे असे मत संगमनेरातील सुज्ञ लोकांनी व्यक्त केले आहे.

          भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम असलेल्या संगमनेर शहरातील हनुमान जयंती उत्सव सोहळा दोन वर्षानंतर आज पुन्हा तेवढ्याच उत्स्फूर्तपणे आणि 93 वर्षांच्या परंपरेने साजरा झाला. परंतु यासर्व परंपरेत पहिल्यांदाच शहर पोलीस निरीक्षकांना रथाची पुजा करण्यापासुन वंचित राहावे लागले. पोलिसांचा मानाचा झेंडा वाजत गाजत घेऊन येण्याचा सन्मानही वरिष्ठांच्या निर्णयामुळे महिला पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले याना मिळाला. या वर्षीच्या हनुमान जयंती उत्सवाला वादाची पार्श्वभूमी मिळू लागली होती.  त्यातच उत्सव समितीच्या विनंतीला मान देऊन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे,  अकोल्याच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. त्यामुळे हनुमान जयंतीला राजकीय वळण मिळण्याची शक्यता वर्तवली गेली. काँग्रेसच्या महिला अध्यक्षा प्रमिला अभंग यांनी पत्रक प्रसिद्ध करून हा उत्सव एका पक्षाचा नवे तर गावाचा आहे असे स्पष्ट करून सर्व महिलांना सहभागी होण्याचे आव्हान केल्याने यंदाची हनुमान जयंती खुपच चर्चेत आली होती. काही महिन्यांपूर्वी संगमनेरात हिंदुत्ववादी संघटनांनी शहरामध्ये होत असलेल्या गोहत्येचा प्रश्न उपस्थित करून पोलीस निरीक्षकास चांगलेच लक्ष करून धारेवर धरले होते. हे सर्व प्रकरण आता न्यायप्रविष्ट असले तरी याची धग अधुन मधुन शहरामध्ये उमटत असते. हिंदुत्ववादी संघटना आणि पोलीस निरीक्षक यांच्यातील वादाचा तो एक कळीचा मुद्दा ठरत आहे. गोहत्या करणाऱ्या व्यवसायकांशी पोलीस अधिकाऱ्यांचे थेट अर्थपूर्ण संबंध असल्याचे थेट आरोप स्थानिक पोलीस निरीक्षकांवर आरोप झाले याच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत गेल्या मात्र, पोलीस निरीक्षकांवर कुठलीही कारवाई न झाल्याने हिंदुत्ववादी संघटना नाराज असल्याचे पाहायला मिळते.

         हनुमान जयंती सोहळ्यात गेली 92 वर्षे वाजत-गाजत पोलीस प्रशासनाचा झेंडा हनुमान विजय रथावर विधिवत पूजा करून चढविण्याची प्रथा आहे. हा मान त्या-त्यावेळी पदावर असलेल्या पोलीस निरीक्षकांना दिला जातो. यंदा मात्र, उत्सवाच्या काही दिवस आधीच भाजपचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी जिल्हा पोलीस अधिशकांना पत्र देऊन गोवंश हत्या प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पोलीस निरीक्षकांना यंदाचा मनाचा झेंडा आणि रथाची पुजा करण्यासाठी पाठवु नये. त्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांना पाठवावे अशी विनंती केल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आज नेमके काय घडणार याकडे शहर वासीयांचे लक्ष होते. मिळालेल्या सूत्रांच्या माहिती नुसार असंख्य हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह गृहमंत्र्यांकडे याबाबतच्या तक्रारी करून वेळीच मार्ग काढुन पोलीस निरीक्षकांच्या विरोधातला संघर्ष टाळावा अशी विनंती केली होती.

          या सर्व पार्श्वभूमीवर रात्री पोलीस प्रशासनामध्ये घडलेल्या सर्व घडामोडी या बंद खोलीतील असल्या तरी रात्री उशिरापर्यंत याबाबत गृहमंत्री पोलीस अधीक्षक यांच्यात झालेल्या चर्चे अंती पोलीस निरीक्षकांना रथाची पूजा करण्यासाठी न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. हनुमान जयंतीच्या परंपरेत प्रथमच एखाद्या पोलीस निरीक्षकाला पुजेपासुन वंचित राहावे लागले तर दुसरीकडे 93 वर्षांच्या परंपरेत प्रथमच एका महिला पोलीस उपनिरीक्षकास रथाच्या पुजेचा मान मिळाल्याने संगमनेर करांची मान उंचावली पण,  पोलीस निरीक्षकांची मान खाली गेल्याचे पाहायला मिळाले.