कॉलेजच्या आंदोलनाला गालबोट.! गिरजाजी जाधवांना धक्काबुक्कीचा प्रयत्न.! आंदोलनाचे अपयश.! हतबल होऊन आंदोलन सुरूच..!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर जे काही नवनियुक्त संचालक मंडळ नेमण्यात आले आहे. त्यावर अक्षेप घेऊन तालुक्यातील पुरोगामी विचारांच्या नेत्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सगळ्यांनी आपली मते व्यक्त केल्यानंतर मा. मंत्री मधुकर पिचड यांनी एक शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठविले होते. मात्र, त्यांच्याशी या आंदोलकांनी चर्चा न करता त्यांच्यासामोर त्यांची बेइज्जती सुरू केली. आम्ही तुमच्यासारख्या दगडांशी चर्चा करु, आम्ही तुमच्यापेक्षा अज्ञानी आहोत, काही संचालक अशिक्षित आहेत, त्यांचे योगदान काय आहे? यांसारखे अनेक टोमणे त्यांच्या तोंडावर मारणे सुरू केले. तर काही ठिकाणी नाव न घेता त्यांचा यथेच्छ समाचार सुरू केला. अर्थात ही कृती कोण्या येड्या गबाळ्यांनी नव्हे.! ज्यांना तालुक्यात माना सन्मानाचे स्थान आहे, ज्यांची पत प्रतिष्ठा आहे. अशी मानसे उपरोधाने बोलली आणि त्यावर अनेकांनी हेतुपुर्वक हस्यांदोलन केले. त्यामुळे, सहाजिकच नवनियुक्त विश्वस्तगिरजीजी जाधव यांना ती अवहेलना सहन झाली नाही. त्यामुळे, त्यांनी दोन शब्द व्यक्त करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. ते म्हणाले, पिचड साहेब देखील तुमच्याशी चर्चेला यायला तयार आहेत. मात्र, त्यांची प्रकृती खराब आहे. तर, माझ्यासारख्या व्यक्तीने 40 वर्षे तालुक्यात राजकारण आणि समाजकारण केले आहे. त्यामुळे, पत्रकार परिषदेत तुम्ही अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप करतात हे योग्य नाही. अर्थात त्यांचा झालेला अपमान आणि त्यांची बोलण्याची शैली यात प्लस मायनस झाले असेल. मात्र, त्यानंतर लगेच त्यांच्यावर अगदी हल्ला केल्यासारखी जनता धावून आली. त्यांच्याभोवती आंदोलकांनी एकच गराडा करुन गोंधळ घातला तर त्यांना एकाने कवळी मारुन बाहेर लोटीत नेले. त्यावेळी ते म्हणत होते. माझा जर काही अपशब्द गेला असेल तर मी माफी मागतो. मात्र, तेथे काही ठराविक लोकांमध्ये प्रचंड मुजोरी दिसून आली. त्यानंतर मात्र, कोणीतरी एकाने आमचे निवेदन घेण्यासाठी यावे आणि आंदोलन स्थगित करावे अशा कसोशीने हलचाली झाल्या. मात्र, याचना करुनही कोणी निवेदन घेण्यासाठी आले नाही. त्यानंतर पर्यांय काय? म्हणून नाईलाजास्तव आदोलन सुरूच ठेवण्याची नामुश्की आंदोलकांवर ओढावली आहे.
हे अपयश कोणाचे?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कॉलेज बचाव समितीने पत्रकार परिषदेत असे सांगितले होते की, तालुक्यातून प्रत्येक गावातून राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, रिपाई, कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी असे प्रत्येकजण आपापली ताकद वापरून हजार पाचशे लोकांची मोचार्र् बस स्थानक ते कॉलेज असा काढू. मात्र, झाले काय? राष्ट्रवादीचे मुठभर पदाधिकारी, रिपाईचे चारदोन डोके आणि ज्यांना काँलेजवर पुर्वी घेतले मात्र आता ते वंचित राहिले असे काही पुढारी या पलिकडे ना छात्रभारतीची ताकद दिसली ना मार्क्सवादी ऐरव्ही लांबच लांब रांगा काढून मोर्चे काढते त्यांची फौज पहायला मिळाली. त्यामुळे, मोजून 10 महिला आणि 78 मानसे असा भव्य मोर्चा कॉलेजच्या गेटवर धडकला. फार मोठे नियोजन आहे असे पोलिसांना कळविल्यामुळे त्यांनी आरसीबी प्लाटून आणि राजूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्यासह होमगार्ड असा आदोलकांपेक्षा जास्त फौजफाटा तालुक्यात आणला होता. मात्र, गावभर निमंत्रण देऊन पत्रकं वाटून रिक्षा लावून आणि फोन करुन अवघी शंभर मानसे देखील आंदोलनांत पहायला मिळाली नाही. त्यामुळे, महिनाभर नियोजन करुन देखील जनता जमली नाही. याचे खापर कोणाच्या माथी मारायचे? की आता भाड्याने गाड्या करुन रोजाने मानसे आणून पुन्हा आंदोलनाच्या भुमिकेत मैदान भरवायचे? याबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
खरंतर, माईक समोर आला म्हणजे आमच्यातील बोलका दैत्या जागा होतो. महिनाभर नियोजनात कोणी दिसले नाही. मात्र, घाम फुटेपर्यंत आणि घसा बसेपर्यंत अनेकजणांनी आपल्या निष्फळ भावना व्यक्त केल्या. इतकेच काय.! भाषणबाजी करणारे काही वक्ते निघुन देखील गेले. मागे आंदोलनाचे काय? हे डोकून देखील पाहिले नाही. त्यामुळे, आंदोलनात गर्दी होती त्यात दर्दी फार कमी दिसून आले. खरंतर जेव्हा चर्चा करायची होती तेव्हा काही ठराविक व्यक्तींनी वर जाऊन शांत व कायदेशीर मार्गाने आपले म्हणणे मांडायचे असे डॉ. अजित नवले यांनी ठरविले होते. तो मार्ग अगदी योग्य होता. मात्र, जसे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष आणि सेक्रेटरी हे आदोलकांकडे आले. तेव्हा काही व्यक्तींना असे झाले की, आता मी काय-काय बोलु, रात्रभर मीच बोलु की काय? त्यामुळे, माईक हाती पडला आणि एक नव्हे तीन चार भाषणे होऊन गेली तरी कोणी निवेदन देण्याचा विषय काढत नव्हते. खरंतर, ज्यांच्या विरोधात बोलायचे आहे, ज्यांच्या विरोधात तक्रार आहे, ज्यांच्यावर अक्षेप आहे. मुळात त्यांनाच निवेदन देण्यासाठी आंदोलकांनी निवडले. हेच मुळात शहान्या सुरत्यांना का कळले नाही याबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. अर्थात हा प्रकार काय आजच नाही झाला. गेल्या आठवड्यात देखील निवेदन देण्यासाठी ज्यांच्यावर आक्षेेप आहे. तेच येथे पाहिजे असा अट्टाहास देखील झाला. त्यामुळे, हा आंदोलनाचा कोणता पायंडा आहे. हे नव्याने समजून घ्यावे लागेल. म्हणजे, कृषी अधिकार्याची बदली पाहिजे हे निवेदन कृषी अधिकार्यालाच कसे देऊन चालेल..?
उर्मी असावी-गुर्मी नसावी.!
खरंतर, पत्रकार देखील तेथे उपस्थित होते. त्यांनी पाहिले. गिरजाजी जाधव यांची फारशी चुक नव्हती. कारण, गेल्या आठवड्यात एक आंदोलक म्हटला होता. काय शिकलेय गिरजाजी बुवा? त्यामुळे, अर्थात गिरजाजी जाधव यांना त्याचे वाईट वाटले. त्या पलिकडे त्यांच्यावर जी काही उपरोधी टिका झाली, त्यावर काही मंडळी मुद्दाम हसल्याने त्यांना ते देखील वाईट वाटले. खरंतर जाधव हे मुळत: 1969 साली इयत्ता 10 वी पास असून ते इंदोरी शाळेमधील टॉपर विद्यार्थी आहेत. म्हणजे तेव्हाच्या शिक्षण आणि आजची डिग्री सारखी आहे. त्याकाळी 32 एकर शेती असल्यामुळे, त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. पुढे 25 वर्षे ते आंबड गावचे सरपंच आणि नंतर अकोले दुधसंघाचे चेअरमन, अगस्ति कारखान्याचे संचालक अशा अनेक ठिकाणी त्यांनी चांगले काम केले आहे. अनेकांना माहित नाही. पण, 1977 ते 1982 या दरम्यानच्या काळात शाळेसाठी त्यांनी स्वत: भरीव निधी दिला आहे. तर, कॉलजसाठी धान्य गोळा जमा करण्याचे काम देखील त्यांनी केले आहे. 25 वर्षापासून ते कॉलेजचे सभासद आहेत, यापलिकडे तालुक्यात विडी कामगार आणि तालुक्याच्या आस्मितेच्या प्रश्नांमधील आंदोलनात त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे, गिरजाजी जाधव हा काही आंगठे बहाद्दर माणुस नसून त्यांची नसेल सिंहाचा वाटा मात्र त्याकाळी त्यांनी खारीचा वाटा का होईना कॉलेजसाठी उचलला आहे. अर्थात एक ज्येष्ठ म्हणून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. अधिकाराने नव्हे.! पण, मी देखील माणूस असून माझे काही योगदान नाहीच का? अशा भावना त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणात पराचा कावळा झाला आणि काल त्यांनी ज्यांना मार्गदर्शन म्हणून काम केले. त्यांच्या व्यासपिठावर त्यांचा असा अपमान झाला. याला खरंच आंदोलन म्हणता येईल का? आंदोलकांमध्ये उर्मी असावी मात्र गुर्मी नसावी याचे उत्तम उदा. आज पहायला मिळाले.
राजकीय सैदाबाजी..!
खरंतर, डॉ. किरण लहामटे साहेब यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन अनेकजण एकत्र आले आहेत. काल जे नगरपंचायत आणि पत्रकार परिषदांमधून डॉ.लहामटेंना शब्द अपशब्दाने हिनवत होते. ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आले आहेत. जे काही करतील ते डॉक्टर करतील म्हणून त्यांना निमंत्रक करुन अनेकांनी आपल्या जबाबदार्या झटकल्या. परिणामी मंडपात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक दिसले. औषधाला सीपीएम, सीपीआय, रिपाई, काँग्रेस आणि शिवसेना दिसली. खरंतर ऐरव्ही डॉ. लहामटेंच्या नावाने खडे फोडणारे फक्त भाषणे करण्यासाठी तैवारुन दिसत होती. नंतर ती कोठे गायब झाली देव जाणे. खरंतर आमदार साहेब हे कॉलेजवर सभासद नाहीत त्यामुळे त्यांना तेथे कोणते पद मिळेल आणि त्यासाठी ते आटापिटा करतील असा दुरान्वये संबंध नाही. मात्र, ज्यांना तेथे पदे मिळाली नाही, संधी दिली नाही. ते लोक बाह्या सावारुन होते. काही लोक आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी तर कोणी काही लोकांना निव्वळ बदनाम करण्यासाठी जमा झाले होते. आता यापुढे आमदार साहेबांनी पहावे की, जेव्हा जेव्हा तुमच्या विरोधात बोलण्याची संधी उपलब्ध होईल. तेव्हा, यातील काही चेहरे दंड थोपटून तुमच्या विरोधात बंड पुकारताना दिसतील. ते दिवस फार दुर नाहीत. यात काही लोक असे आहेत जे खरोखर प्रमाणिक आहेत, त्यांना कॉलेज राजकीय आड्डा नको, भ्रष्टाचार बाहेर काढायचा आहे. त्यांना सौ बार सॉल्युट केला पाहिजे. हे देखील तितकेच खरे आहे.!
क्रमश: भाग 3 उद्या