विद्यार्थीनीच्या तोंडात ओढणी कोंबुन दारूड्याने अत्याचार केला. मग काय.! त्याला बांधून अर्धा किलोमिटर फरपटत धिंड काढली.!

सार्वभौम (संगमनेर) :-

          घरात झोपलेल्या अवघ्या 13 वर्षीय मुलीच्या तोंडात ओढणी कोंबून एका 40 वर्षीय दारुड्याने तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना दि. 23 एप्रिल 2022 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात घडली. जेव्हा पीडित मुलीने विरोध केला असता त्यास जोराने लोटून दिले आणि बाहेर ओट्यावर बसलेल्या आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मात्र, शेजारी परिसरात राहणारे लोक एकत्र आले आणि या व्यक्तीची चांगलीच धुलाई केली. तर, त्याला नंतर बांधुन टाकत बेदम मारहाण केली. हा रोष येथेच थांबला नाही. तर, जमावाने यास तब्बल अर्धा किलोमिटर बांधून फरपटत याची धिंड काढली. यात आरोपी नवनाथ आनंदा चव्हाण (रा. कौठे, ता. संगमनेर) हा फारच जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रूग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार नवनाथ चव्हाण याच्यावर गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, कायदा हातात घेऊन सात लोकांनी नवनाथ यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार दि. 23 एप्रिल रोजी रात्री पीडितेचे कुटुंब जेवण करुन झोपी गेले होते. मात्र, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पीडितेची आई रात्री गर्मीमुळे बाहेर ओट्यावर झोपण्यासाठी गेली होती. या दरम्यान मुलीने अभ्यास करून ती घरात एकटीच गाढ झोपली होती. त्यावेळी पहाटेचे 3 वाजतले असता आरोपी चव्हाण हा दारु पेवून त्यांच्या वस्तीवर गेला. त्याने पाहिले की, एक महिला बाहेर झोपली आहे. तर, दरवाजा लोटून पाहिले असता घरात बालिका देखील झोपलेली दिसली. त्यामुळे, तो कोणत्या उद्देशाने गेला होता त्यालाच माहित. परंंतु, मुलीला पाहिल्यानंतर त्याची नियत फिरली. त्याने स्वत:चे कपडे काढून बाजुला फेकले. तर, जवळच पडलेली एक ओढणी घेऊन ती त्याने पीडित मुलीच्या तोंडात बळजबरी कोंबली. ओढणीचा बोळा तोंडात गेल्यामुळे मुलीस बोलता-ओरडता आले नाही. त्यामुळे, या नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केला.

दरम्यान, काही वेळेनंतर मुलीने त्यास जोराने लोटून दिले आणि तीने आईला जोराने आवाज दिला. मुलीचा आवाज ऐकल्यानंतर आई धावत पळत घरात आली असता तिने पाहिलेला प्रकार धक्कादायक होता. आपल्या मुलीचा आणि तिचा जीव वाचविण्यासाठी तिने दारुड्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याने प्रतिकार करून हिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता महिलेने जवळच पडलेला एक दांडा घेऊन त्याच्या डोक्यात मारला. तोवर पीडीत मुलीने शेजारी राहणार्‍या काही व्यक्तींना बोलावून आणले. बोलबोल करता तेथे अनेक लोक उपस्थित झाले. त्यांनी या व्यक्तीस नाव, गाव विचारले असता त्याने सांगितले की, माझे नाव नवनाथ चव्हाण आहे. त्यानंतर याची घटनास्थळी यथेच्छ धुलाई करण्यात आली. तर, जमावाने आरोपी चव्हाण याचे हातपाय बांधून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर, आहे त्या परिस्थितीत त्यास रस्त्याने ओढत-ओढत नेवून त्याची धिंड काढली. त्यास इतके मारले होते की, तो पुर्ण बधीर झाला होता. तेव्हा सकाळी झाली तेव्हा काही लोकांनी त्यास पाहिले आणि पोलीस ठाण्यात फोन केला. त्यानंतर त्यास उचलुन दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तरी देखील त्याची दारु उतरलेली नव्हती.

दरम्यान, याप्रकरणी पीडित मुलीने या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली असता तिच्या सांगण्याहून नवनाथ चव्हाण याच्यावर बाल लैंगिक अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटी यांच्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, नवनाथ चव्हाण यास गंभीर मारहाण झाली असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्यामुळे त्याने दिलेल्या जबाबानुसार सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात त्याने म्हटले आहे की, मला बाळु दुधाडे हा भेटला होता. तो म्हणाला की मला घरी नेवून सोड. तेव्हा त्यास घरी सोडण्यासाठी गेलो असता त्याच्या पत्नीने माझ्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. ती म्हणाली की, तु पुन्हा दुधाडे यास कामाला न्यायचे नाही असे मी तुला सांगितले होते. तरी देखील तु यास कामाला का नेले? त्यानंतर तेथे काही उपस्थिल लोकांमध्ये शिविगाळ दमदाटी झाली आणि त्यानंतर चव्हाण यास मारहाण करुन त्याला बांधून मारले त्यामुळे, त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, परस्पर विरोधी गुन्ह्यात काही संदिग्धता आढळून आली असता पोलिसांच्या दुजोर्‍यानंतर घटनाक्रम लक्षात आला..!!