प्रेमविवाह केला, पण अयशस्वी झाला.! मशेरी लावते म्हणून प्रेमभंग, तो भलताच संशय घेत होता, मग तिने केली आत्महत्या.!
प्रेवविवाह केल्यानंतर काही दिवस संसार केलेल्या तरुणीला सासरच्यांनी प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली. तु तांबाखुने दात घासते, मशेरीच लावते, तुझा बाहेर काहीतरी खटका आहे. तू माहेरी सारखी फोन करुन बराच वेळ बोलत बसते असे अनेक आरोप करुन तिला छळले जात होते. त्यामुळे, यांच्या वारंवार होणार्या त्रासाला कंटाळून रुपाली गितेश कोठवळ (वय 22, रा. पेमगिरी, ता. संगमनेर) हिने घराच्या पाठीमागे असणार्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना दि. 31 मार्च 2022 च्या पुर्वी घडली आहे. याप्रकरणी नवरा गितेश बाळासाहेब कोठवळ, बाळासाहेब रामभाऊ कोठवळ(रा. पेमगिरी, ता. संगमनेर), अनिल गोडसे (रा. गोडसेवाडी, त. संगमनेर) यांच्यासह पाच जणांवर संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जुले पठार येथे रहणार्या रुपालीची ओळख गितेश याच्याशी झाली होती. त्यांच्या ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले आणि त्यांनी एकमेकांशी विवाह करण्याचे ठणविले होते. त्यांच्या कुटुंबाचा या दोघांना काही अंशी विरोध होता. मात्र, तरी देखील यांचे एकमेकांशी मने जुळलेली होती. त्यामुळे, काही झाले तरी आपण विवाह करायचा हे त्यांनी ठरविले होते. त्यामुळे, दि. 20 ऑक्टोबर 2021 रोजी दोघांनी रजिस्टर पद्धतीने विवाह केला होता. त्यानंतर घरातील वातावरण जर प्लस-मायनस होते. तरी देखील यांनी पेमगिरीत दोघांचा संसार थाटला. मात्र, सासरी नांदत असताना तिला बर्याच गोष्टींना वारंवार सामोरे जावे लागत होते. आरोपी यांच्याकडून पीडितेला नेहमी टोमने सोसावे लागत होते. त्यामुळे, ती वैतागली होती. मात्र, एक दिवस तरी हे लोक आपल्याला समजून घेतील अशी आशा तिला होती.
दरम्यान, पसंतीने विवाह न झाल्यामुळे, तिची अवहेलना होत होती. आरोपी हे तिच्यावर संशय घेऊन नको ते आरोप करीत होते. त्यांना उत्तरे देताना, स्वत:ला सिद्ध करताना देखील रुपाली वैतागली होती. एक प्रश्न सोडविला की यांचा पुढील प्रश्न उभा राहत होती. त्यामुळे, नंतर यांनी पुन्हा तिच्या मागे टुमके लावले की, रुपाली ही तांबाखुने दात घासते, आकोट लावते, वेळी-अवेळी दात घासते, मोबाईल घेऊन कोणला ना कोणला फोन करता, सारखी सासरच्यांना फोन करुन बोलत बसते. अशा वेगवेगळ्या कारणांनी तिला सासरचे लोक वारंवार शिविगाळ, दमदाटी आणि मारहाण करीत होते. अशा पद्धतीने तिचा छळ होत होता. त्यामुळे, या सर्व प्रकाराला रुपाली कंटाळली होती. त्यामुळे, सासरच्या होणार्या छळाला कंटाळून तिने स्वत:चे जीवण संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दि. 31 मार्च 2022 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रुपालीने घरामागच्या विहिरीत जाऊन आत्महत्या केली असे फिर्यादीत म्हटले आहे.
तर, जेव्हा रुपालीने आत्महत्या केली तेव्हा दोन कुटुंबात तणाव निर्माण झाला होता. ही आत्महत्या आहे की, हत्या? याची सखोल चौकशी केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी झाली. या घटनेत पहिल्यांदा अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. मात्र, आता पुढील प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आता संगमनेर ग्रामीण पोलिसांनी या गोष्टीची प्राथमिक चौकशी केली असता तिने आत्महत्याच केल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे, रुपालीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवरा गितेश बाळासाहेब कोठवळ, बाळासाहेब रामभाऊ कोठवळ, अनिल गोडसे (रा. गोडसेवाडी, त. संगमनेर) यांच्यासह पाच जणांवर संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, अजून देखील या आत्महत्येबाबत सखोल चौकशी सुरू आहे. त्यामुळे, यात आणखी काही गोष्टी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
महिलांनी स्वत:ला सावरले पाहिजे.
कितीही कटू प्रसंग आला तरी महिलांनी अशा पद्धतीने आत्महत्या करण्याची भुमिका घेणे चुक आहे. आपण एखादी चुक किंवा बरोबर गोष्ट करण्याची धाडस करतो तर त्याचे विपरीत परिणाम देखील सहन करणे किंवा पचविण्याची धाडस ठेवली पाहिजे. येणार्या प्रत्येक प्रसंगांना धिरोदत्तपणे तोंड दिले पाहिजे. राग आला आणि लागेच काही निर्णय घेतला. असे प्रकार टाळले पाहिजे. आत्महत्या करण्यापेक्षा लढून न्याय मागितला तर काय हरकत आहे? कारण, महिलांना कायदा लढ म्हणतो, बळ देतो, त्यांच्यामागे उभा राहतो. असे असताना पळायचे का? कायदेशीर मार्गाने लढले पाहिजे, महिला शाखा, सामाजिक संघटना, पोलीस, महिला आयोग, वेगवेगळे महिला मंच फार सहकार्य करणार्या बाबी आहेत. त्यामुळे, आता तरी महिलांनी स्वत:ला सावरले पाहिजे.