सुशिक्षित महिला त्याला भाळली, तु नाही आली तर तुझ्या मुलीवर बलात्कार करेल.! अर्धनग्न फोटो व्हायरलची धमकी.!

सार्वभौम (संगमनेर) :-

                      मेडीकल चालविणार्‍या एका महिलेशी फोनवर गुलुगुलु बोलुन त्याने मैत्री केली. त्यानंतर व्हॉटसअ‍ॅपवर चॅटींग करुन हायबाय करत थेट प्रेमाची साद घातली आणि महिलेला वेगवेगळी अमिष दाखवून संगमनेरातील  एका फर्मासी कॉलेजवर बोलविले. तेथे काही चर्चा केल्यानंतर तिला विश्वासात घेऊन गाडीत टाकले आणि नांदुर शिंगोटे परिसरात रस्त्याच्या कडेला गाडी लावून तिच्यावर अत्याचार केले. असाच प्रकार एका लॉजवर देखील करण्यात आला. या दरम्यान या तरूणाने या महिलेचे अर्धनग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. ही घटना दि. 10 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, तेव्हापासून तर आजवर आरोपी हा वेळोवेळी ब्लॅकमेल करीत होता. त्यामुळे, पीडित महिलेने गुरूवार दि. 31 मार्च 2022 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आपली तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी उबेद मन्सुर पटेल (रा. साकुर, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील राजापूर परिसरात राहणारी एक महिला संगमनेर शहराच्या लगत घुलेवाडी परिसरात मेडिकल व्यावसाय करत होती. त्यानंतर तिचा एका तरुणासोबत संपर्क झाला. हा तरुण गोळ्या-औषधे घेण्यासाठी मेडिकलमध्ये आला होता. तेव्हा काही औषधे उपलब्ध नसल्यामुळे, त्याने महिलेचा मोबाईल नंबर घेतला होता. त्यानंतर त्यांच्यात चॅटींग सुरू झाली. हाय-बाय आणि नंतर त्यांच्यातील गप्पांना रंग चढला. गोळ्या औषधे विचारण्यापलिकडे तो फोनवर गोडगोड बोलुन तिला नेहमी प्रभावित करीत होता. त्यानंतर त्यांच्यात काही दिवसांपासून फोनवर दिर्घकाळ चर्चा होत होती. त्यामुळे, काल झालेली मैत्री, अधिक दृढ होत गेली त्याच्या प्रेमाने बोलण्याला ती भाळली गेली. सन 2021 मध्ये आरोपी पटेल याने पटविलेल्या या महिलेला त्याने संगमनेरमधील एका फार्मासी कॉलेजवर बोलविले. या दरम्यान ती नको म्हणत होती. मात्र, याने तिला भेटण्यासाठी मजबूर केले. त्यामुळे, ती गेली आणि त्या दिवशी आरोपी पटेल याने तिला एका मारुती सुझुकी कारमध्ये बसविले.

दरम्यान, यांच्यात गाडीत बसल्यानंतर काही चर्चा झाल्या. तेव्हा देखील पटेल याने तिच्याशी चांगल्या गोडगोड गप्पा मारल्या. हे एका रोडने जात असताना आरोपी उबेद पटेल याने एका निर्जन ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाडी थांबविली. महिलेने विचारणा केली असता हा खाली उतरला आणि याने गाडीच्या काचा वर घेऊन गाडी पुर्ण पॅकबंद केली. तर, महिलेची इच्छा नसताना देखील तिच्यावर अत्याचार केला आणि पुन्हा जेथून घेतले तेथे आणून सोडले. असे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. तर, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात देखील आरोपी याने तिला असेच बोलावून घेतले आणि कोणत्यातरी रस्त्याच्या कडेला निर्जनस्थळी गाडी नेऊन अत्याचार केला. हा प्रकार येथेच थांबला नाही. तर, नंतरच्या काळात देखील पटेल हा तिला नांदुर शिंगोट्यात घेऊन गेला. तेथे त्याने एक लॉज शोधला आणि तेथे देखील पीडित महिलेची इच्छा नसताना तिच्यावर अत्याचार केला. त्या दिवशी फार उशिरा ही दोघे त्याच कारमधून संगमनेरात आले. त्यानंतर यांची काही वेळा भेटी झाल्या. त्यामुळे, आरोपी चांगलाच पडकला होता. त्याने जेव्हा फोन केला तेव्हा पीडित महिलेला जाणे भाग होते इतकी हतबल ती झाली होती. त्यामुळे, आरोपी उबेद पटेल याच्या असल्या वागण्याने तिला फार त्रास होत होता. मात्र, काय करावे हे तिला कळत नव्हते.

दरम्यानच्या काळात याची मुजोरी फार वाढली होती. याचा फोन आला की, महिला प्रचंड अस्वस्थ होत होती. त्यावेळी, एकदा पटेलने तिला फोन केला होता. मात्र, तीने येण्यास नकार दिला. तेव्हा खर्‍या अर्थाने याच्यातील नराधम जागा झाला. पीडित महिलेने नकार दिला तेव्हा पटेल तिला म्हणाला की, तुझे काही अर्धनग्न फोटो काढून ठेवले आहे. ते मी लॅपटॅप आणि पेन्ड्राईव्हमध्ये सेव्ह आहेत. जर तू मला भेटायला आली नाही तर ते फोटो मी सोशल मीडियावर अपलोड करुन तुझी बदनामी करेल. हे ऐकुण देखील महिलेने त्यास असे करु नको, म्हणून विनंती केली. मात्र, याने तिच्यावर वेगवेळ्या पद्धतीने बळजबरी करण्यास सुरूवात केली. तो तिला म्हणाला की, तु जर मला भेटायला आली नाही तर मी तुला जीवंत ठेवणार नाही, तुला शांतपणे जगू देणार नाही. तुझी मी सगळीकडे बदनामी करेल. त्यामुळे, पीडित महिला घाबरुन गेली होती.

दरम्यान, महिलेने त्यास भेटण्यास वारंवार विरोध केला. कारण, हा अत्याचार करुन शिविगाळ दमदाटी आणि मारहाण देखील करीत होती. महिलेच्या असहाय्यपणाचा फायदा घेत होता. दरम्यान, पटेल तिला म्हणाला की, तू जर मला भेटायला आली नाही तर मी तुझ्या मुलीवर बलात्कार करेल. असा दम तो वारंवार देत होता. त्याच्या या भितीपोटी त्याने महिलेकडून 65 हजार रुपये देखील उसनवारीच्या नावावर उकळले होते. मात्र, वारंवार मागणी करुन देखील केवळ 15 ते 20 हजार रुपये परत केले. पटेल हा संबंधित महिलेला फार त्रास देत होता. मात्र, सांगावे तर कोणाला? असा प्रश्न तिला पडला होता. एकदा पटेलचा तिला फोन आला तेव्हा त्याने तिला भेटायला बोलविले होता. मात्र, ही गेली नाही त्यामुळे, पटेल म्हणाला की, आता तु आली नाही तर मी तुझ्या मुलीला आणि तुला गाडीखाली चिरडून टाकेल. असल्या धमक्यांना पीडित महिला वैतागली होती. त्यामुळे, तीने हा सर्व खराखरा प्रकार आपल्या जवळच्यांना कथन केला आणि थेट पोलीस ठाणे गाठून उबेद पठाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.