जे 12 वी पास नाही ते कॉलेज हताळणार का? योगदान शुन्य पिचडांची मक्तेदारी नकोच.! 21 तारखेला ऐल्गार.! चला--अगस्ति कॉलेज वाचवूया...!
शिक्षण हे वाघीनिचे दुध आहे. ते जो कोणी प्राषण करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मात्र, अकोले तालुक्यात या उलट परिस्थिती पहायला मिळत आहे. ज्यांना बारावी पास होता आले नाही ते आजकाल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीवर गुरगुरताना दिसत आहे. तर, जे ठेकेदार आहेत, जे हुजरेगिरी करतात, ज्यांना शिक्षणाचा गंध नसून तेथे निव्वळ राजकीय आड्डा उभा करायचा आहे अशा लोकांची या संस्थेवर निवडण करण्यात आली आहे. त्यामुळे, काल संबंध तालुक्याच्या घामातून उभी राहिलेली शिक्षण संस्था आज पिचडांच्या मालकी हक्काची त्यांनी करुन घेतली आहे. विशेष म्हणजे, पिचडांचे या संस्थेत एक रुपयांचे देखील योगदान नाही. ना या मानसाने तालुक्यात उच्च शिक्षणाचे जाळे उभे केले. केवळ, दादासाहेब रुपवते यांनी ज्या काही शिखर संस्था उभ्या केल्या. त्या गिळंकृत करण्याचे काम यांनी सुरू केले आहे. त्यामुळे, आता पिचडांनी अगस्ति महाविद्यालयाचे नाव बदलुन ते पिचड ऐज्युकेशन सोसायटी करावे. म्हणजे, तालुक्यातील जनता त्यांना टोचा मारणार नाही. अशा प्रकारचा खोचक टोला रिपाईचे राज्यसचिव विजय वाकचौरे यांनी पिचडांना लगावला. त्यांनी अकोले विश्रामगृहावर रोखठोक सार्वभौमला मुलाखत दिली. यावेळी शेतकरी पुत्र सुरेश नवले यांच्यासह अन्य विचारवंत उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, दादासाहेब रुपवते, मा.आ. यशवंतराव भांगरे, भाऊसाहेब हांडे, लालचंद शहा, यांच्यासह तालुक्यातील अन्य नेत्यांनी तालुक्यातील मुलांच्या शिक्षणासाठी राज्याच्या नेत्यांकडे अग्रह धरला होता. सन 1972 साली दुष्काळाची परिस्थितीत राज्यात कोठीही शाळा कॉलेजांना मंजुरी देणे शक्य नव्हते. मात्र, दादासाहेब हे राज्यात मंत्री होते. त्यांची प्रतिमा देखील चांगली होती. त्याच्या दिमतीला यशवंतराव भांगरे देखील होते. ते यशवंतराव चव्हाण यांना म्हणले होते. साहेब.! मला स्वत:साठी मंत्री फित्रीपद असलं काय बी नगं, पण माझ्या तालुक्यातील लेकरांसाठी कालेज द्या. तेव्हापासून तालुक्यात कॉलेज झाले पाहिजे अशी अपेक्षा होती. त्याकाळी 1974 साली कोठे नव्हे, फक्त राज्यात दोन ठिकाणी महाविद्यालयांंना परवानगी देण्यात आली होती. त्यात सातारा आणि दुसरे अकोले तालुक्याचे नाव होते. हा संघर्ष येथेच थांबला नाही. तर, अकोल्यात कॉलेज होऊ नये म्हणून संगमनेरच्या नेत्यांनी त्यास विरोध केला. कारण, त्याकाळी अकोले तालुक्यातील तमाम विद्यार्थी हे संगमनेर कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी जात होते. जर हे विद्यार्थी बंद झाले असते तर संगमनेरची कॉलेज बंद पडली असती. मात्र, तरी देखील अकोल्याला कॉलेज आणण्यात हे नेते मंडळी यशस्वी ठरली. आज त्याच कॉलेजचे काय हाल झाले आहे? हे पाहून फार वाईट वाटते असे वाकचौरे म्हणाले..!
या संस्थेवर कोणाची मक्तेदारी होऊ नये म्हणून घटना तयार करताना काही तत्वे ठरविली गेली होती. मात्र, यांनी पळवाटांचा वापर करुन घटनेच्या चिंधड्या केल्या. संस्थेचे सर्व नियम धाब्यावर बसवून हवी तशी मनमानी सुरु केली आहे. खरंतर या सर्व गलथान कारभाराला पिचड जबाबदार आहेत. ठेकेदारांच्या जोरावर निवडणुका करायच्या, संस्था लुटून आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या, कोणत्याही रिक्त जागा भरताना अविश्वसनिय अर्थपुर्ण तडजोडी करुन गुणवत्तापुर्ण व्यक्तींचा कचरा करायचा. आम्ही सर्वधर्म समावेशक आहोत असा बुरखा पांघरुन येथील दिन-दलित जनतेची दिशाभूल करायची असे धंदे यांचे आहे. त्यामुळे, त्यांनी उभ्या आयुष्यात समाजकारण केले नाही तर केवळ राजकारण हाच त्यांचा पिंड आहे. त्यामुळे, त्यांच्याकडून विद्येच्या मंदीरात देखील चांगल्या कारभाराची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. खरंतर आम्ही आजवर त्यांच्या राजकारणात कधी हस्तक्षेप केला नाही. मात्र, अगस्ति कॉलेजवर तमाम बहुजणांची मुले शिक्षण घेतात. तेथे एखादा ठेकादार बसविणे, दारुड्यांना जागा देणे, घरची मक्तेदार गाजविणे हे असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. त्यासाठी येणार्या 21 तारखेला त्याच शिक्षण संस्थेवर जाऊन त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असे वाकचौरे म्हणाले.
खरंतर, पिचडांना त्यांची मुले शिकविता आली नाही. जे 12 वी पास होऊ शकले नाही. त्यांना महाविद्यालयावर कायम विश्वस्त म्हणून घेतले. ज्यांचा शिक्षणाशी दुरान्वये संबंध नाही त्यांना संस्थेत घेऊन यांना साध्य तरी काय करायचे आहे? खरंतर शेजारी तालुक्यात शिक्षणाचे किती मोठे जाळे पसरले आहे. राज्यातून नव्हे, देशातून मुले संगमनेरात शिक्षण घेण्यासाठी येतात. दुर्दैवाने अकोल्यातून मुले देशात आणि देशाबाहेर शिक्षण घेण्यासाठी जातात. हा कोणाचा श्राप आहे? अर्थातच पिचडांच्या घरात 40 वर्षे सत्ता होती. ना त्यांना वैद्याकीय महाविद्यालये आणता आली ना सुसज्ज उच्चशिक्षण उपलब्ध करून देता आले. उलट ज्या जे.डी.आंबरे पाटलांनी स्वत:च्या पत्नीचे दागिने मोडून संस्था उभ्या केल्या आणि चालविल्या. त्यांना साध सदस्य म्हणून तेथे ठेवता आले नाही. म्हणजे मानसाचा वापर करायचा आणि पत्रावळीसारखं फेकुण द्यायचं. हीच निती त्यांनी 40 वर्षे आजवर अवलंबविली आहे. अर्थात डॉ. लहामटेंसारखा एक सक्षम पर्यांय आता तालुक्याला मिळाला आहे. त्यामुळे, काल कोणी याच पिचडांच्या विरोधात बोलत नव्हते. आज त्यांच्या विरोधात बंड पुकारू लागले आहे. हाच 40 वर्षाचा उद्रेख आहे. त्यांनी आयुष्यात शिक्षण संस्था काढल्या नाहीत. मात्र, आहे त्या शिक्षण संस्थांना राजकीय आड्डे तयार करुन त्या मोडीत काढण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, ते आम्ही आता होऊ देणार नाही. येत्या 21 तारखेला तालुक्यातील तमाम बांधवांनी या चळवळीत सहभाग घ्यावा. कारण, ही संस्था मोडीत निघाली तर राजकारण्याची मुले लाखो आणि कोट्यावधी रुपये देऊन शिक्षण घेतली. मात्र, शेतकरी, मजूर आणि दुबळ्या व्यक्तींच्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागेल. चला--अगस्ति कॉलेज वाचवूया...!
क्रमश: भाग १