उठसुठ कारखान्याची बदनामी हाच यांचा धंदा.! मांडा, पण खोटे नको.! पाटील तडातडा बोलु लागले.!


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

                   गेल्या काही दिवसांपासून अगस्ति कारखान्याच्या अस्थित्वावर मोजक्या व्यक्तींनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्यामुळे, पहिल्यापासून कारखान्याची बदनामी होऊ पाहत आहे. एक वेळ अशी होती की, या संस्थेला बदनाम करुन जिल्ह्यात आणि राज्यात अपप्रचार केला. त्यामुळे, लेबर गोळा करण्यापासून ते आर्थिक सोर्सपर्यंत अनेक अडचणी काही उपद्रवी व्यक्तींनी आणल्या. तरी देखील गायकर साहेबांसह संचालक मंडळाने त्यावर मात केली. कारखाना कडेलोटावर आहे म्हणायचे आणि नको तशी भंपक चर्चा करायची. म्हणजे, आम्ही निट चालवतोय हेच देखवत नाही. तर यांनाच कारखाना बंद पाडयाची घाई झाली आहे की काय असा प्रश्न पडतो. गेली 30 वर्षे हे तेथे नव्हते तेव्हा कारखाना बंद पडला नाही आणि जोवर कारखान्याची मुहुर्तमेढ रोवणारे जिवंत आहेत. तोवर काखान्याचा बॉयलर थांबत नाही. त्यामुळे, ज्याचे काहीच योगदान नाही, ज्यांना सध्या काहीच कामे नाहीत त्यांनी बाश्कळ गप्पा मारण्याचे बंद करावे. काय बोलायचे असेल ते सत्य-सत्य बोलावे, खोटे पण रेटून बोलुन सभासद आणि शेतकर्‍यांची दिशाभूल करु नये. असे मत अगस्ति कारखान्याचे संचालक कचरुपाटील शेटे यांनी रोखठोक सार्वभौमशी बोलताना व्यक्त केले.


ते म्हणाले की, खोटेपणाला देखील काहीतरी मर्यादा असतात. काहींचे वय झाल्याने त्यांच्यातील शहानपण नष्ट होत चालले आहे. कारखान्यावर बोलताना किमान खरी आकडेवारी आणि वास्तव परिस्थितीत तरी जनतेसमोर मांडली पाहिजे. आम्हाला संचालक म्हणून निवडून दिले त्यामुळे आम्ही नियोजन करु, आम्ही शहान्याचे दोन गोष्टी एकुण घेऊ मात्र अतिशहान्यांचे ऐकण्यात आम्हला स्वारस्य नाही. खरंतर कारखान्याच्या उसाबाबत जे काही नियोजन चालु आहे. ते अतिषय चांगले आणि प्लॅनिंग नुसार चालु आहे. कधीकाळी आपत्ती येते, नियोजनात बदल होतात, मतभेद देखील होता. त्यामुळे, असे नाही की आम्ही चुक आहोत. मात्र, दुसर्‍याला नायालक ठरवून आम्ही किती शहाणे आहोत हेच मांडण्यात अनेकजण माहिर झाले आहेत. मात्र, ही धनलक्ष्मी टिकली पाहिजे यासाठी आम्ही कोणाच्या तोंडाला तोंड देत नाही. कोणाला तेथे राजकारण करायचे असेल तर नक्की करा. पण, चालु गाडीची कानखिळ काढण्याचा प्रयत्न का करता? निवडणुका येऊद्या आणि मग काय बोलायचे काय करायचे ते आरोप करा. आम्ही केलेल्या नियोजनात तुम्ही पळ्या घुसळण्याचे काम करु नका. हे त्यांना तरी पटले पाहिजे की, ते सांगणार आणि मग त्यांच्या म्हणण्यानुसार प्लॅनिंग करायचे आणि तसे काम करायचे. मग एमडी कशासाठी बसला आहे? चेअरमन, व्हा.चेअरमन आणि संचालक मंडळ काय कामाचे आहे? कशी ही लोकं अधिकारी झाली आणि कशी कामे केली देव जाणे.!

पाटील पुढे म्हणाले की, शेतकरी उत्पादकांनी समजून घेतले पाहिजे. की, जे आरोप करतात त्यांना कारखान्यात राजकारण करायचे आहे. म्हणून निव्वळ व्हेक बोलणं आणि फेक सांगणं असं यांचं काम सुरू आहे. वास्तवत: कारखान्यात मागचे आणि आजचे वर्षे यांची तुलना केली तर लक्षात येते की, 2021 मध्ये 3 हजार 828 हेक्टर इतकी नोंद ऊसाची होती. ती या वर्षी 2022 मध्ये 4 हजार 907 हेक्टर इतकी आहे. म्हणजे 1 हजार 79 हेक्टर उत्पादन अधिकचे आहे. 2021 मध्ये मार्च महिन्यात 1 हजार 257 हेक्टर उस तोडला गेला होता. तर आज 1 हजार 796 हेक्टर म्हणजे 539 हेक्टर उस जास्त तोडला आहे. 2021 मध्ये या महिन्यात 404 हेक्टर ऊस बाकी होता. 2022 याच महिन्यात 11 वा आणि 12 वा मिळुन 137 हेक्टर ऊस तुलनात्मक जास्त तोडला गेला आहे. तर याच हंगामात तब्बल 4 लाख 47 हजार 635 मे.टन उसाचे गाळप झाले आहे आणि 1 नोव्हेंबर 2021 ते आज 16 मार्च 2022 पर्यंत 2 लाख 90 हजार 475 मे. टन हे कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप झाले आहे. म्हणजे, आज प्रतीदिन 26 ते 27 शे मे.टन आवक सुरू आहे. ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर कार्यक्षेत्रातील 1.40 लाख मे.टन इतका शिल्लक उस आणण्यासाठी एप्रिल ऐन्ड हा दिवस उजडेल. उलट मागील वर्षाच्या तुलनेत 62 हजार मे.टन ऊस हा जास्त तोडून आणलेला आहे. त्यामुळे, प्रत्येकाचा उस कारखान्यात आणला जाईल. तसा हंगाम बंद होणार नाही. आता हे देखील नमुद केले पाहिजे की, संगमनेर कारखाना देखील 5 मे पर्यंत बंद झालेला नाही. 10 ते 15 मे पर्यंत अन्य कारखाने बंद होतात. मात्र, काही लोक असे दर्शवितात की, जणू शेतकर्‍यांच्या उसाला कोणी वालीच नाही.

आता, कारखाना बंद पाडू पाहणार्‍या लोकांनी थोडं आजुबाजुच्या तालुक्यात देखील पहावं की, कितव्या महिन्यातील उसतोड चालु आहे. खरंतर त्यांच्या 17-18 महिन्यांतील तोडी बाकी आहेत. मात्र, अकोल्यात असा कोणी एक देखील अपवाद नाही. कोणाचे वैयक्तीक रस्त्याचे, शेताचे वाद आहेत त्यावर कारखाना काहीच करु शकत नाही. मात्र, तालुक्यात 11 वा 12 वा प्रोग्राम सुरू आहे. उगच उचलायची जीब आणि लावायची टाळ्याला. हे काही बरोबर नाही बुवा.! अगस्ति कारखान्यातच नव्हे, तालुक्यात लोकशाही चालते. येथे कोणी कोणावर काहीही आरोप करु शकतात, कोणाला काहीही बोलु शकतात, येथे प्रत्येकजण प्रत्येक स्वातंत्र्याचा उपभोग घेतो. मात्र, शेजारी किंवा अन्य तालुक्यात कोणाची ब्र काढण्याची दानत नाही. तेथे रिकामटेकड्यांची देखील पोपटपंची चालत नाही. कितीही हुशार असला तरी तो त्याच्या घरी. दुर्दैवाने तालुक्यात हुशार लोक आहेत त्यांनी कधी तालुक्याच्या प्रगतीला संस्थांच्या विकासाला हातभार लावला नाही. मात्र, त्यांचे वाटोळे कसे होईल, बदनामी कशी होईल, त्या मोडीत कशा निघतील, येथील नेत्यांना बदनाम कसे करता येतील याकडे मात्र चांगला कटाक्ष असतो. त्यामुळे, येथील शेतकरी उत्पादक हे अशा उपद्रवी लोकांच्या भुलथापांना बळी पडणार नाही, आणि जे पडणार असतील त्यांनी तरी सदसद विवेक बुद्धीने विचार करणे गरजेचे आहे. असे मत पाटील यांनी सार्वभौमशी बोलताना व्यक्त केले.

खोटेपणाला उत्तरे देऊन आम्ही कंटाळलो.!

हवामान, वादळे, वातावरण यामुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. अकोल्यातच नव्हे.! राज्यातील उसांना तुरे आले असून तांबेरा रोगाने पछाडले आहे. त्यामुळे, शेतकर्‍यांना वाटते आहे की, आपला उस तत्काळ गेला पाहिजे. दुसरे पिक घेण्याची घाई आहे. हे देखील आम्ही समजू शकतो मात्र, एकदम सगळ्यांचा ऊस आणणे शक्य नाही. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 1 हजार 79 हेक्टर उस जास्त आहे. तरी आपण तुलनात्मक 137 हे. मार्चमध्ये जास्त तोडला आहे. नियोजनानुसार सर्व व्यवस्थित चालु आहे. तरी थोडं काही झालं की, मोचके लोक त्याचा बाऊ करतात. आता गेटकेनच्या 28 टोळ्यांचे कार्यक्षेत्रात स्थलांतर, झाल्या आहेत, कोप्या खोलणे, बैल, गाड्या, संसार यांची वाहतूक आणि पुन्हा नव्या जागेवर स्थिर होण्यासाठी वेळ लागतो की नाही ? उसतोड कामगार देखील माणुस आहे. त्यांना सनसुद आहे त्यामुळे, अनेकांनी शिवरात्रीला सुट्टी घेतली. दरम्यानच्या काळात अवकाळी पाऊस आल्याने गाड्या शेतात जाऊ शकल्या नाहीत. कोठे रस्त्यांवर पाणी साचले होते. ऐनवेळी अनेक अडचणी येतात. त्याला आपण काहीच करु शकत नाही. त्याचे सुद्धा नको तसे भांडवल केले जाते. परंतु, प्रत्येक गोष्टी संभाळून, अडिअडचणी लक्षात घेऊन, लेबरांची काळजी घेऊन कारखाना चालवावा लागतो. त्यासाठी आम्ही खंबिर आहोत. त्यामुळे, एप्रिल ऐन्डपर्यंत उरलेला 1.40 लाख मे.टन ऊस आपण कोणत्याही परिस्थितीत आणणार आहोत. लोक अप्रचार करतात की, नेवाशाहुन ऊस आणला. पण, वाहतुक खर्च ऊस तोडणी वैगरे लक्षात घेता आपण नेवाशाचा ऊस आणत नाही हे त्यांना कोणीतरी समजून सांगणे गरजेचे आहे. तर, विरोधक म्हणतात मजुर पळून गेले. उलट मी त्यांना सांगतो, 28 टोळ्या आल्या आहेत आणखी 30 टोळ्या येणार आहेत. त्यामुळे, यापुर्वी बदनामी केली आता तरी यांनी हे प्रकार थांबविले पाहिजे. कारखाना नो केन होता असे म्हणतात मात्र, दोन दिवस पाऊस सुरू होता तेव्हा थोडेफार विस्कळीत होणे सहाजिक आहे. मात्र, तरी देखील 3 हजार 500 गाळप चालु आहे तो नो केन झाला नाही. त्यामुळे, आरोप आणि वास्तव यातील फरक आणि राजकारण उत्पादकांनी लक्षात घेतले पाहिजे. तर, कोणतीही माहिती न घेता म्हणे की, 16 ते 17 महिन्यांचे उस आणले नाही. परंतु, प्रत्येकाना माहिती घ्यावी. की, नोव्हेंबर मधील ऊस सर्वाधिक असून तो एकदम गाळप करणे शक्य होत नाही. म्हणून त्याला 14 ते 15  महिने लागतात. बाकी सर्व ऊस वेळेत गाळप होत आहे. अशा सर्व दिशाभूल करणार्‍या गोष्टी काही लोक जनतेसमोर मांडत आहेत. यांच्या खोटेपणाला उत्तरे देऊन आम्ही कंटाळलो आहे..!  

                         - सिताराम पा. गायकर