आमदारांच्या विकासावर थू.! विकृतीकडून पाटीवर गुटख्यांच्या पिचकाऱ्या.! विरोधकांना देखवेना.!
सार्वभौम (अकोले) :-
डॉ. किरण लहामटे यांनी गेल्या दोन वर्षात अकोल्यात पाचशे कोटीच्या आसपास विकासकामे आणली आहेत. त्यामुळे, त्यांनी रोज विकासकामांचा सपाटा लावला आहे. खुद्द पिचड साहेब म्हणाले होते. हा गडी नुसता कोटीच्या बाता बोलतो. अर्थात हा उपरोधी टोला असला तरी तालुक्यात होणाऱ्या उद्धाटनांवर प्रत्येकाची बारीक नजर आहे. कोणी कितीही नाकारले तरी कधी नव्हे तालुक्यात अवघ्या दोन-अडिच वर्षात इतका निधी १९५२ ते आज २०२२ पर्यंत कोणी आणला नसावा, त्यामुळे विकास म्हणजे काय, सामान्य जनतेचा आमदार म्हणजे काय, आधिवेशने गाजविणे म्हणजे काय.! हे डॉ. किरण लहामटे यांनी तालुक्याला दाखवून दिले. गाव तेथे निधी आणि वाडी तेथे रस्ता या धेय्याने पछाडलेल्या आमदारांनी कोट्यावधींचा निधी तालुक्यासाठी आणला. त्याचेच की काय.! फार दु:ख काही कपाळकरंट्यांना झाले आहे. म्हणून तर शेकईवाडी परिसरात असणाऱ्या विकास कामांच्या पाटीवर कोणीतरी गुटका खाऊन पिचकाऱ्या मारल्या. हा काही योगायोग किंवा अपघात नाही. तर, हटीवादाने केलेला प्रकार आहे. आता डॉक्टर लहामटे यांचे समर्थक असे करुच शकत नाही. त्यामुळे, कोणत्यातरी विरोधकाने हा फलक गुटख्याने रंगवून विकास कामांचा जणू निषेध केला आहे. म्हणजे, थुंकणारा करायला एक गेला आणि झालं भलतच. आता लोक म्हणू लागले आहेत. स्वत: नाही केलं अन दुसरं करतय त्यावर असे थुंकायचे. हे वागणं काही बरं नव्हे.! त्यामुळे, उलट आता आमदारांना एक सहानुभूतिची लाट मिळाली आहे. तर, त्यांच्या पदाधिकाऱ्यांने या विकृत व्यक्तीस शोधून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अकोले तालुक्यात २०१९ साली डॉ. लहामटे निवडून आले तेव्हापासून तालुक्यात कधी नव्हे असे दोन गट पडले. पिचड आणि लहामटे यांच्यात इतके टोकाचे वैर झाले की, पुर्वीच्या राजकीय तडजोडींना आमदारांनी वावच ठेवला नाही. त्यामुळे, ऐककडे सत्तेपासून वंचित राहणे आणि दुसरीकडे ४० वर्षाची आमदार हातून निघून गेली. या पलिकडे देशात पवार साहेबांना सोडून जाणारा निष्ठावंत अशी टिचकी देखील माथी पडली. त्यामुळे, प्रचंड राजकीय अस्थिरता असताना अचानक नगरपंचायत हाती आली आणि अच्छेदिन म्हणजे काय.! हे फार दिवसांनी शहरात पहायला मिळाले. हे यश खऱ्या अर्थाने भाजपला उभारी देणारे आहे. मात्र, यापुर्वी डॉ. लहामटे यांचे बॅनर फाडने, त्यांच्या बॅनरवर बॅनर चिकटावणे, त्यावर चिखलफेक करणे. असे प्रकार वारंवार होत होते. याबाबत अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. आता हे वातावरण निवळते कोठे, नाहीतर पुन्हा कोणीतरी विकृती केली आहे. डॉ. लहामटे यांच्या विकासकामाच्या बॅनरवर कोणतरी अज्ञात इसम गुटका खाऊन थुंकला आहे. त्यामुळे, पुन्हा तालुक्यतील वातावरण गढूळ झाले आहे. वेळीच राष्ट्रवादीचे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष प्रभात चौधरी यांनी ते पुसून काढले. अन्यथा आणखी वातवरण पेटले असते.
विकास खुपू लागलाय.!
आमदारांनी आजवर जी विकासकामे आणली ती आता विरोधकांच्या डोळ्यात खुपू लागली आहेत. जे स्वत:ला करता आले नाही, ते विद्यमान आमदार करत आहे हे उघड-उघड समोर येऊ लागल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळु सरकु लागली आहे. ही अशीच विकासकामे होऊ लागली तर आपले राजकाऱण धोक्यात येऊ शकते हे लक्षात आल्याने हे असले उपद्रव काही समाजकंठकांनी सुुरु केले आहे. परंतु, त्यांना आम्ही ठणकावून सांगतो की, या तालुक्यात आजही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि उद्याही पक्षाचाच राहणार आहे. त्यामुळे, तुम्ही एका बॅनरवर नव्हे, प्रखर सुर्याकडे पाहून थुंकला आहात. हे असले गलिच्छ राजकारण आणि कुरापती कराल तर तो थुका तुमच्याच तोंडावर परत आल्याची अनुभूती येईल. त्यामुळे, कोणाला बदनाम करुन आपण मोठं होण्यापेक्षा कामे करुन, जनतेला विश्वासात घेऊन, सामान्यांच्या गळ्यातील ताईत होऊन पुढे या.
- महेश तिकांडे