खरे प्रेम सिद्ध करण्यासाठी तिने मांडी व छातीवर त्याचे नाव कोरले.! हात कापून रक्तभंबाळ झाली, ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम.!
सार्वभौम (संगमनेर/अकोले) :-
अकोले तालुक्यातील देवठाण येथील विद्यार्थिनी शिक्षणासाठी संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात पाहुण्यांकडे गेली होती. तेव्हा वडिलांनी ऑनलाईन शिक्षाणासाठी मोबाईल दिला आणि त्याहून भलतेच चाळे सुरू केले. या मोबाईलमध्ये इंन्स्टाग्राम खाते उघडून एका तरुणाशी मैत्री केली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि ते अगदी शरिर संबंधापर्यंत गेले. खरंतर अल्पवयीन मुलगी आणि त्यात संगमनेरच्या एका पुढार्याच्या लॉजवर हा अत्याचार झाला. ही गोष्ट येथेच थांबली नाही. तर, या प्रेमविराने त्या अल्पवयीन मुलीस शालेय परिक्षा सोडून प्रेमाच्या परिक्षा देण्यास भाग पाडले. तुझे जर माझ्यावर खरे प्रेम असेल तर तू तुझ्या हात कापून दाखव, मुलीने ते देखील केले. त्यानंतर याची विकृती इतकी टोकाला गेली. की, याने तिला सांगितले, तुझ्या मांडीवर आणि छातीवर ब्लेडने माझे नाव कोरुन दाखव. तरच तुझे खरे प्रेम, आता म्हणतात ना.! दिल गया गधे पे तो परी क्या चीज हैं.! त्याप्रमाणे या मुलीने त्याने सांगितल्याप्रमाणे नाव कोरले आणि त्याला फोटो टाकले. जेव्हा लग्नाचा विषय समोर आला तेव्हा या मुलाची चौकशी केली तेव्हा समजले हा कोणत्याही बँकेत नाही. त्याने मुलीस फुस लावली होती. मात्र, तो लग्नासाठी ठाम होता. त्याचा खोटेपणा आणि असे विकृत प्रेम लक्षात आल्यानंतर मुलीने पालकाच्या आधाराने पोलीस ठाणे गाठले आणि त्यानंतर लखन अशोक राजपूत (रा. आश्वी, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील देवठाण येथे राहणारी मुलगी शिक्षणासाठी आई-वडिलांनी संगमनेर येथे पालकांकडे ठेवली होती. तिने शिकुण मोठ व्हावं, स्वत:च्या पायावर उभं रहावं म्हणून शेतकरी बापाने कष्टाने तिला एक मोबाईल घेऊन दिला होता. दरम्यान, 2021 मध्ये ऑनलाईन शिक्षण होते तेव्हा हिने मोबाईलमध्ये इन्स्टाग्रामवर आपले खाते उघडले होते. तेव्हा जुलै महिन्यात तिची लखन राजपूत या तरुणाशी ओळख झाली. तेव्हा त्याने सांगितले की, मी एका बँकेत कामाला आहे. तेव्हापासून त्यांच्यात हाय-बाय आणि मेसेजचा सिलसिला सुरू झाला. त्यानंतर यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि फोनहुन यांची मैत्री अधिक घट्ट झाली. त्यानंतर लखनला काही विरह सहन झाला नाही. त्याने पीडित विद्यार्थीनीस भेटण्याची विनंती केली. त्यानंतर ही दोघे संगमनेर बस स्थानकाच्या परिसरात असणार्या एका लॉजवर भेटले. तेव्हा लखन म्हणाला की, तु मला फार आवडतेस मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. असे अनेक नाना प्रलोभने त्याने दाखवत तिला प्रेमाच्या मोहात पाडले.
दरम्यान, आता हा प्रकार येथेच थांबला नाही. तर, यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये संगमनेरच्या बाहेर फिरण्यास जाण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार एका गाडीवर बसून दोघांनी थेट कोपरगाव गाठले. तेथे दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एका लॉजवर नेवून पीडित विद्यार्थीनिची इच्छा नसताना तिच्यावर वारंवार बलात्कार केला. मी काही झाले तरी लग्न करेल काळजी करु नको असे म्हणून तिच्या अज्ञान पणाचा फायदा घेत त्याने तिच्यावर अन्य अत्याचार केले. या दोघांनी पुन्हा संगमनेर गाठले आणि तेव्हा ठरविले की, आता आपण लग्न करायचे. मात्र, मुलीचे वय नसल्याने त्यांना अनेक अडथळे येत होते. त्यानंतर आरोपी लखन याने तिला पुन्हा नोव्हेंबर महिन्यात संगमनेर बस स्थानकाच्या परिसरात असणार्या एका लॉजवर नेले.त्यावेळी विद्यार्थीनी म्हणाली, आता काही करायचे नाही. तू लग्न कर आणि मग आपण जे हवे ते करु. मात्र, तिची इच्छा नसताना देखील आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतर हे दोघे आपापल्या घरी गेले.
दरम्यान, यांचे फोनहून संभाषण होत होते. तेव्हा, लखन पीडित मुलीस म्हणाला की, तुझे खरोखर माझ्यावर प्रेम आहे का? तेव्हा ही मुलगी म्हणाली की, मी काय करु तेव्हा तुला खरे वाटेल? तेव्हा लखन म्हणाला की, तुझा हात कापून दाखव मग मला विश्वास पटेल. त्यावेळी पीडित मुलीने तिचा डाव्या हाताच्या मनगटावर ब्लेडने वार केले. त्यात प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. ही जखम गंभीर असल्यामुळे, तिला संगमनेरातील एका खाजगी रुग्णालयात देखील करण्यात आले होते. आता या रक्ताळलेल्या जखमा आणि कापलेला हात तिने लखनच्या मोबाईलवर शेअर केला होता. तेव्हा त्याचे मन भरले. मात्र, त्याच्यातील शंकेचा किडा काही मेला नाही. जानेवारी महिन्यात पुन्हा याचे विकृत प्रेम उफाळुन आले. तो तिला म्हणाला की, तुझे माझ्यावर खरे प्रेम नाहीच. तेव्हा ती लखनला म्हणाली, मी एकदा परिक्षा दिली आहे. पुन्हा काय करु म्हणजे तुझा विश्वास बसेल. तेव्हा तो म्हणाला की, तुझ्या मांडीवर आणि छातीवर माझे नाव कोरुन दाखव. तेव्हाच मला विश्वास बसेल की, तुझे माझ्यावर खरे प्रेम आहे. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे, प्रेम म्हणजे असली कापाकापी नव्हे.! हे तिच्या लक्षातच आले नाही. त्यामुळे, आंधळ्याप्रमाणे ती तो सांगेल तसे करीत गेली. तेव्हा तिने मांडी आणि छातीवर त्याचे नाव देखील कोरले आणि त्यास फोटो टाकले.
आता, ही मुलगी आपल्यासोबत सोडून कोणाशीच लग्न करणार नाही. याची त्याला खात्री झाली. त्यामुळे, तो निवांत होता. मुलगी देखील तिच्या मतावर ठाम होती. मुलगा बँकेत आहे. त्यामुळे, स्वत:च्या पायावर उभा असेल तर आई वडिलांना आपली भूमिका मांडण्यात काही भिती नाही. म्हणून तिने वडिलांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. कोणत्या बापाला मुलीचे वाईट व्हावे असे वाटत नाही. त्यामुळे, यांनी चौकशी केली तर हा विकृत प्रियकर कोणत्याही बँकेत कामाला नव्हता. मुलीची त्याने पुर्णत: फसवणुक केली होती. या पलिकडे विचार झालाही असता. मात्र, अशा पद्धतीने प्रेम सिद्ध करायला लावणारा मुलगा कोणाला आवडेल. त्यानंतर यांच्यात मतभेद झाले. तेव्हा, आरोपी लखन याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. तू माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुझे फोटो व्हायरल करेल, तुझ्या भावाचे अपहरण करेल वैगरे. मात्र, आपली फसवणुक झाली असून प्रेमात घात झाल्याचे लक्षात येताच तिने पोलीस ठाणे गाठले आणि लखन राजपूत याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पालकांनी पाल्याचा मित्र व्हावे.!
दरम्यान, आपला पाल्य कितीही विश्वासातला असूद्या. त्याच्याकडे शिक्षण किंवा अन्य कारणास्तव मोबाईल देताना त्यावर पालकांनी देखील लक्ष ठेवले पाहिजे. हा दोष मुलांचा नव्हे तर त्यांच्या वयाचा आहे. त्यांच्या संस्काराचा नव्हे तर त्यांच्या सानिध्याचा आणि शरिरात होणार्या नैसर्गिक बदलाचा आहे. त्यामुळे, पालकांनी पाल्याचा मित्र म्हणून वावर केला पाहिजे. वारंवार शिक्षकांच्या संपर्कात राहिले पाहिजे. मारहाण आणि दमदाटी हा आजकाल पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे, आता बर्याच दिवसानंतर शाळा कॉलेज सुरू झाले आहे. त्यामुळे, दादा, भाई, डॉन हे रोडरोमीयो रस्त्यावर दिसतील. त्यांनी न घाबरता त्यांच्या स्टण्टच्या मोहात न पडता त्रास झाल्यास शिक्षक, पाल्य किंवा थेट पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे.
- पी.ए.सोनवणे (समुपदेशक)