शिक्षकाचे स्वयंपाक घरात अश्लिल चाळे.! मिठी मारुन तिला ठार मारण्याची धमकी.! तिने मास्तरलाच धडा शिकविला.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                               संगमनेर तालुक्यातील खांडगाव परिसरात एका शिक्षकाने महिलेशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. २६ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. महिला ही स्वयंपाक करीत असताना हे मास्तर त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी महिलेला मिठी मारली, जेव्हा, त्याचा गलिच्छ हेतू समोर आला तेव्हा महिलेने एकच कज्जा केला. ही आरडाओरड झाल्यानंतर मास्तरने घरातून धुम ठोकली, मी तुला मिठी मारली हे जर कोणाला सांगितले तर तुला मी ठार करेल अशी या बहादराने धमकी दिली आणि तो पसार झाला. मात्र, घाबरलेल्या या महिलेने मोठ्या धाडसाने घडला प्रकार आपल्या पतीस सांगितला आणि दोघांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादिनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे एक ४० वर्षीय महिला शेती करुन आपली गुजरान करते. ती शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरात स्वयंपाक करीत होती. तर, त्याच वेळी पीडितेचे पती आणि सासू दैनंदिन बाहेर काम करत होते. तेव्हा, एक व्यक्ती हा गुपचूप घरात घुसला. पीडित महिला कामात व्यस्त असताना त्याने तिच्याशी काही लगट करण्याचा प्रयत्न केला आणि इकडचे-तिकडचे बोलणे झाल्यानंतर त्याने अचानक पिडित महिलेला मागून मिठी मारली. अचानक झालेल्या प्रकारामुळे पीडित महिला घाबरुन गेली. त्यामुळे, तिने आरडाओरड सुरु केली. मात्र, त्यास घाम फुटला आणि त्याने तिला ओरडू नको अशी विनंती केली. मात्र, चुकीच्या उद्देशाने झालेला हमला तिच्या लक्षात आला आणि तिने त्याला विरोध केला. लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य संबंधित महिलेला अनपेक्षित होते. त्यामुळे, तिने त्याला धडा शिकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तेथून काढता पाय घेतला. जाताना त्याने पीडित महिलेस धमकी दिली की; मी तुला मिठी मारली, हे जर तू कोणाला सांगशील तर मी तुला जीवे मारुन टाकेल. असे म्हणत तो तेथून पळून गेला.

          दरम्यान, ज्या व्यक्तीला आपण आदर्श मानतो, एक शिक्षक म्हणून ज्याची प्रतिमा चांगली आहे त्यानेच विश्वासघात केल्याने पीडित महिला घाबरुन गेली होती. मात्र, तरी देखील संबंधित व्यक्तीच्या कृत्यास अभय न देता तिने घडलेला प्रकार आपल्या पतीस आणि सासुला सांगितला. त्यानंतर, रागाच्या भरात यांनी मास्तरला धडा शिकवायचा निर्णय घेतला. मात्र, तोवर मास्तर पसार झालेला होता. त्याचा शोध घेऊनही मिळून आला नाही. त्यानंतर, पीडित महिलेच्या पतीने कायदेशीर आधार घेत थेट पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलीस अधिकारी साहेबांसमोर महिलेने घडला प्रकार कथन केला. त्यानंतर, पोलिसांनी फिर्यादिनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पुढील तपास अमित महाजन करीत आहे..


दरम्यान, सन १९७२ च्या दशकात श्रीराम लागु यांचा पिंजरा पिक्चर आला होता. त्यात मास्तर नामक कॅरॅक्टर हे अगदी समाजिक दृष्टीकोणातून रेखाटले गेले आहे. मात्र, एकदा का नको तो चळ लागला की ज्ञानदान देणारे मास्तर देखील किती वाह्यात जातात ते पिंजरा चित्रपटाने दाखवून दिले आहे. तेव्हापासून शिक्षकांच्या प्रतिमेला नेहमी आरोपाच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. अर्थात आज एका शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याची खऱ्या अर्थाने शहानिशा होणे आवश्यक आहे. खरोखर असा प्रकार घडला आहे का? हा काही कौटुंबिक किंवा कट कारस्थान घडविणारा प्रकार आहे का? यात कोणाची हकनाक बदनामी करण्याचा हेतू आहे का? कि खरोखर महिलेची छेडछाड झाली आहे. याचा सखोल तपास पोलीस करणार आहे. यात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल अशी प्रतिक्रीया वर्दीने दिली आहे.