भंडारदऱ्याच्या भिंतीहून विद्यार्थिनीने उडी मारुन आत्महत्या.! मृत्युबाबत साशंकता, सखोल तपास सुरु.!
सार्वभौम (भंडरदरा) :-
अकोले तालुक्यातील शेंडी परिसरात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा भंडारदरा धरणाच्या भिंतीहून जीव गेला आहे. तिने आत्महत्या केली की पाय घसरुन पडली याबाबत राजूर पोलीस तपास करीत आहे. मात्र, काही गोष्टींची पार्श्वभूमी पाहता हा प्रकार आत्महत्या असू शकतो असे प्राथमिक मत पोलिसांचे आहे. ही मुलगी एकटीच धरणाच्या भिंतीवर गेली कशी? फिरण्यास गेली असती तर सोबत कोणीच का नव्हते, भिंतीवर सुरक्षा असताना तिला तिकडे सोडले कोणी असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे, याप्रकरणी तुर्तास अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून या मृत्युप्रकरणी सखोल तपास सुरु आहे. उज्वला बाळु वैराळ (वय १७, रा. वाकी, ता. अकोेले) असे मयत मुलीचे नाव आहे. यात जर पोलिसांनी सखोल तपास केला तर हे प्रकरण काय आहे? तिच्या मृत्युला नेमके कोण जबाबदार आहे, तिच्या मोबाईलवर कोणाकोणाचे संपर्क झाले आहे. यापुर्वी तिच्यासोबत काय घडले होते. त्यामुळे, या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उज्वला बाळु वैराळ ही विद्यार्थीनि भंडारदरा परिसरातील एका महाविद्यालयात ११ वी च्या वर्गात शिक्षण घेत होती. कोरोनामुळे काही दिवस कॉलेज बंद असल्यामुळे ती घरीच होती. मात्र, कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे शाळा कॉलेज सुरु झाले होते. त्यामुळे, तिचा शालेय दिनक्रम सुरु होता. दि. 25 मार्च 2022 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास ती भंडारदरा धरणार गेली होती. त्यानंतर हा प्रकार घडला. मात्र, पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की, धरणाच्या भिंतीवर संरक्षण म्हणून पोलीस मुख्यालयातून दोन ते तीन पोलीस नियुक्त केले जातात. त्यांच्या उपस्थितीत धरणाच्या भिंतीहून स्थानिक नागरिक आणि पर्यटक राजरोस भिंतीवर भटकंती करतात. त्यामुळे, या फिरस्तींना अभय नेमकी कोण देतात, भिंतीवर सोडण्यासाठी काही अर्थपुर्ण तडजोडी होतात का? भिंतीवर जाण्यासाठी जे उपरस्ते तयार करण्यात आले आहे. त्याकडे प्रशासन कायम कानाडोळा का करते, तर सर्वात महत्वाचे म्हणजे एकटी मुलगी धरणावर जाऊ पाहतेय तर तिला कोणी व का सोडले? असे अनेक प्रश्न सुरक्षेबाबत उपस्थित होतात.
दरम्यान, एक गोष्ट लक्षात येते की, विद्यार्थिनी मयत झाली तरी तिच्या मृत्युचे गुढ उकलले पाहिजे. पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. मात्र, ती एकटीच फिरण्यासाठी धरणाच्या भिंतीवर जाणे हेच तिच्यातील अस्वस्थता सांगून जाते. जर, चार मैत्रीणी फिरण्यासाठी जातात आणि मग पाण्यात डोकावताना असा काही प्रकार होतो. तर, नक्तीच याला अपघात म्हणता येईल. येथे घातपाताला देखील शंका नाही. मात्र, एकटीने धरणावर जाऊन भिंतीहून पडून मृत्यू होणे हे पोलिसांना देखील न पटण्यासारखे आहे. त्यामुळे, हा अपघात आहे की आत्महत्या? यावर देखील आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपुर्वी या मुलीने घर सोडले होते. ते का? याची देखील पोलीस चौकशी करत आहे. मुलीच्या मृत्युनंतर तिच्या मोबाईलची देखील चौकशी झाल्यास नेमकी याला काही वेगळा कंगोरा आहे का? यावर देखील प्रकाश पडू शकतो. त्यामुळे, राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे हे तपास यंत्रणेत माहिर आहेत. त्यांना पोलीस महानिरिक्षक यांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या काळात कायम तपासावर पडलेले गुन्हे नाहीतच त्यामुळे, ते या प्रकरणात देखील खोवलर जातील. जर कोणी दोषी असेल तर नक्की पुढील कारवाई होईल आणि जर कोणी दोषी नसेल तर कोणाला बळच गोवले जाणार नाही. परंतु, या प्रकरणात मयत मुलीस कोणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेय का? हे तपासणे आता राजूर पोलिसांसमोर आव्हाण असणार आहे.
दरम्यान, भंडारदरा भिंतीहुन आजवर अनेक पर्यटक किंवा काही स्थानिक परसरातील नागरकांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी देखील भिंतीवर वशिल्यानुसार सोडले जाते तर सुरक्षा रक्षक देखील तेथे फारशी कठोर ड्युटी करत नसल्याचे दिसते. विशेषत: स्थानिक नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ चालु राहतो. याच भिंतीवर काही तरुण फोटोसेशन करतात तर काही राईडींग देखील करताना दिसून येतात. भरधाव वेगात जाणाऱ्या गाड्या भिंतीहुन न हटकता जातात. त्यामुळे, येथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर कदाचित येथे कडक सुरक्षा असती तर या मुलीचा जीव देखील वाचला असता. त्यामुळे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.