आईच्या सोन्याच्या लक्ष्मीहाराहुन भावाने भावाचा खुन केला, फुकट्या शब्द जिव्हारी लागला अन रक्तपात झाला.!
सार्वभौम (अकोले) :-
वडिल मयत झाल्यानंतर आईला संभाळायचे कोणी? या कारणाहुन दोन भावांमध्ये वाद सुरु होते. त्यातील एकाने आठ महिन्यापुर्वी आईच्या गळ्यातील लक्ष्मीहार एका ठिकाणी गहाण ठेवला होता. त्याबाबत त्याला टोकले असता त्याने थेट आपल्या भावावर कुर्हाडीने वार केले. एकदा नव्हे तर दोनदा हल्ला झाल्यानंतर भाऊ रक्तभंबाळ झाला आणि अखेर त्याने जीव सोडला. ही घटना कोठे अन्य राज्यात नव्हे.! तर अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे शुक्रवार दि. 11 मार्च 2022 रोजी दुपारच्या सुमारास घडली. यात रविंद्र मनोहर आरोटे (वय 51) यांचा मृत्यु झाला आहे. त्यानंतर त्यांच्या पत्नीने थेट अकोले पोलीस ठाणे गाठले आणि मिथुन घुगे यांच्यापुढे आपली कैफीयत मांडली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर मार्तंड मनोहर आरोटे, मयुर मार्तंड आरोटे, शकुंतला मार्तंण्ड आरोटे, सोनल मयुर आरोटे (सर्व रा. ब्राम्हणवाडा, ता. अकोले) या चौघांना आरोपी करण्यात आले आहे.
देशात कोरोनाने थैमान घातले तेव्हा अनेकांना जगणे मुश्लिल झाले होते. त्याच काळात म्हणजे दोन वर्षापुर्वी रविंद्र आरोटे हे त्यांच्या पत्नीला घेऊन गावाकडे आले होते. त्यांच्याकडे एक रिक्षा होती. त्यावर ते उपजिविका करीत होते. शुक्रवार दि. 11 मार्च 2022 रोजी दुपारच्या सुमारास हे सर्व लोक आपल्या शेतात काम करीत होते. तेथे उपनेर येणार असल्यामुळे खळ्यावर आवरासावर सुरू होती. त्यावेळी, रविंद्र यांची आई राधाबाई जवळ बसली होती तर आणि भाऊ मार्तंण्ड हा देखील तेथेच गायी चारत होता. तेव्हा आई रविंद्र यांना म्हणाली की, तुझ्या भावाने माझा सोन्याचा लक्ष्मीहार कोठेतरी गहाण ठेवला आहे. त्यावर रविंद्र म्हणाले की, देताना तु मला विचारले होते का? तो फुकट्याच आहे. तो कसला परत देतो आता. हे शब्द मार्तंण्ड याने ऐकले असता त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो धावत धावत पुढे आला आणि त्याच्या हातातील कुर्हाड आपल्या भावाच्या डोक्यात घातली. हा सर्व प्रकार तेथे उपस्थित असलेल्या फिर्यादी तथा रविंद्र यांच्या पत्नीने आणि आईना पाहिला असता त्यांना देखील कुर्हाडीच्या दांड्याने याने मारहाण केली.
दरम्यान, यात तिघे जखमी झाले असता रविंद्र यांना तत्काळ ब्राम्हणवाडा येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांनी उपचार घेतले, महिलेवर देखील उपचार झाले असता घरी म्हातारी एकटी होती, घरी शाळु (ज्वारी) काढण्यासाठी उपनेर देखील येणार होता. त्यामुळे, या दोघांना मार लागून देखील ते रुग्णालयात थांबले नाही. ही दोघे घरी गेला असता सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा शेतावर गेले. मार्तंण्ड म्हणाला होता. आज मी यांचा खुनच करतो, यांना संपवुन टाकतो. त्यामुळे, यांच्या मनात भिती होती. त्यामुळे, ते सावधच होते. त्याच वेळी आरोपी मार्तंड आरोटे व मयुर आरोटे हे तेथे आले. त्यांच्यासह दोन महिला देखील होत्या. मार्तंण्डच्या हातात लाकडी दांडा तर मयुरच्या हातात खोरं होतं. त्यांनी तेथे येऊन शिविगाळ दमदाटी आणि धमक्या द्यायला सुरू केले. रविंद्र यांची पत्नी त्यांना समजून सांगत असताना या दोघांनी रविंद्र यांना मारहाण सुरू केली. ते खाली पडले तरी त्यांना ही दोघा मारहाण करीत होते. तर महिलांनी देखील अन्य कोणाला मधी येऊ दिले नाही.
दरम्यान, बेदम मारहाण झाली तरी देखील रविंद्र यांनी जिवाच्या आकांताने तेथून पळ काढला. आपल्या घराच्या जवळ असणार्या पडवित जाऊन ते लपले. मात्र, आरोपी यांनी रविंद्र यांना ठार मारण्याचा निश्चिय केला होता असे फिर्यादीत म्हटले आहे. मार्तंण्ड आणि मयुर यांनी तेथे जाऊन रविंद्र यांना इतके मारले की, त्यांच्या तोंडातून रक्त येत होते. उजव्या हाताचे एक बोट तुटले होते. पाठीवर, डोक्यात, पायावर आणि पोटात इतका जबरी मार लागला होता. तेथे रक्तच रक्त सांंडले होते. यावेळी, मुलाला मुलगाच मारीत आहे हे पाहुन त्यांची आई सोडविण्यासाठी गेली असता त्या माऊलीला देखील मारहाण करण्यात आली. केवळ एका लक्ष्मीहाराची किंमत म्हणजे एका मुलाचा जीव त्या आईला गमवावा लागेल हे माहित असते तर तीने तो अट्टाहास देखील केला नसता. मात्र, केवळ लक्ष्मीहार आणि फुकट्या हा शब्द आरोपीच्या जिव्हारी लागला आणि त्याने आपल्या भावाचा जिव घेण्याचा निर्णय घेतला. हे फार शुल्लक कारण आणि मोठे दुर्दैव आहे.
जेव्हा रविंद्र हे जमिनिवर कोसळले तेव्हा यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर रविंद्र यांच्या पत्नीने मोठ्या धिराने आपल्या नातेवाईकांना फोन केला. तेव्हा एक व्यक्ती तत्काळ आला असता त्यांनी रविंद्र यांना त्यांच्या रिक्षात टाकून ब्राम्हणवाडा येथील सरकारी दवाखान्यात आणले. मात्र, त्यांची प्रकृती प्रचंड गंभीर असल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णवाहीकेतून आळेफाटा येथे हलविण्यात आले. तोवर ते बेशुद्ध पडले होते. रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्या डोक्याचे सिटीस्कॅन करुन उपचार सुरू केले असता तोवर फार उशिर झाला होता. अंतर्गत रक्तस्त्राव आणि मेंदुला लागलेला मार यामुळे ते स्वत:ला सावरु शकले नाही. त्यांनी त्याच दिवशी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर पत्नी ललीता रविंद्र आरोटे (रा. खंडोबाची वाडी, रा. ब्राम्हणवाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात उपरोक्त व्यक्तींवर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.