अखेर तालुकाध्यक्षांनी दिला राजिनामा.! चार नर आणि एक मादी-गारवाचे वातावरण गरम.! माझ्यामुळे, कारखान्याची बदनामी नको.!

सार्वभौम (अकोले) :- 

               अकोले तालुक्यात सध्या ज्येष्ठांच्या राजकारणाची पातळी प्रचंड खालावली आहे. कोण कोणावर कसे आरोप करत आहे आणि कोण कोणाच्या इतिहासाचे उत्खनन करत आहे. हे आजचे तरुण बुजूर्गांकडून शिकत आहोत. त्यातील आज फारच चर्चेचा विषय म्हणजे त्र्यंबकेश्वर येथील गारवा हॉटेल आणि कारखान्याचे चार संचालक यांच्यावर सोशल मीडियात फार चर्चा सुरू आहे. चार नर आणि एक मादी.! म्हणजे नेमकी कोण? अशा प्रकारच्या पोष्ट व्हायरल होताना दिसत आहे. राजकीय बाजीरावकी करता-करता एकाने मस्तानी समोर आणली आणि वाकयुद्ध सुरू झाले. मात्र, बाजीरावच नॉट रिचेबल झाल्याचे मेसेज फिरु लागले आहेत. आता या सर्व प्रकरणात कारखान्याची हकनाक बदनामी झाली आहे. वैयक्तीक वाद हे स्थानिक संस्थांच्या माथ्यावर मारणे हेच मुळात चुक आहे. त्यामुळे, शिवसेनेच्या वादात चार संचालकांची नावे आली आणि त्यात शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांना प्रचंड वाईट वाटले. त्यांनी संचालक मंडळाला सांगितले की, एकतर तुम्ही बाजीराव दराडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. अन्यथा त्यांना त्या चौघाची नावे विचारा.! उठसुठ कोणीही उठायचे आणि संस्थांची बदनामी करायची. हे मला काही पटत नाही. त्यामुळे, संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून धुमाळ यांनी तडकाफडकी राजिनामा दिला आहे. त्यामुळे, तालुक्यात राजकीय चर्चेला पुन्हा उधान आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मा. जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे आणि विधानसभेचे मा.उमेदवार मधुकर तळपाडे यांच्यात समशेरपुर गटाहून राजकीय समशेरी (तलवारी) उगारण्याचे काम सुरू आहे. त्यात शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांची ऐन्ट्री झाली आणि वाद कुठच्या कोठे निघुन गेला. यांनी एकमेकांवर शब्द अपशब्दांनी हल्ला केला. ऐव्हाना पत्रकार परिषदेत शिव्याशाप दिल्या. त्यामुळे, एकामागे एक असा सहा पत्रकार परिषदा झाल्या. त्यात जनसेवक शंकरभाऊ चोखंडे देखील कोठे कमी पडले नाहीत. मात्र, हे आरोप वैयक्तीक वादाहून थेट कारखान्यासारख्या धनलक्ष्मीवर गेले. त्यामुळे, अधिच काय तिची कमी बदनामी झाली होती, त्यात आणखी भर पडली. त्यामुळे, कारखान्याचे संचालक मच्छिंद्र धुमाळ हे फार चिडले. कारण, दराडे यांनी चार संचालक एक महिला आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरातील हॉटेल गारवा यात झालेली ऐयाशी चव्हाट्यावर मांडली. अर्थात असे काही झालेच नाही. त्यामुळे, संस्था आणि संचालक यांची बदनामी करण्याचा घाट यांनी का घातला आहे? हे हॉटेल कोठे आहे हे पाहण्यासाठी काहींनी थेट त्र्यबकेश्वर गाठले. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार असे हॉटेल या परिसरात अस्थित्वात नाही. मग खरे काय आणि खोटे काय? हे सांगण्यासाठी अद्याप आणखी एखाद्या पत्रकार परिषदेची वाट पहावी लागणार आहे.

दरम्यान, हे सर्व घडत असताना कारखान्याच्या संचालक मंडळाने दराडे यांना जाब विचारणे आवश्यक आहे. जर असे काही झालेच नाही तर आपण त्याच्यावर कायदेशीर कायवाई केली पाहिजे. असे धुमाळ यांचे प्रांजळ मत आहे. मात्र, आज उद्या करुन यावर चेअरमन साहेब काही ठाम भुमीका घ्यायला तयार नाहीत. म्हणजे कोणी उठायचं आणि संस्था व संचालक यांच्यावर काहीही बोलायचे. तरी आपण ऐकणु घ्यायचे. संस्था टिकल्या पाहिजेे हे खरे असले तरी संचालकांचे चारित्र्य देखील टिकले पाहिजे. खुलेआम चारित्र्यहनन होत असेल तर हे अयोग्य आहे. कारण, यापुर्वी देखील राष्ट्रवादीच्या एका पदाधिकार्‍यांने कारखान्याची बदनामी होईल असा मचकुर प्रसिद्ध केला होता. त्याच्यावर कायदेशीर कायवाई करण्याचा निर्णय देखील झाला होता. मात्र, ते भिजत गोंगडे पडले. केव्हार विरोधकांच्या चुकीच्या आरोपांना बळी पडायचे? असे मत धुमाळ यांनी मांडले. त्यामुळे, जर माझ्या वैयक्तीक वादामुळे, कारखान्यावर चिखलफेक होत असेल तर मी राजिनामा देतोे. अशी खलबते कारखान्याता झाल्याची माहिती सार्वभौमच्या हाती आली आहे. 


तर, धुमाळ यांना देखील उत्सुकता आहे. की, हे महिलेशी ऐयाशी करणारे हे चार संचालक कोण आहेत. ती महिला कोण आहे? त्यामुळे, संचालक असताना त्यांना कायदेशी कारवाई करताना काही अडचणी येत आहेत. ते तेथून मोकळे झाले की, ते स्वत: शिवसेनेच्या वतीने गुन्हा नोंदवून आरोप करणार्‍यास जाब विचारणार आहेत. तर, शिवसेनेच्या महिला देखील फार आक्रमक झाल्या आहेत. त्या देखील या आरोपाचा जाब विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे, आता हे प्रकरण नेमकी कुठवर जाते. हे पहाणे फार महत्वाचे आहे. यात कारखाना दराडे यांच्यावर कायदेशीर कायवाई करेल का? धुमाळ यांचा राजिनामा मंजूर होईल का? ते चार संचालक आणि महिला कोण? हे समोर येईल का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत असून त्याची उत्तरे येणार्‍या काळात उघड होतील असे अनेकांना वाटते आहे. तोवर आपण आणखी एका पत्रकार परिषदेची वाट पाहणार आहोत.!