अखेर चंदनापुरीच्या हत्येचा उलगडा.! मित्रच निघाला हत्यारा, मित्रासोबत व्यावसाय करणे ठरला जिवघेणा.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात एका टायर पंक्चर काढणार्याची धारधार शस्त्राने निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवार दि.3 ते 4 फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. यात अब्दुल मोहम्मद युनिस कादीर (वय 27, रा. चंदनापुरी. ता. संगमनेर) हा तरुण मयत झाला आहे. तर घटनास्थळाहून पोलिसांनी एक टामी, आणि एक धारधार सत्तूर ताब्यात घेतला. हा खून कोणी केला असा प्रश्न पडलेला असताना पोलीस उपाधिक्षक आणि संगमनेर ग्रामीण पोलिसांनी त्याचा छडा लावला आहे. यात कादीर याचा मित्रच नवश्याद अब्दुल अन्सारी (वय 45, रेहमतनगर, ता. संगमनेर, मुळ रा. उत्तर प्रदेश) यानेच ही निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण, या दोघांनी एकत्र येऊन बेकरी सुरू केली होती. त्यात कादीर याने जास्त गुंतवणुक केली होती. अन्सारी हा पैसे देत नसल्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होते. त्याचे रुपांतर टोकाच्या वादात झाले आणि अन्सारी यास प्रचंड राग आला व त्याने आपल्या मित्रास रात्री वाजण्याच्या सुमारास भोकसून ठार केले. हा प्रकार पोलिसांनी उघड केला असून अन्सारी यास संशयीत म्हणून ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. या आरोपीचा मागमूस घेण्यासाठी पोलीस उपाधिक्षक यांच्या पथकाने आपली प्रतिष्ठा पुन्हा पणाला लावली होती. त्यात त्यांना अवघ्या तासात यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत अब्दुल मोहम्मद युनिस कादीर हा बिहारचा असून तो पोट भरण्यासाठी संगमनेरात आला होता. तर आरोपी नवश्याद अब्दुल अन्सारी हा देखील उत्तरप्रदेशचा असून दोघांची शहरातच भेट झाली होती. दोघांनी एकत्र येऊन एक व्यावसाय करण्याचे ठरविले होते. म्हणून कादीर यांनी पैसे जमा करून संगमनेरात बेकरी टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मयत कादीर याने तीने ते चार लाख रुपये जमा केले आणि बेकरीसाठी जी काही यंत्रसामग्री लागते. ती विकत घेतली. गुंतवणुक कादीरची आणि व्यावसाय अन्सारी करणार होता. दोघांनी मिळून जे.के.जी.एन या नावाची बेकरी सुरू केली. तेव्हा असे ठरले होते. की, जी काही गुंतवणून कादीर याने केली होती. ती नंतर अन्सारी याने परत करायची होती. मात्र, बराच काळ लोटला तरी अन्सारी पैसे देत नव्हता. त्यामुळे, कादरी हा त्याच्याकडे वारंवार पैसे मागत होता.
दरम्यान, अन्सारी हा म्हणाला होता की, मला या धंद्यातील इतंभूत माहिती आहे. त्यामुळे, तू काळजी करू नको. आपली चांगली इनकम होईल. मात्र, त्यांचा तोटाच होत गेला. त्यामुळे, अन्सारीकडून पैसे मिळेना म्हणून या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. यावर तोडगा म्हणून मयत कादीर यांनी सामोपचाराने नोटरी करून घेण्याचे ठरविले. त्यांची नोटरी झाली. मात्र, त्यावर दोघांचेही फार समाधान झाले नाही. यांच्यातील मतभेद आणि मनभेद कायम राहिले. त्यामुळे, अन्सारी याची धिटाई त्याच्या मित्रांवर कायम होत होती. एक दिवस यांच्यात पुन्हा टोकाचे वाद झाले आणि हा विषय तसा संपत नाही तर यालाच कायमचे संपवायचे असा टोकाचा निर्णय अन्सारी याने घेतला.
दरम्यान, शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास तो मयत कादीर यांच्या चंदनापुरी दुकानावर गेला. तेथे जाऊन त्यांची एकमेकांशी चर्चा झाली आणि पुर्वतयारीने गेलेल्या आरोपी अन्सारीने मयत कादीरवर धारधार शस्त्राने वार केले. हा रोष इतका होता की, त्याने पाठीत सुरा भोकसला, तर डोक्यात त्यात सुर्याने अनेक वार केले. तेथे पडलेली टामी देखील त्याने कादीरच्या डोक्यात घातली आणि तो तेथून चालता झाला. मात्र, जाताना त्याने कादीर याच्या अंगावर पांघरून टाकले. येथे काही घडले नाही. असा प्रकार दाखविण्यासाठी त्याने अनेक खटाटोप केले. मात्र, रक्ताच्या चिळकांड्या भिंतीवर उडाल्या होत्या. जमिनीवर रक्ताचे थारोळे साचले होते. हा प्रकार काही वेळाने उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली आणि अखेर 10 तासाच्या आत नवश्याद अब्दुल अन्सारी याला बेड्या ठोकल्या आहेत.
तर, अकोले शहराच्या लागत मोठ्या पुलाला लागून सरबजीत ओमप्रकाश चौहान याचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना देखील 3 ते 4 फेब्रुवारी रोजी रात्री घडली आहे. मात्र, यात अकोले पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी आरोपीस तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत. त्यात झाले असे की, चौहान आणि त्याचा मित्र शंकार साळुंके हा एका ठिकाणी दारु पिण्यासाठी बसले होते. तेथे दोघे ताईट झाले असता त्यांच्या शिविगाळ, दमदाटी आणि झक्कडपक्कड झाली. तेव्हा चौहाने याने साळुंके याच्या दोन कानफाडीत टेकविल्या त्याचा राग आल्याने तो रागाने तेथून निघून गेला. चौहान हा सुताराकाम करतो, तो त्याच्या दुकानात असताना शंकर तेथे गेला आणि मला का मारहाण केली असा त्याने जाब विचारला. तेव्हा शंकरने तेथील एक लाकूड उचलले आणि जोरात चौहानच्या डोक्यात मारले.
दरम्यान, चौहान तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. मात्र, शंकरच्या हे लक्षात येताच काही तासानंतर त्यानेच चौहानला सरकारी रुग्णालयात दाखल केला. आता रक्त इतके वाहीले होते की, चौहानला भुरळ आली होती. त्यामुळे, जखम पाहुन रूग्णालयातील डॉक्टरने जखमीस पुढील ठिकाणी उपचारासाठी जाण्यास सांगितले. मात्र, यांची ती मानसिकता झाली नाही. म्हणून यांनी एका खाजगी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते डॉक्टर देखील झोपलेले होते. म्हणून चौहान आणि साळुंके यांनी विचार केला की ही रात्र जाऊ देऊ सकाळ झाली की आपण दवाखाना करु. मात्र, दुर्दैवाने चौहानच्या डोक्यातून जास्त अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि त्याने रात्रीतून जीव सोडून दिला. हा प्रकार सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास लक्षात आला असता पोलिसांना माहिती देण्यात आली. सहा.पोलीस निरीक्षक घुगे यांनी तत्काळ घटनेची माहिती घेतली आणि साळुंके हा पसार होण्याच्या आत त्यास बेड्या ठोकल्या आहेत.