लग्नाला गेली अन गरोदर होऊन घरी आली.! अत्याचार करून तो नॉट रिचेबल होता. पोलिसांनी ठोकल्या बोड्या.! स्वार्थी प्रेमविर...!
एका लग्नात भेट झाली आणि तुरळक ओळख असणारी मैत्री उफाळुन आली. त्याच दिवशी हाय-बाय आणि त्याचे प्रेम देखील तिच्यावर जडलेे. तु मला फार आवडतेस अशी वल्गना करुन लग्नाचे आमिष दाखवत त्याच रात्री त्याने तिच्यावर अत्याचार केला. योगायोगाने पीडित तरूणी गर्भवती राहिली. एक-दोन महिन्यांनी हा प्रकार पुढे आला असता तिने आपल्या प्रियकराला लग्नाची साद घातली. मात्र, तोवर त्याने घर सोडून मोबाईल बंद करत पोबारा केला. हा प्रकार दि. 27 जून 2019 रोजी रात्री घडला होता. त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने पीडित तरुणीने थेट संगमनेर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी दिनेश बाळु बर्डे (रा. जोर्वे. ता. संगमनेर) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. आजवर बर्डे हा पोलिसांना चकवा देऊन पसार होत होता. आता मात्र, पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्या पथकाने त्यास बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे, गुन्ह्यांच्या निर्गतीचा धडका डेप्युटीने लावल्याचे पहायला मिळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील निळवंडे परिसतरातील एका तरुणीची ओळख आरोपी दिनेश बर्डे याच्याशी झाली होती. ते एका लग्नासोहळ्यासाठी गेले असता त्या दिवशी त्यांच्यातील मैत्री अधिक दृढ झाली. संगमनेर तालुक्यातील रायते येथे तो विवाह सोहळा पार पडला असता दिनेशने पीडित तरुणीसमोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव मांडला. तु मला फार आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. वैगरे गप्पागोष्टी झाल्यानंतर त्यांच्यात प्रेमाचे संभाषण सुरू झाले. त्यावेळी दिनेशने पीडित तरूणीस आपल्या एका पाहुण्यांच्या घरी थांबण्यास विनंती केली. एकमेकांवर त्यांचा विश्वास बसला असे वाटले असता त्यांच्यात त्या रात्री चांगल्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या.
दरम्यान, दिनेश बर्डे हा पीडित तरुणीस म्हणला की, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. कारण, तु मला फार आवडतेस. मी तुला धोका देणार नाही. त्याच्या शब्दांवर विश्वास ठेऊन ही तरुणी भाळली आणि आरोपीने पीडितेच्या संगनमतेने तिच्याशी शरिर संबंध केले. कालांतराने पीडित तरुणीचे पोट दुखण्यास सुरूवात झाली असता तिच्या घरच्यांनी तिला एका रुग्णालयात नेले. तेव्हा समजले की, ही तरुणी गरोदर आहे. त्यानंतर तिने आरोपी दिनेश बर्डे याच्याशी संपर्क केला. तु मला लग्नाचे वचन दिले होते. त्याचे काय झाले? मी गरोदर आहे त्यामुळे लग्न करणे तुला चुकणार नाही. मात्र, त्याच्याकडून वारंवार टाळाटाळीची उत्तरे मिळाली. त्यानंतर मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे, पीडितेने पुढे होऊन थेट पोलीस ठाणे गाठले आणि बर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून तो पसार होता. आता त्यास अटक करण्यात आली आहे. तीन वर्षे 7 महिने कवरेज क्षेत्राच्या बाहेर असणारा आता पोलिसांनी जेलमध्ये टाकला आहे. खरंतर कायम तपासावर असणार्या गुन्ह्यांना निकाली काढण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर आणि राहुल मदने यांनी मनावर घेतले आहे. डेप्युटीच्या पथकाने त्याची चोख अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. विशेष म्हणजे त्यांना यात मोठ्या प्रमाणावर यश देखील येऊ लागले असून खर्या अर्थाने या पथकाकडून पोलीस महानिरीक्षकांना अपेक्षित असणारी प्रॉपर पोलिसिंग दिसून येऊ लागली आहे.
नगर जिल्हा हा गुन्हेगारी क्षेत्रात आता आव्वल झाला आहे. मात्र, त्यात गुन्हे निर्गतीचे काम फार कासव गतीने होत आहे. अशा परिस्थितीत संगमनेर विभागात मात्र, पोलीस उपाधिक्षकांनी कायम तपासावर असणार्या गुन्ह्यांना आपल्या अजेंड्यावर घेतले आहे. खुन, दरोडे, बलात्कार आणि चेन स्नेचिंग तसेच चोरीच्या गुन्ह्यांची देखील उकल केली आहे. अकोल्यातील येसरठाव येतील जळीत खुन आणि संगमनेरातील चोर्या ह्या कायम तपासावर असल्या तरी मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस उपाधिक्षक यांच्या पथकाला यश आले आहे. यापुर्वी पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, पंकज देशमुख यांच्या काळात अशा प्रकारची पथके तयार करण्यात आली होती. जी केवळ छापेमारी आणि गंभीर गुन्ह्यांची उकल करीत असे. तर तत्कालीस एलसीबी पीआय दिलीप पवार आणि शशिराज पाटोळे यांनी देखील गुन्हे निर्गतीचे सर्वेत्तम काम केले आहे. त्या तुलनेत आता मदने यांचे काम अधोरेखीत करण्याजोगे होऊ लागले आहे.