घरी आलेल्या पाहुण्याने अत्याचार केला. ऐनवेळी मुलगा जागा झाला. अन पाहूणा थेट जेलमध्ये गेला.! निर्लज्जपणाचा कळस.!

   


सार्वभौम (अकोले) :-

               एका घरात पाहुणा म्हणून गेला आणि त्या घरातील महिलेवर एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार बुधवार दि. 9 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 11 ते सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वेळोवेळी घडला. मुलगा जागा झाला म्हणून हा प्रकार समोर आला असून आरोपी याने पीडित महिलेस धमकाविल्याने ती गप्प बसली होती. परिणामी आपल्यावर झालेल्या अन्यायाला दाद मागण्यासाठी तिने घडला प्रकार नंतर आपल्या पतीस आणि आईस सांगितला. त्यानंतर त्यांनी शुक्रवार दि. 11 रोजी पोलीस ठाणे गाठले आणि संबंधित व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी यावर तत्काळ कारवाई करीत गुन्हा दाखल केला असून आरोपी दत्तात्रय यादव ढगे (रा. कळस बु) यास बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मिथुन घुगे करीत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दत्तात्रय ढगे हा कळस येथील रहिवासी असून तो अकोले तालुक्यातील आंबड येथे एका ठिकाणी कारणानिमित्त पाहूणा म्हणून गेला होता. तेथे उशिर झाल्याने तो तेथेच मुक्कामी थांबला. रात्री सर्वांनी एकत्र जेवण केल्यानंतर याने संबंधित घरातील महिलेवर वाईट नजर टाकली. पीडित महिलेचे पती झोपेत असताना ढगे हा महिलेच्या खोलीत गेला आणि तिच्याशी अंगलट करु लागला. पीडितेने त्यास नकार दिला असता त्याने अधिक बळजबरी केली. जर तू काही बोलली तर मी तुझी बदनामी करीत आणि मीच येथे आरडाओरड करील. असे धमकाविले असता आरोपी याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला आणि तो पुन्हा त्यांच्या जागी जाऊन झोपला. या सर्व प्रकारामुळे, पीडित महिला प्रचंड घाबरुन गेली होती. घडला प्रकार आपल्या घरातील लोकांना सांगावा असे तिला वाटत होते. मात्र, भितीपोटी ती गप्प बसली होती.

दरम्यान, रात्री 11 वाजता घडलेला प्रकार पीडितेने कोणाला सांगितला नाही. त्याचा फायदा घेऊन आरोपी ढगे याने पुन्हा तिच संधी साधली आणि रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास त्याने पुन्हा तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. तिच्या असहायतेचा फायदा घेत याने तिला रात्रीतून तिन वेळा आपली शिकार केली. मात्र, जेव्हा पहाटे पीडित महिलेचे पती घरातून कामानिमित्त बाहेर गेले तेव्हा पुन्हा या व्यक्तीने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्याला घरात झोपलेल्या मुलाने पाहिले आणि तो पळुन गेला. आता पीडित पहिला घाबरलेली होती. मुलाने देखील आरोपीस पाहिले होते. त्यामुळे, त्याच्या कृत्याला वाचा फुटणार होती. तो दुसर्‍या दिवशी जेव्हा पीडितेचे पती घरी आले. तेव्हा तीने कोणत्याही दबावाला बळी न पडता घडला प्रकार सांगून टाकला. तर, कोणापासून काही एक न लापविता झालेल्या अन्यायावर न्याय मागण्यासाठी त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.

दरम्यान, हा प्रकार पोलीस ठाण्यात आला असता पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी संबंधित पीडितेची तक्रार दाखल करुन घेतली. तर आरोपी हा कोठे पसार होण्याच्या आधिच त्यास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुढील तपासासाठी पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, महिलांवर जर अन्याय होत असेल तर कोणाच्या दबावाला बळी पडू नये. घडलेला प्रकार पुढे आणण्यासाठी घटनेला सामोरे गेले पाहिजे. जर, एकदा अन्याय सहन केला. तर पुढे आणखी अन्यायाला सामोरे जावे लागते. त्यामुळे, अशा घटना वारंवार घडू नये यासाठी पोलिसांशी संपर्क साधून आरोपींना धडा शिकविणे गरजेचे आहे असे मत सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी व्यक्त केले आहे.