गवत विकले म्हणून भावाने घातली डोक्यात कुर्हाड, मी सुटून आलो तर सगळ्यांना खल्लास करीन, हाफ मर्डरचा गुन्हा, आरोपी अटक!
सार्वभौम (अकोले) :-
गवत दुसर्याला का विकले असे म्हणत आपल्या चुलत भावाने डोक्यात कुर्हाड मारून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे शुक्रवार दि. 20 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यात रावसाहेब पंढरीनाथ कानवडे (वय.50, रा. लिंगदेव, ता. अकोले) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती लोणी येथे उपचार घेत असून त्याच्या डोक्यात कुर्हाडीची कोर खोलवर गेल्याने तो उपार घेत आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात जबाबानुसार कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी आरोपी आण्णासाहेब गोविंद कानवडे यास अटक केली आहे. तर त्यास पुढील तपासासाठी न्यायालयात हजर केले असता कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रावसाहेब पंढरीनाथ कानवडे हे लिंगदेव येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या जवळच त्यांचे चुलतभाऊ आण्णासाहेब गोविंद कानवडे हे राहण्यास आहेत. यांच्यात रस्त्याच्या वादाहून नेहमी वाद होत असत. तर कधी एकमेकांकडे खुनशिने पाहणे होत असे. अर्थात आण्णासाहेब याचा गुन्हेगारी स्वभाव असल्याने त्याच्यावर यापुर्वी दोन केसेस दाखल आहेत. त्यामुळे, हे लोक तेथे दबून राहत होते. मात्र, यांचे जाणे-येणे एकाच वाटेहून असल्याने आण्णासाहेब हा नेहमी यांना शिविगाळ दमदाटी करुन ठार मारण्याची धमकी देत असतो. तर याने यापुर्वी एका व्यक्तीचा कुर्हाडीने हात तोडला असून एकाला बेदम मारहाण केली आहे. त्याबाबत एक कलम 326 आणि कलम 324 प्रमाणे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. तर आता नव्याने कलम 307 हा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
त्या दिवशी झाले असे की, शुक्रवार दि.20 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रावसाहेब पंढरीनाथ कानवडे हे त्यांच्या घरासमोर उभे होते. तेव्हा आण्णासाहेब कानवडे हा त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला कील तु माझ्याकडे रागाने का पाहत आहे. तु गावत दुसर्याला का विकले? ते आता मी माझ्या रस्त्याने दुसर्याला घेऊन जाऊ देणार नाही. असे म्हणून शिविगाळ दमदाटी केली. त्यास समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता तो थेट अंगावर धावून आला आणि त्याने लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. रावसाहेब यांनी त्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असा आण्णासाहेब याने त्याच्या हातातील कुर्हाड थेट रावसाहेब यांच्या डोक्यात मारली. मोठा घाव बसल्याने त्यांनी एकच टाहो फोडाला आणि त्यामुळे अजुबाजुची काही लोक जमा झाली. तर रावसाहेब यांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांचा मुलगा तेथे पळत आला. तर याच वेळी आण्णासाहेब यांची पत्नी देखील तेथे आली आणि त्यांनी देखील यांना मारहाण करण्यास सुरूवात केली असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, हे वादळ पेटल्यानंतर रावसाहेब यांची आई, सासुबाई आणि मुलगा यांना देखील आण्णासाहेब आणि त्याच्या पत्नीने मारहाण केली. मात्र, रावसाहेब यांना जास्त मार लागल्यामुळे, त्यांना तत्काळ रूग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर येथे उपचार होऊ शकला नाही. त्यामुळे, त्यांना लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तेथे जाऊन त्यांचे जबाब घेतल्यानंतर कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आण्णासाहेब यास अटक केली आहे. त्याच्यावर अन्य दोन गंभिर गुन्हे असून त्यांची माहिती न्यायालयाला दिली आहे. तर याची त्या परिसरात प्रचंड दहशत असून रावसाहेब यांचे कुटूंब पुर्णत: भेदरलेल्या अवस्थेत जिवण जगत आहे. याच्यापासून आमच्या जिवास धोका असून तु जर गुन्हा दाखल केला तर मी सुटून आल्यानंतर तुम्हा सर्वांना ठार करुन टाकीन अशा प्रकारची धमकी आरोपीने दिल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.