पाटलाच्या पोरानं चौथी बायको चौदाव्या दिवशीच मारून टाकली.! म्हणे सासरवाडीला अपमान झाला.! गुन्हा दाखल होताच ठोकल्या बेड्या.!
सासरवाडीला अपमान झाला म्हणून मा.पाटलाच्या पोरानं आपली चौथी बायको मारून टाकल्याची धक्कादायक घटना मंगळवार मंगळवार दि. 17 जानेवारी 2022 रोजी रात्रीच्या सुमारास अकोले तालुक्यातील मुरशेत येथे घडली आहे. दारु पिल्यानंतर गाडीहून पडलेल्या बायकोला त्याने बेदम मारहाण केली आणि तो एकटात घरी निघून गेला. त्यानंतर हे कृत्य मी केलेच नाही. तिला चक्कर आली होती. असा बहाणा त्याने घरी सांगितला. मात्र, जेव्हा शवविच्छेदनाचा अहवाल आला तेव्हा मयत शोभा संजय बांगर (वय 30) हिच्या अंगावर सोळा जखमा मिळून आल्या आहेत. त्यामुळे, हा अपघाती मृत्यु नसून तो खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्र्यंबक रामदास गोंदके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संजय भरत बांगर (रा. मुरशेत, ता. अकोले) यास बेड्या ठोकल्या आहेत. शोभा सोबत त्याचे गेल्या 13 दिवसांपुर्वी चौथे लग्न झाले होते अशी माहिती मिळाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय बांगर हा मुळचा मुरशेत येथील रहिवाशी आहे. त्याचे गेल्या काही दिवसांपुर्वी पहिले लग्न झाले होते. मात्र, अवघ्या महिनाभर देखील त्याची बायको सोबत राहिली नाही. त्यानंतर त्याने पुन्हा दुसरे लग्न केले. मात्र, ती देखील 15 दिवसांच्या आत चालती झाली. त्यानंतर त्याने शेंडी येथे एक प्रेमसंबंध केला आणि काही दिवस त्याने तेथेच संसार थाटला. मात्र, तरी देखील त्याला आपले कुटूंब बसविता आले नाही. त्यामुळे, तो नंतर असाच फिरत होता. गेल्या 15 दिवसांपुर्वी त्याने इगतपुरी परिसरातील त्रिगलवाडी येथील रामदास गोंदके यांची कन्या शोभा हिच्यासोबत लग्न केले होते. त्यानंतर सोमवार दि. 17 जानेवारी रोजी तो आपल्या सासरवाडीला गेला होता. तेथे तो आपल्या मेहूण्यासोबत गावात दारु पिला आणि घरी येऊन जेवण देखील केले. त्यानंतर मेहुण्यांनी त्यास रात्रभर राहण्यास विनंती केली. मात्र, मला घरी काम आहे असे म्हणून त्याने तेथून काढता पाय घेतला. तर आपला पती फुल पिलेला आहे. त्यामुळे, मयत शोभा हिने त्याच्यासोबत येणे तिला अयोग्य वाटले. त्यामुळे, तिच्या घरच्यांनी देखील संजयला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध केल्याने त्याने शोभाच्या तोंडात मारली. कारण त्याचा अपमान झाला होता.
दरम्यान, वाद नको म्हणून रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास दोघांनी मुरशेतला जाण्याचे ठरविले. संजय पिलेल्या अवस्थेत गाडी चालवत होता. त्यामुळे, तो अनेक ठिकाणी गाडी चुकीचा चालवत होता. मुरशेतकडे येत असताना त्याने शोभा हिला चांगलीच शिवीगाळ केली. त्याचा सासरवाडीत अपमान झाला त्यामुळे त्याने परदेशवाडी परिसरात गेल्यानंतर तिला पोटात, पाठीत, डोक्यात बेदम मारहाण केली. तिला प्रचंड मार लागल्यामुळे ती तेथे जमिनिवर कोसळली. तिला उपचाराची फार गरज होती. मात्र, त्याने तिला रात्रीच्या वेळी तेथेच जखमी अवस्थेत सोडले आणि तो गाडीवर निघुन गेला. जेव्हा घरी पोहचला तेव्हा त्याच्या वडिलांनी विचारले की, सुनबाई कोठे आहे? तेव्हा त्याने सांगितले की, तिला चक्कर आली आणि ती गाडीहून पडली आहे. ती गाडीवर बसण्याच्या परिस्थितीत नसल्याने तिला मी तेथेच सोडून आलो आहे. असे सासर्यास समजताच त्यांनी गाडी घेतली आणि थेट घटनास्थळ गाठले. तेव्हा पाहिले तर शोभा हिने अखेरचा श्वास घेतला होता.
दरम्यान, एक आशा म्हणून त्यांनी तिला राजूर येथील रुग्णालयात दाखल केले. तेव्हा, ही गाडीहून पडली आहे. असेच सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली होती. तेव्हा संजयला वाटले होते की, आपला गुन्हा पचला आहे. मात्र, त्यानंतर काही दिवसात जेव्हा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. त्यात समोर आले की, मयत शोभा हिच्या शरिरावर जवळपास सोळा जखमा होत्या. त्यातील काही जखमी ह्या काठीने मारल्याशिवाय होणार्या नव्हत्या. त्यामुळे, पोलिसांनी तत्काळ या गुन्ह्याची उकल करण्यास सुरूवात केली. राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आणि पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी पुढील पाऊले उचलुन तत्काळ गुन्हा दाखल केला. तर, संजय बांगर हा गाफिल असताना त्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने यापुर्वी तीन विवाह केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून एक ठिकाणी प्रेम संबंधातून संसार बसविला असल्याची माहिती देखील मिळाली. त्यामुळे, पोलिसांनी आता त्याची कसून चौकशी सुरू केली असून अनेक कारणामे पुढे येऊ लागले आहेत. पुढील तापास पोलीस करीत आहेत.