धोतराचा अवमान आणि पक्षविरोधी काम.! राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षावर निलंबनाची कुर्‍हाड.! भाजपचं पाहून शहाणपण सुचलं.!


- सागर शिंदे 

 सार्वभौम (अकोले) :-

                अकोले नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हे शल्य पक्षाला असले तरी त्यात जी काही धोतराची मिरवणुक काढून असंस्कृत पणाचे दर्शन काही व्यक्तींनी केले. त्याबाबत तालुक्यात थू-थू होत असल्याचे पहायला मिळत आहे. तर तालुक्यातील बहुजन समाज दुखावला गेल्यामुळे त्यांनी या घटनेचा निषेध देखील केला आहे. ही धग कायम असताना याच दरम्यान एक नवा वाद उभा राहिला होता. तो म्हणजे, राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष संदिप भाऊसाहेब शेणकर यांनी पक्षाच्या विरोधात काम केले तर पक्षाच्या नेत्यांचे नको तसे स्टेटस ठेऊन व्यक्तीविरोध दर्शविला होता. त्यामुळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकाडे आणि युवकाध्यक्ष रवि मालुंजक यांनी त्यास कारणे दाखवा नोटीस (शो-कॉझ) बजावली आहे. त्यामुळे, शेणकर हे अशा परिस्थितीत काय कारण देणार आहेत? जर त्यांनी कारण दाखविले नाही तर त्यांना जी नोटीस दिली. तीच निलंबनाची नोटीस असणार आहे. त्यामुळे, एकंदर संदिप बी.शेणकर हे आता पक्षाचे नसून ते पुढे कोणते पाऊल उचलतात हे पहाणे महत्वाचे आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यात 13 प्रभागांच्या निवडणुका झाल्या. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या भोंगळ कारभारामुळे, सगळा सावळा गोंधळ पहायला मिळाला. त्यामुळे, प्रभाग 1 आणि प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादीचे दोन बंडखोर उमेदवार उभे राहिले होते. त्यांच्या माघारीने तेथे राष्ट्रवादी-शिवसेनाच्या उमेदवाराला फायदा होईल म्हणून डॉ. किरण लहामटे यांनी फार विनंती केली. मात्र, तरी देखील यांनी पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. अर्थात या दोन्ही ठिकाणी उमेदवार हे निर्विवाद निवडून आले. मात्र, हे संदिप भाऊसाहेब शेणकर हे जबाबदार प्रतिनिधी असून देखील त्यांनी अशा प्रकारे बंड पुकारणे हे चुक असल्याचे पक्षाचे तत्व सांगतात. त्यामुळे, त्यांना कारवाईला सामोरे जाणे हे त्रिवार सत्य होते. आज (दि. 25 जानेवारी) रोजी मालुंजकर यांनी त्यांना नोटीस दिली असून ते एक प्रकारे निलंबनच असल्याचे आता शिक्कामुर्तब झाले आहे.

खरंतर, भाजपने देखील प्रभाग क्र.4 मध्ये नितिन जोशी यांच्यावर कारवाई केली आहे. पक्षाने त्यांना आदेश देऊन देखील त्यांनी निवडणुक लढविली आणि त्यानंतर त्यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. म्हणजे, राष्ट्रवादीने हा धडा भाजपकडून शिकला आहे. अन्यथा हे देखील त्यांच्याच्याने झाले नसते अशी टिका राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांवर होत आहे. कारण, तिकांडे यांनी दोन दिवसांपुर्वी मालुंजकर यांना कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, दोस्तीत कुस्ती होऊ लागल्याने मालुंजकर यांचे मन कारवाई करण्यावर धजत नव्हते. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाने त्यांनी पुढील पाऊल उचलले आहे. तर, शिवसेनेत देखील काही बंडखोर उमेदवार आहेत. त्यांच्यावर कारावाई होईल की नाही? एखादी चिंतनपर बैठक लावाल की नाही? अशा प्रकारच्या खोचक टिका समोर येऊ लागल्या आहेत. तर काहींनी त्यांचे राजिनामे देखील लिहुन ठेवल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे, सेनेत देखील नगरपंचायतीनंतर धुसफूस पहायला मिळत आहे.

खरंतर, संदिप शेणकर यांनी त्यांच्या प्रभागात नक्की काम केले होते. मात्र, त्यांनी बंड पुकारला ही एक बाजू असली तरी, त्यांनी पक्षातील नेत्यांच्या विरोधातच बंड पुकारल्याचे पहायला मिळाले. इतकेच काय.! त्यांनी जे काही स्टेटस ठेवले होते. त्यावर भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जोरदार चर्चा सुरू होती. इतकेच काय.! भाजपच्या नेत्यांनी देखील सोशल मीडियावर टाकले होते की, तुमचेच पायतान तुमच्या पायात नाही. कारण, शेणकर यांनी गायकर साहेबांच्या बाबत जे काही पोष्ट केले होते. ते अनेकांना खटकले होते. अर्थात सदसद विवेक बुद्धीचा विचार केला तर गायकरांवर टिका टिप्पण्णी करताना आपण त्या उंचीचे आहोत का? जी पोष्ट केली ती समाजमान्य ठरेल का? हे लक्षात आले असते तर त्यांनी ती पोष्ट केलीच नसती. म्हणजे, एकीकडे बी.जे साहेबांनी ठेवली असती तरी त्याचे लोकांना काही वाटले नसते. मात्र, शेणकर यांनी अशा पद्धतीने पोष्ट करणे हे चुक होते. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्याचे पहायला मिळाले.

खरंतर, गेल्या कित्तके दिवसांपासून संतोष नाईकवाडी आणि संदिप नाईकवाडी हे राष्ट्रवादीत कार्यरत आहेत. त्यांनी आजवर गायकर साहेबांना खुला विरोध करुन कारखान्याच्या संदर्भात बी.जे.देशमुख यांना सपोर्ट केल्याचे पहाला मिळाले. मात्र, सुदैवाने नाईकवाडी यांना प्रभाग 15 मध्ये शाश्वत जागा मिळाली आणि त्यांनी राष्ट्रवादीची निष्ठा देखील सिद्ध केली. जे काही गायकर साहेबांच्या बाबत मतभेद असतील ते देखील त्यांनी वैचारिक पातळीवर दुर केले. मात्र, दुर्दैवाने शेणकर यांना प्रभाग 10 मिळाला नाही. कारण, ती जागा वाटाघाटीत शिवसेनेला गेली. अर्थात त्यात डॉ. लहामटे यांची मध्यस्ती होती. परिणामी शेणकर बाजुला राहिले आणि असे बोलले जाते की, त्यांनी गायकरांवर आपला रोष कायम ठेवला. यावर त्याचे ज्येष्ठ नेते म्हणतात की केवळ त्यांच्यात काही व्यक्तींनी गैरसमज पसरविला असून कारखान्यात जे गायकरांना विरोध करतात त्यांनी शेणकर यांच्या खांद्याचा वापर केला आणि गायकरांच्या बदनामीवर निशाणा साधला. त्यामुळे, शेणकर यांना त्यांचे स्टेटस आणि पक्षविरोधी काम हे दोन्ही जड गेल्याची चर्चा राष्ट्रवादी पक्षात रंगली आहे.