जिवलग मित्र निघाला त्याचा खुनी.! दारु ढोसून मारले ठेचून.! पार्टी जीव घेऊन गेली.! संगमनेरच्या चंदनापुरीचा आरोपी.!

सार्वभौम (संगमनेर) :-

                  संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात एकाच हॉटेलात काम करणार्‍या दोन मित्रांनी दारुची पार्टी केली आणि दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले. मात्र, दारुच्या नशेत दोघे एकमेकांना भिडले असता एकाने आपल्या जिवलग मित्राच्या डोक्यात दगड घालुन त्यास ठार केले. ही घटना दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी घुलेवाडी परिसरात संगमनेर साखर कारखान्याकडे जाणार्‍या रोडलगत घडली होती. मात्र, हा अपघात आहे की, खून याबाबत साशंकता होती. परंतु वैद्यकीय अहवाला आला असता तो खुनच असल्याचे समोर आले आणि कलम 302 नुसार गुन्हा दाखल झाला. यात पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांनी लक्ष घातले असता त्यांच्या विशेष पथकाने हा क्रिटीकल तपासाची उकल केली असून त्यांच्या कर्तुत्वाबाबत अनेकांनी गौरवोद्गार काढले आहेत. यात अमोल मनोहर तरकसे (वय 27, रा.तरकसवाडी, ता. राहता) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, त्याचा मित्र मनोज बाळासाहेब राहणे (वय 23, रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) यास आज (दि.5) भिगवन ता. इंदापूर, जि. पुणे येथून बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील एका हॉटेलवर अमोल तरकसे व मनोज राहणे ही दोघे कुक आणि वेटरची कामे करीत होते. तेथे देखील यांचे नेहमी वाद होत होते. त्यामुळे, त्यांना मालकाने हुसकून दिले होते. दि.12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ही दोघे संगमनेर शहरात आले होते. यांनी दिल्लीनाका परिसरात एका हॉटेलमध्ये यथेच्छ दारु पिली, त्यानंतर बाकी दोघांना काही भान राहिले नाही. ही दोघे घुलेवाडी परिसरात चालत-चालत गेले असता त्यांच्यात पुन्हा अश्लिल शब्दीक चकमक झाली. तेव्हा, अमोल यास मनोजने मारहाण केली. मात्र, यांच्यातील मद्यधुंद वाद इतके टोकाला गेले की, मनोजने त्यास बेदम मारहाण केली. वयाने हा लहान असला तरी तो फारसा पिलेला नव्हता तर अमोला स्वत:ला संभाळता आले नाही. परिणामी मनोजने एक दगड घेतला आणि तो अमोलच्या डोक्यात मारला. रोषाने काही वार केल्यानंतर तो शांत झाला आणि आपला मित्र मेला असे त्याच्या लक्षात आले असता त्याने तेथील काही पुरवे नष्ट करून तेथून पळ काढला.

दरम्यान, शुक्रवार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी घुलेवाडी परिसरातून राऊत नामक व्यक्ती संगमनेर साखर कारखान्याकडे जात होती. त्यांनी हा तरुण रस्त्याच्या कडेला गवतात पडलेला असल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ संगमनेर पोलीस कर्मचारी गोरे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस यंत्रणा तत्काळ तेथे हजर झाली. हा अपघात आहे की खून याबाबत पोलिसांना साशंकता होती. काही जण म्हणत होते की हा अपघात आहे. केवळ 174 नुसार अकस्मात मृत्युची नोंद करा. तर काही म्हणत होते हा खून असून गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यानंतर जेव्हा मृतदेहाचे पीएम करण्यात आले. तेव्हा, वैद्यकीय अहवालाअंती लक्षात आले की, हा खून आहे. त्यानंतर पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आणि तपासाची सुत्रे स्वत: पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांनी हाती घेतली. मात्र, त्यांनी जो काही तपास केला. त्याबाबत कोणालाही काही कळू न देता थेट मयताची ओळख परेड करुन आरोपीला देखील बेड्या ठोकल्या आणि अशक्य तपास शक्य करुन दाखविला.

दरम्यान, गुन्हा घडून गेल्यानंतर अनेक दिवसांनी त्याची सत्यता बाहेर येते आणि त्यातील आरोपी देखील गजाआड जातात अशी अनेक उदा. आहेत. त्यात नगर शहरातील अशोक लांडे खून खटल्यासारखे अनेक प्रकार आहेत. मात्र, या गुन्ह्यात मयत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती, त्यात हा खून की अपघात हे देखील स्पष्ठ नव्हते, त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील झालेले होते. त्यानंतर महिन्याभराने गुन्हा दाखल झाला. असे अनेक प्रश्न तपासाच्या पटलावर होते. मात्र, राहुल मदने यांच्या पथकाने मोठी कसोटी पणाला लावली आणि 30 डिसेंबर 2021 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास 5 जानेवारी रोजी फायनल करुन अमोल तरकसे यास न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अभिनंदन केले आहे. ही कामगिरी एसी, अप्पर पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपाधिक्षक मदने यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस ना. अण्णासाहेब दातीर, सुभाष बोडके, पोलीस कॉ. प्रमोद गाडेकर, पोलीस कॉ. अमृतआढाव, पोलीस कॉ. गणेश शिंदे, पोलीस ना. फुरकान शेख आदी पथकाने केली. यांनी केली.