खून करून रस्त्याच्या कडेला मृतदेह पालथा टाकला.! तो अपघात नव्हे.! कोल्ड माईंडेड मर्डर.! संगमनेरातील धक्कादायक घटना.!


सार्वभौम (संगमनेर) :-

                  आपल्या रस्त्यातील काटा दुर करण्यासाठी एका 22 वर्षीय तरुणाला ठार करण्यात आले. तर हा अपघात आहे असे भासविण्यासाठी त्यास रस्त्याच्या कडेला एका विरळ गवतात फेकूण दिले गेले. हा धक्कादायक प्रकार दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी घुलेवाडी परिसरात संगमनेर साखर कारखान्याकडे जाणार्‍या रोडवर घडला. हा अपघात आहे असे म्हणून याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्याचे शवविच्छेदन केले असता एक महिन्यानंतर वैद्यकीय अहवाल आला असता हा अपघात नसून खून आहे हे सिद्ध झाले. त्यानंतर संगमनेर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तत्काळ कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करुन घेतला असून या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक महिन्यांपुर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या गोरे यांना फोन आला होता. समोरुन बोलणार्‍या ओळखीच्या एका व्यक्तीने सांगितले की, घुलेवाडी परिसरात संगमनेर साखर कारखान्याकडे जाणार्‍या रोडच्याकडेल गवतात एका तरुण मुलाचा मृतदेह पडला आहे. तेव्हा पोलीस निरीक्षक देशमुख यांना तत्काळ पोलीस पाठवून घटनेची शाहनिशा करण्यास सांगितले होते. मात्र, तो रस्ता प्रचंड वर्दळीचा असल्यामुळे, रात्री अपरात्री कोण्या एका गाडीने संबंधित तरुणास पायी जात असताना उडविले असावे.! अशा प्रकारची धारणा झाली. मात्र, त्याच्या शरिरावर जवळजवळ अनेक जखमा होत्या. तर डोक्याला मार देखील लागलेला होता. आता जो कोणी पोलिस असेल त्यांनी फार टेन्शन घेण्याचे काम केले नसावे. त्यामुळे, या मयत प्रकरणी त्यांनी पंचनामा केला आणि कागदी घोडे नाचवून पुढे मृतदेहाची विल्हेवाट करण्यास सुरूवात केली.

दुर्दैवाने या तरुणाचे नाव काय माहिती नाही, कोणी मारले माहित नाही, कसा व का मारला माहिती नाही, हा कुठला आहे. हे देखील माहित नाही त्यामुळे, मृत्यु नंतर देखील त्याच्या मृतदेहची अवहेलना झाली. कारण, 174 प्रमाणे नोंद करुन त्याच्या खुन्याचा पहिला प्लॅन सक्सेस झाला. तर, दुसरी दुदैवी गोष्ट म्हणजे, त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचे कोणी नातेवाईक नसल्याने तो मृतदेह अंत्यविधी करता आला नाही. तर त्यास बंद पेटीत ठेवण्यात आले. त्यानंतर संगमनेर नगरपरिषद यांना अंत्यतविधीसाठी पत्र दिले असता त्यांनी सांगितले की, मयत हा घुलेवाडी शिवारात मिळून आला आहे. त्यामुळे, आमच्याकडे त्याचा अंत्यविधी होणार नाही. त्यामुळे, पोलीस हतबल झाले आणि त्यांनी घुलेवाडी गाठली. दुर्दुैवाने घुलेवाडी देखील या मृतदेहाला गाडण्यासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे, पोलिसांनी अखेर वेल्हाळे ग्रामपंचायतीला पत्र दिले आणि किमान एक मृतदेह गाडण्यासाठी तरी जागा द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर या नागरिकांनी अगदी हळव्या मनाने मयत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा दिली आणि स्वत: मदत देखील केली. त्यामुळे, संगमनेर नगरपरिषदेच्या अंतर्गत माणूस मेला तरी गाडायला देखील जागा भेटत नाही हे किती मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे, येथील अतिक्रमण आणि येथील अधिकारी कर्मचारी यांच्या मानसिकतेचे देखील दर्शन त्या निमित्ताने झाले आहे.

दरम्यान तरुणावर अंत्यविधी झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर, या व्यक्तीचे नाव काय आहे? तो कोठे राहतो याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी, काही जिल्ह्यात त्याच्या वर्णणाची माहिती देण्यात आली, बस स्थानक, सार्वजानिक ठिकाणे या जागेंवर पोष्टर लावण्यात आले. मात्र, तरी देखील या तरुणाची ओळख पटली नाही. खरंतर पोलिसांनी तेव्हाच त्याच्या हाताचे ठसे घेतले असते तर किमान त्याचे आधारकार्ड तरी मिळून आले असते. असे अनेक मार्ग होते. मात्र, पोलिसांनी नेमकी काय तपास केला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आता या व्यक्तीची ओळखच पटली नाही. तर त्याच्या हत्यार्‍याचा शोध कसा लागणार? यावर प्रश्नचिन्ह कायम असणार आहे. कारण, हा तपासच कायम तपासावर राहण्याची शक्यता आहे. खरंतर संगमनेरमध्ये अनेक तपास यांचा छडा लागलेला नाही. त्यामुळे, अशा नाजुक आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्याची उकल होईल अशी अपेक्षा ठेवणे हे देखील चुकीचेच आहे.! असे मत संगमनेरकरांनी व्यक्त केले आहे.