अकोल्यातील मोठ्या उद्योजकास ठोकल्या बेड्या.! तलाठी व उद्याजकाची पत्नी पसार, दोन पतसंस्थेची फसवणुक.! 80 लाखांची गफला.!
अकोले तालुक्यातील औरंगपूर येथे सव्हे नंबर 1/1 हि मिळकत सहकार महार्षी भाऊसाहेब थोरात अमृत वाहिनी बँकेकडे 2013 वाली गहाण आहे. तरी देखील आरोपी यांनी संग्राम नागरी पतसंस्था संगमनेर यांचे नुकसान करणे व गुन्हा करण्याच्या हेतूने बनावट कागदपत्रे तयार करुन सरकारी दप्तरात फेरफार केला. ही जमीन कोणाकडे गहाण नाही असे खोटे भासवून संग्राम बँकेकडून कर्ज मिळविले. ही घटना दि. 18 जून 2016 रोजीच्या दरम्यान घडली. याप्रकरणी 2019 साली संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संग्रम बँकेचे मॅनेजर उमेश सुकदेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर भिजत पडलेला गुन्हा पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे नव्याने आला असता त्यांनी तडक कारवाई करीत अकोले तालुक्यातील उद्योजन ऑक्सिमोर पाणी बॉटल कंपनीचे मालक प्रविण विलासराव देशमुख (वय 42, रा. नवलेवाडी. ता. अकोले) याला बेड्या ठोकल्या आहेत. त्यास न्यायालयात हजर केला असता पुढील तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर त्याची पत्नी आणि फ्रॉड करणारा तलाठी गुलाब विठोबा बारामते (रा. धुमाळवाडी, ता. अकोले) हे अद्याप पसार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहकार महार्षी भाऊसाहेब संतुजी थोरात अमृत वाहिनी बँक संगमनेर यांच्याकडे औरंगपूर येथील सव्हे नं.1/1 ही मिळकत दि. 23 डिसेंबर 2021 रोजी गहाणखत केलेली आहे. तरी देखील आरोपी प्रविण देशमुख याने संग्राम नागरी पतसंस्थेचे नुकसान करण्याचा डाव आखला. त्यात त्याची पत्नी आणि तलाठी बारामते हा देखील सामिल होता. यांनी याच जमिनीचे पुन्हा दुसरे बनावट कागदपत्र तयार केले. इतकेच काय.! तलाठ्याच्या मदतीने सरकारी रेकॉर्डमध्ये देखील यांनी फेरफार करुन ही मिळकत ही कोठेही गहाण नाही असे खोटे कागदपत्र तयार केले. हे सर्व बनावट रेकॉर्ड एका बँकेत दाखल करुन बेकायदेशिरपणे सदरची मिळत पुन्हा दि. 18 जून 2016 रोजी संग्राम नागरी पतसंस्थेकडे गहाण ठेऊन पतसंस्थेची फसवणुक केली आणि 80 लाख रुपये कर्ज काढले.
दरम्यान, हा सर्व प्रकार संग्राम नागरी पतसंस्थेच्या नंतर लक्षात आला असता अधिकार्यांनी त्याबाबत चौकशी केली. तेव्हा लक्षात आले की, एकाच जमिनिवर दोन वेळा कर्ज काढण्यात आले आहे. तर कर्जासाठी जे काही कागदपत्रे जोडण्यात आली आहेत. ती देखील खोटी असून त्यात तलाठ्याशिवाय हे कोणी करणार नाही. त्यामुळे, जेव्हा हा घडलेला प्रकार उघड झाला. तेव्हा बँकेच्या अधिकार्यांनी सावध भुमिका घेतली. प्रविण देशमुख, याची पत्नी आणि तलाठी गुलाब बारामते यांनी संगनमत करुन स्वत:च्या फायद्याकरीता खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी कागदांमध्ये फेरबदल केले. तसेच पतसंस्थेची फसवणुक केली आहे. त्यामुळे, याप्रकरणी तिघांवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा 2019 पासून धुळ खात पडला होता. मात्र, पोलीस उपनिरीक्षक निवंत जाधव हे आल्यानंतर त्यांनी आरोपी यांना बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अकोले तालुक्यात महसुल खात्याच्या अंतर्गत अनेक काळे धंदे सुरू असून मोठमोठ्या अर्थपुर्ण तडजोडी होताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, जेव्हा असे प्रकार उघड होतात. तेव्हा खर्या आर्थने यांची नकली बुरखे समोर येतात. जमीन खरेदीविक्री आणि ग्रामीण भागातील शेतकर्यांना अनेक ठिकाणी फसविले जात असून बोगस खरेद्यांना देखील उत आला आहे. त्यामुळे, असे प्रकार थांबले जावेत अशा प्रकारची मागणी आता होऊ लागली आहे. तर, प्रविण देशमुख हे कायम वादाच्या भोवर्यात असतात त्यामुळे, त्यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांच्या उद्योगाबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करावी. असा सुर तालुक्यातून येत आहे.